वास्तव

वास्तव

Submitted by साद on 11 December, 2018 - 01:23

साधा भोळा चेहरा होता चांगल्यापैकी गुण होते
जगाच्या बाजारामध्ये यातले काहीच चालणार नव्हते

कपडे अगदी साधे होते बूट काय ते माहीत नव्हते
दुर्लक्षाचे कटाक्ष त्यामुळे अंगावर मात्र पडत होते

वशिल्याची काही तट्टे होती त्यांचे मात्र बरे होते
दाखवण्यापुरते त्यांना नाटक फक्त करायचे होते

फिरणारे काही दलाल होते दादासारखे वावरत होते
आणि मालवाल्या धेंडाकडे आशेने तर बघत होते

साधे अर्ज टोपलीत होते नाटक पूर्ण झाले होते
गल्लाभरुंच्या जमान्यामध्ये धंदे सगळे जोरात होते

शब्दखुणा: 

वास्तव

Submitted by भक्तिप्रणव on 30 October, 2014 - 03:40

झेप ही उत्तुंग
नभी गवसणी |
विसरली गाणी
भुईतली ||

स्वनामात दंग
वरलिये रंग |
आप्तांचे अभंग
दुभंगले ||

सांगू जाता कोणी
आळूवर पाणी |
स्वमग्न अंतरी
शिरेचिना ||

- संदीप मोघे
08989160981
Sandeep.moghe@yahoo.com

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वास्तव