हितगुज २०१२ दिवाळी अंकाकडून वाचकांच्या अपेक्षा काय?

Submitted by संपादक on 15 September, 2012 - 01:03

श्री गणरायाच्या आगमनाच्या तयारीत मग्न असतानाच एकीकडे चाहूल लागते दिवाळीची आणि अर्थातच दिवाळी अंकाची.

हितगुज दिवाळी अंकाचं यंदाचं हे तेरावं वर्ष. या वर्षीचा दिवाळी अंकदेखील आजवरच्या मायबोलीच्या वाचनीय दिवाळी अंकाच्या परंपरेला साजेसा असावा, हीच तुम्हां-आम्हां प्रत्येक मायबोलीकराची इच्छा! 'वाचकांच्या पसंतीस उतरेल' असा दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या कामात सर्वात मोलाचा सहभाग हा अर्थातच आपणा वाचकांचाच ...

एक रसिक, सूज्ञ वाचक आणि कलाउपासक या नात्याने आपण 'ह्या दिवाळी अंकामध्ये तुम्हांला काय वाचायला, ऐकायला आणि पहायला आवडेल? या अंकाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आणि या अंकात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?' ह्याबाबतची तुमची मत कृपया इथे मांडा ही मनापासून विनंती.

येत्या दिवाळी अंकात कोणकोणत्या विषयांवर साहित्य असावे याबद्दलच्या आपल्या अपेक्षा संपादकांपर्यंत पोचवण्याची अखेरची तारीख आहे - रविवार, दिनांक २३ सप्टेंबर.
त्यानंतर हा बाफ लिखाणासाठी बंद करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुखपृष्ठावर विशेष ल़क्ष द्याल का प्लीज, पाहताच अंक उघडून बसकन मारून वाचायला घ्यावा वाटावा... Happy
भरपूर गद्यही हवंय वाचायला, आपल्याकडे उत्तम कथालेखक आहेतच, सगळ्यांच्या सहभागाने सुंदर होऊ देत अंक...

शुभेच्छा टीम Happy

फ्लॅश किंवा आणि काही गोष्टींचा वापर करुन काही इंटरॅक्टीव्ह सादर करता आले तर नाविन्य्पुर्ण ठरेल. उदा. जत्रा /आवाज इ. असलेली खिड्की चित्र माउस ओव्हर वापरुन सहज बनवता येतिल (अर्थात जत्रा/आवाज प्रकारातिल खिड्की चित्र इथे अपेक्षित नाहित , फक्त उदा. म्हणुन वापरलेय)
छापिल दिवाळी अंकांचा व्यंगचित्र हा अविभाज्य भाग असतो. हितगुज दिवाळिच्या काही भागात ती होती मात्र मागच्या काही वर्षात त्याला फाटा दिलाय. शक्य असेल तर आत्तापासुनच काही लोकाना आग्रह करुन ( कोणीतरी मागुन किल्लेदार , किल्लेदार असे ओरडतेय Wink ) दर्जेदार व्यंगचित्र /मालिका सादर करा.
दिवाळी पहाट गप्पा - जर चॅटरुम (मॉडरेटेटेड) वापरुन येखाद्या सेलिब्रेटिशी लाईव्ह दिवाळी गप्पा मारायची संधी दिली तर अनेकांसाठी ती संस्मरणिय ठरेल, या गप्पांचे ट्रांस्क्रीप्ट लगेचच दिवाळी अंकात सामाविष्ट करायचे.
महत्वाचे म्हणजे दर्जा. प्रामाणिक मत सांगायचे तर गेल्या काही अंकात दर्जा राखता आला नाहिये.

'इंटरनेट' माध्यमाला पुरेपूर न्याय देणारा मायबोलीचा दिवाळी अंक असावा अशी अपेक्षा आहे. वाचनाबरोबरच दृकश्राव्य कार्यक्रमांची मेजवानी मिळावी, अर्थात्, यंदा रार मुख्य संपादक असताना तशी अपेक्षा व्यक्त करायची गरजच नाही Happy
अंक प्रकाशित व्हायच्या अगोदर संपादक मंडळाखेरीज किंवा अंकाशी संबंधित व्यक्ती वगळता तिसर्‍याकडून अंक वाचून तपासून (ऑडीट?) घेतला तर छोट्या छोट्या चुका टाळता येतील असे वाटते.
(उदा. 'संपादक' आयडीमधे अजूनही गेल्या वर्षीच्या संपादक मंडळातील सहभागींची नावे दिसत आहेत Happy )

मायबोली दिवाळी अंक नेहमीप्रमाणेच दर्जेदार असणारच ह्याची खात्री आहे. संपादक मंडळाला खूप सार्‍या शुभेच्छा!!

मंजूला अनुमोदन.
पारंपारिक छापिल दिवाळी अंक आणि निव्वळ नेटीझन्सनाच आपला वाटू शकेल असा अंक - या दोहोंचा सुरेख संकर असणारा अंक पहायला-वाचायला आवडेल.
अंकाच्या टेंप्लेटबद्दल, त्याच्या दृश्यस्वरूपाबद्दल काही नवीन, अभिनव विचार केला गेला तर आवडेल. (म्हणजे अगदी काही फ्लॅशी किंवा चकाचक अ‍ॅनिमेटेडच हवं असं नाही, पण इतक्या वर्षांच्या टेम्प्लेट-पध्दतीला फाटा देऊन काही निराळं करता आलं तर पहायला फार आवडेल.)

एखादा विषय वगैरे नका घेऊ, एकसूरी होतो अंक. स्वातंत्र्य असू द्या.
बाहेरचे लेखकही नकोत, मायबोलीचे सभासद हि किमान अट असावी. तसेच मायबोलीवरचे नविन सभासद लिहितील, तर जास्त चांगले. ( जून्यांनी आता प्रतिसादापुरते असावे ! )

दिवाळी अंकातील कथा वाचनीय असाव्यात - हलक्याफुलक्या अशा. दिवाळीमधे कंटाळवाण्या, शेवट नसलेल्या , उगाचं वैचारीक वगैरे कथा वाचायला फार बोरं होतं Happy

मा बो वरीलच कोणा कलाकाराच्या वादनाची (उदा. चैतन्य दिक्षीत -बासरीवादन) ऑडिओ फाईल किंवा "दाद" चे तिच्याच आवाजातले तिच्या लेखाचे वाचन अशा ऑडिओ स्वरुपातलं काही - अशा गोष्टींचा समावेश करता येईल का या दिवाळी अंकात ?
(तांत्रिक अडचणींची कल्पना नसल्याने फक्त सुचवीत आहे - सहज शक्य झाल्यास व सर्वांना ही कल्पना आवडल्यास समावेश करावा)

>>. तसेच मायबोलीवरचे नविन सभासद लिहितील, तर जास्त चांगले. ( जून्यांनी आता प्रतिसादापुरते असावे ! )>> हे ही बरोबर नाहीच. जुन्यांच्या बरोबरीने नव्या मेंबर्सनीही जोमाने लिहावे असं म्हणा.

क्रिएटिव्ह चलत-व्यंगचित्रं ,तशी कवितावाचनंही दृक/+ श्राव्य शैलीत करता येतील का?जरा वेगळेपणा.
बाकी साहित्याचे निकष तेच, 'नवेपण' हवे असते फक्त.
नवेपण म्हणजे लेखनातले हं, इथे 'नवे-जुने मायबोलीकर ' असे अभिप्रेत नाही.ते वर्गीकरण बरोबर वाटत नाही.

सायो, जून्यांची वर्णी लावावीच असा नियम आहे का कोण जाणे, नव्यांचे चांगले लेख डावलले जातात अशाने.
(पडद्यामागची उदाहरणे माहीत आहेत म्हणूनच तसे लिहिलेय ! )

नव्यांचे चांगले लेख डावलले जातात अशाने.
(पडद्यामागची उदाहरणे माहीत आहेत म्हणूनच तसे लिहिलेय ! ) <<<<

पटलं नाही.
आत्तापर्यंतच्या संपादक मंडळांवर आरोप केल्यासारखे हे वाक्य आहे. संपादक मंडळाने एखादा लेख स्वीकारला वा नाकारला याबाबत संपादक मंडळाशी सहमत नसणे हे सहज शक्य आहे पण नवे-जुने आयडी किंवा इतर काही फेवरिटीझम अश्या कुठल्या कारणानेच एखादे लिखाण स्वीकारले वा नाकारले आहे हे म्हणणे अयोग्य. चूकच.
पडद्यामागची ऐकीव उदाहरणे म्हणजे सत्य नव्हे.

आपण जेव्हा लिखाण देतो तेव्हा संपादक मंडळाचा निर्णय अंतिम हे मान्य करत असतो हे तरी लक्षात असायला हवे.

तटी: मी आजवर कुठल्याही दिवाळी अंक संपादक मंडळात नव्हते पण प्रत्येक वर्षी लेख नाकारला गेल्याने 'रडीचा डाव' करणारे कुणीतरी असतेच. आणि तो रडीचा डाव, त्याला मिळणारे प्रतिसाद बघितले की संपादक मंडळाचे काम हे किती कटकटीचे आणि तरीही पूर्णपणे थँकलेस आहे याची खात्री पटते.

विषयांतराबद्दल माफ करणे.

हा दिवाळी अंक फक्त नवीन लोकांचाच काढावा...जूनेजाणते लोक सगळ्यांनाच माहीत आहेत..त्यांनी ह्यावेळी मागच्या बाकावर बसून टाळ्या वाजवून कौतुक करावे... नव्यांचे ...
दिनेशदांच्या प्रस्तावाला माझेही अनुमोदन.

दृकश्राव्य अंकाची कल्पना चांगलीच आहे...आम्हीही असे अंक ’जालरंग प्रकाशन’तर्फे काढले होते...पण प्रामाणिकपणे सांगायचे तर अशा अंकांना फारसा प्रतिसाद मिळत नाही..त्याची प्रमूख कारणे अशी....
बहुतेक लोक हे आपापल्या कार्यालयातून जालावर येत असतात....त्यांना काही ऐकणे आणि पाहणे (ऑडिओ-विडिओ) शक्य नसतं..ज्यासाठी जास्त बॅंडविड्थ आणि वेळही लागतो..... कामं करता करता हे करणं कठीणच आणि दुसरं म्हणजे बर्‍याच कार्यालयात अशा गोष्टींना बंदी असते.....दिवसभर कार्यालयात संगणकासमोर बसल्यावर मुद्दाम घरी जाऊन कुणी संगणकाला हातही लावत नाहीत...त्यामुळे जे केवळ वाचता येतं अशाच लेख/कवितांचीच केवळ दखल घेतली जाते....

प्रतिक्रियाच नसतील तर मग लोक आपलं कलाप्रदर्शन कशाला करतील?
भविष्यात ह्यात कदाचित सकारात्मक बदल होईलही..पण सद्द्या आहे हे असं आहे.

नवे जुने हे वाद मायबोलीवर इतरत्र चालूच असतात. ते आता दिवाळी अंकातही आणायला हवेतच का? नवे काय आणि जुने काय, ज्यांना लिहायचंय त्यांना लिहू देत की. जुन्यांनी फक्त प्रतिसादच द्यावेत किंवा त्यांनी मागच्या बाकावर बसून टाळ्याच वाजवाव्यात हे तरी का सुचवा? हे असं लिहून तुम्ही नवीन सभासदांच्या मनात इथे असंच चालतं हे भरवताय हे लक्षात येतंय का?

>>आपण जेव्हा लिखाण देतो तेव्हा संपादक मंडळाचा निर्णय अंतिम हे मान्य करत असतो हे तरी लक्षात असायला हवे.>> हे कोणत्याही लेखकाने लक्षात ठेवावे.

एक्झॅक्टली.
नवे-जुने अशी विनाकारण फूट पाडली जातेय.
आणि नवे म्हणजे नक्की किती नवे किंवा जुने म्हणजे नक्की किती नवे?
५ वर्षाच्या आतले नवे धरले तर ५ वर्ष १ दिवस झाल्यावर अचानक जुना होतो का आयडी?
असो..

हाच विषय ठेवा चर्चेला दिवाळी अंकामधे. काय ती फुल आणि फायनल भडास निघून जौद्यात. (हे शिरेसली घेतलंत तरी चालेल) Happy

अंकाला मध्यवर्ती संकल्पना हवीच. त्याशिवाय काय मजा?

नवीन लोकांचे वाचून मज्जा वाटली. इथे म्हणजे चांगले लेख यायची मारामार. नवेजुने करत बसायचे म्हणजे अजूनच आनंद. Lol

धुंद रवी , दाद , चिमण आणि इतरही काही अतिशय दर्जेदार विनोदी लेखक माय्बोलिवर आहेत. पण दिवळि अंकात मात्र ते नसतात. त्यांनी तिथे हजेरी लावली तर फारच आवडेल. Happy

रैना Lol

खरोखर नवे सभासद जुने सभासद असला काही फरक करण्याएवढा वेळ आणि चॉईस दोन्ही नसतं बर्र्का. काहीही काय उगाच!

मध्यवर्ती संकल्पनेवरुन चांगला अंक बनला तरी प्रतिसाद मिळेतो का? छापिल अंकांचा स्वतःचा येक वाचकवर्ग असतो , त्यामुळे अनुभव, अक्षर, अबकडई अशांच्या अंकाना प्रतिसाद मिळतो. मायबोलीच्या माझ्यासारख्या वाचकाचे "पॅकेज"त्या पातळीचे असेलच असे नाही Wink त्यामुळे सर्वसामावेशक अंकच बरा. नाहितर दोन आवृत्या काढा, येक जनरल आणि दुसरी खास Light 1
बाकी जुने /नवे यात फरक नकोच

१. थीम हवीच पण थीम हा एक वेगळा भाग ठेवा. अन्यथा जर पूर्ण अंक थीम्जवरच असायला हवा असेल तर एकापेक्षा जास्त थीम्ज घ्या. ज्यातल्या काही पॉप्युलर, रूळलेल्या वाटेवरच्या, हमखास स्वरूपाच्या असूदेत तर काही पूर्णपणे अनकॉमन, डोक्याला खाद्य स्वरूपाच्या, सटकेल्या अश्या असूदेत. जेणेकरून 'जो जे वांछिल तो ते लाहो' पर्यंत थोडेसे पोचता येईल Happy
२. प्रत्येक लिखाणाखाली वेगळी प्रतिक्रिया देता येण्याची सोय हवी.
३. मॅटर असलेल्या पानाचे डेकोरेशन मिनिमलिस्टीक आणि वाचायला कमीतकमी त्रास होईल असे असावे.
४. सरप्राइज अस!! Happy

नीधप १ लया मुद्ध्याला अनुमोदन, आम्च्या पॅकेज लायकिची येकतरी पॉप्युलर. रुळलेलेल्या वाटेवरची येखादी तरी थिम घ्याच

सायो, नीधप, श्यामली, रैना ह्यांना अनुमोदन !
हे सो कॉल्ड जुने आयडी म्हणजे काय मायबोलीवरचे लता/आशा आहेत का? लता/आशा वगैरे जसे आता नव्यांना वाव देण्यासाठी फिल्फफेअर आणि तत्सम पुरस्कार घेत नाहीत तसं हे जाहिर करतायत "आम्ही आता स्पर्धेत भाग घेणार नाही.. आम्ही आता दिवाळी अंकात लि़हीणार नाही... फक्त दाद देऊ वगैरे.." उगीच काय जुने/नवे !

२. प्रत्येक लिखाणाखाली वेगळी प्रतिक्रिया देता येण्याची सोय हवी. >>>> ह्यावर २०१० च्या मंडळाने (कदाचित २०११ च्याही) आणि 'लिंग निरपेक्ष ओळख/मैत्री' च्या संपादक मंडळाने सविस्तर चर्चा केली होती. अ‍ॅडमिनही अर्थात सहभागी होतेच. काही टेक्निकल समस्या होत्या..काही इतर.. ह्या वर्षीच्या मंडळाला तोडगा काही मिळो. Happy

ललितालाही अनुमोदन. नेहमीच्या टेम्प्लेटपेक्षा काहितरी वेगळं करता येईल का ह्याचा जरूर विचार करावा.

'लिंग निरपेक्ष ओळख/मैत्री' च्या संपादक मंडळाने सविस्तर चर्चा केली होती. <<<
आपल्याला मिळाली होती ती सोय पराग Happy

माझी फक्त सकस वाचायला मिळावे एवढीच अपेक्षा आहे.प्रमोद देव म्हणतात तसं उगाच ओडिओ विजुअल गिझ्मो असतील तर अंक लवकर लोड होत नाहि नी कामातून पटकन वाचता येत नाही. मी तरी मागच्या अंकातले असे प्रकार फारसे वाचले नाहीत. जालीय अंकात या माध्यमाचा पूर्ण वापर झाला पाहिजे हे खरे असले तरी मला का कुणास ठाऊक दिवाळी अंक फक्त वाचायलाच आवडतो.
मध्यवर्ती संकल्पना असायला हरकत नाही.
नवे जुने कोणीही लिहोत पण नव्याना (आय डी क्रमांकाना नव्हे Wink ) संधी द्यावी हे उत्तम.
फिल्मफेअर जसे देब्यु अ‍ॅवॉर्ड देत असे तसे इथे 'माझे पहिलेच जालीय लिखाण' असा एक विभाग असावा काय?

नवे जुने कोणीही लिहोत पण नव्याना (आय डी क्रमांकाना नव्हे ) संधी द्यावी हे उत्तम. <<<

माझ्या माहितीप्रमाणे इथे संधी देण्याचा प्रश्नच नसतो. साहित्य भरपूर आलेय आणि अंकाचा आकार काहीच्या बाहीच मोठ्ठा झालाय आणि म्हणून त्यातले काही लेख वगळावे लागत आहेत, अशी परिस्थिती नसते हो! लेखन पाठवण्याची अंतीम तारीख बर्‍याचदा वाढवण्यात येते, यावरून तरी हे पटावे. चांगले सकस लेख अधिकाधिक संख्येने यावेत आणि आपला भरगच्च वजनदार अंक मायबोलीकरांसमोर यावा यासाठी संपादक अक्षरशः धडपडत असतात. त्यातून हे नवेजुने कुठून आले मध्येच? अगदीच काहीच्या काही वाटले. माफ करा.

आलेल्या लेखातले तत्कालिन संपादक मंडळाला योग्य वाटलेले लेख अंकात असतात.
यात नव्याजुन्याचा संबंध कुठे आला?
उगाच काहीतरी.
बर मला हे कळत नाहीये ज्यांना नव्यांचा इतका कैवार आहे ते लोक संपादक मंडळात का जात नाहीत? जसे त्यांच्यामते सगळ्या नव्यांना वगळले जाते तसे त्यांनी मंडळात जाऊन सगळ्या जुन्यांना वगळावे की.

मी जुनाच असलो तरी यंदा नव्याने लिहायला घेणारेय दिवाळी अंकासाठी. मग माझे लिखाण घेणार कि रीजेक्ट करणार ????

>>दिनेशदा | 15 September, 2012 - 08:25
सायो, जून्यांची वर्णी लावावीच असा नियम आहे का कोण जाणे, नव्यांचे चांगले लेख डावलले जातात अशाने.
(पडद्यामागची उदाहरणे माहीत आहेत म्हणूनच तसे लिहिलेय ! )

कुठली पडद्यामागची उदाहरणे? काहीही पुरावे न देता केलेला अत्यंत बिनबुडाचा आरोप!!! हे असं (बेजबाबदार) विधान करताना 'जुन्या आणि जाणत्या' मायबोलीकरांनी थोडं भान / तारतम्य बाळगायला हवं. मायबोलीविषयी खास माहिती नसलेल्या, नव्यानं सभासद झालेल्यांना यातून अतिशय चुकीचा संदेश जाऊ शकतो, चुकीचं मत तयार होऊ शकतं!!

जुन्यांनी प्रतिसादापुरतं आणि नव्यांचा अ‍ॅक्टिव्ह सहभाग हे देखिल अतिशय निरर्थक!!

Pages