बालकविता

" रविवार आज रविवार -"

Submitted by विदेश on 17 March, 2013 - 00:23

"रविवार आज रविवार -" (बालकविता)

रविवार आज रविवार
किती छान छान वार
अभ्यास नाही शाळा नाही
खूप मजेचा आज वार !

मारामारी आणि कुस्ती
येत नाही मुळीच सुस्ती
खेळ खेळण्यांची कमाल
दिवसभर नुसती धमाल !

दिवसभर खाणेपिणे
नाचणे अन् हुंदडणे
गट्टी फू अभ्यासाशी
कट्टी फक्त खेळण्यांशी !

नाही धपाटा आईचा
नाही रट्टा बाबांचा
ताईचे ऐकायचे नाही
दादाशी बोलायचे नाही !

दोस्तमंडळ झिंदाबाद
मौजमस्ती झिंदाबाद
धिंगाणा गाणे गाणी
रंगीत फुग्याची पिपाणी !

शब्दखुणा: 

"माझे विमान - "

Submitted by विदेश on 16 March, 2013 - 14:24

ताई, कर ना लौकर घाई
विमान चालू करून देई -
चावी दे तू विमानाला
फिरवून आणिन मी तुजला !

खेळणी पसरली सगळीकडे
विमान सरकत नाही पुढे ,
भूभू, हत्ती, उंट नि घोडा -
विमान आले रस्ता सोडा !

विमान निघाले, हळूच ये ना
तायडे, खेळणी मोडतील ना...
विमान माझे छान किती
वाटत नाही आता भिती !

घेतला वेग विमानाने जरी
मधेच थांबले विमान तरी -
खुर्र्र... खुर्र... खट..गम्मत झाली
बघ ना ताई, चावी संपली !

.
.

शब्दखुणा: 

आई, अशी कशी ही दिवाळी !

Submitted by विदेश on 28 November, 2012 - 01:27

आई, अशी कशी ही दिवाळी
येते पटकन, सरते झटकन,
अभ्यासाला पुन्हा जुंपते
दहा दिवस का जाती चटकन !

फराळाच्या डब्यात मोठ्ठ्या
गोड गोड का तसेच उरते ?
चकली चिवडा चट्टामट्टा
पोटामध्ये भरकन जिरते !

भुईचक्र अन् टिकल्या आता
कंटाळा मज येइ उडवता -
धमाल दिसते मोठया हाती
बॉम्ब नि रॉकेट आवाज करता !

सुट्टी असते किती ग हट्टी
ठरल्या दिवशी येते जाते -
मित्रमंडळी गोळा होता
धमाल अमुची मनीं रहाते !

दिवाळी संपुन सुट्टी संपता
जुनाट दिसती नवीन कपडे...
आई, सांग ना दिवाळीस ग
बारा महिने थांब, तू इकडे !

शब्दखुणा: 

वाद्यवृंद - बालकविता Audio स्वरुपात :)

Submitted by सत्यजित on 10 March, 2012 - 06:17

वाद्यवृंद - विविधतेत एकता म्हणजेच Unity in Diversity

पेटी म्हणते सा रे ग
तबला म्हणतो धाक धिक ध
शिळ घाले बासुरी अन
ढोल म्हणतो धडाम ध

धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंना धिना

गिटार म्हणतं डिंग डींग डिंग
मेंडॉलीनची टींग टींग टींग
वायोलिन करे कूईं-कूईं कुई-कुई
तान घेते सतार गं

टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन
टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन

पैंजण करती छन छन छन
टाळ करती खण खण खण
घुंगरांची रुणझूण चाले
ताशा वाजे ढडाम ढं

ढींकचिका ढींकचिका ढींकचिका ढींकचिका
ए.. ए.. ए... ए.. ए.. ए.. ए... ए..

ट्रंपेट काढतो रे भोंगा
सेक्साफोनचा रे दंगा

गुलमोहर: 

फुगा फुटला

Submitted by pradyumnasantu on 27 January, 2012 - 14:40

बाळूकडे होता
एक रंगीत फुगा
मस्तीत त्याने टोकले
"काय रे ए ढगा"
ढग ओरडला,
"जमिनीवर काय रांगतो
इथे ये मग सांगतो"
फुगा जायला सुटला
अचानकच फुटला
साराच तिढा सुटला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चिऊताई रुसली

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 8 May, 2011 - 11:17

एक चिऊताई रुसली
झाडावर जाऊन बसली,

तिकडुन आली खारुताई
म्हणाली चल खेळू काही,
चिऊताईने फिरवली मान,
खारूताईचा केला अपमान,

मग आले ससोबाभाऊ
चिऊला म्हणे खातेस का खाऊ?
हातात पाहुन गाजर मुळा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लेकानं केलेली कविता

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'मराठी भाषा दिवस'निमित्ये लेकानं कविता केली होती. 'मायबोली'च्या उपक्रमाअंतर्गत ही कविता 'बालकवी'मध्ये द्यायची असेही ठरले होते. पण ऐनवेळी बरेच घात झाले आणि ही कविता त्या उपक्रमास वेळेत देता आली नाही. म्हणून ही आता इथे देत आहे.

कवितेतल्या सर्व कल्पना लेकाच्या आहेत. मी काही ठिकाणी यमकं जुळवायला मदत केली आहे. त्याचे मराठी शुद्धलेखन म्हणजे शुद्ध भाषेत सांगायचं तर बोंब आहे! Proud पण मी मुद्दामच त्यात बदल/ सुधारणा नाही केले. काही अवघड शब्द जसे की एल्ड्रॅगो, सॅजिटेरिओ वगैरे (ही विविध बेब्लेड्जची नावं आहेत) मी पाटीवर लिहीले आणि त्याने ते बघून उतरवलेत. त्यातही परत काही चुका आहेतच! Uhoh

प्रकार: 
शब्दखुणा: 

बोलगाणी -प्रवेशिका ३ (इंद्रधनुष्य )

Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 February, 2011 - 23:41
मायबोली ID : इंद्रधनुष्य
पाल्याचे नाव : श्रीशैल
वय : ३ वर्ष ३ महिने

बोलगाणी - प्रवेशिका २ (तोषवी)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 February, 2011 - 23:38
मायबोली आयडी - तोषवी
मुलीचे नाव - सानिका

हे गाणे माझ्या आजीने( सानिका च्या पणजी ने कै. सुधाताई लक्ष्मण जोशी ) माझ्या लहानपणी माझ्या साठी स्वतः रचले होते.

Pages

Subscribe to RSS - बालकविता