चांदोबाचा दिवा

Submitted by विदेश on 20 June, 2014 - 14:07

आई ग आई ,
चांदोबाचा दिवा
किती चांगला -
उंच उंच आकाशात
कुणी टांगला ..

आई ग आई ,
चांदण्यांच्या पणत्या
किती चांगल्या -
उंच उंच आकाशात
कुणी लावल्या ..

आई ग आई ,
दे ग शिडी मला
उंच उंच चढून -
चांदोबा-चांदण्या
आणीन मी काढून ..

आई ग आई ,
चांदोबा-चांदण्या
ठेऊन अंगणात -
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात ..

.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देव साहेब, सगीत/संगीत प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार !
सर्वश्री अ.अ.जोशी , बन्या मन:पूर्वक आभार !!