आदर्श पत्नी स्पर्धा

Submitted by अतरंगी on 2 September, 2018 - 23:05

नमस्कार मंडळी,

तर या वर्षी आपण श्रावणमासात आदर्श पती आणि पत्नी स्पर्धेचे आयोजन केले आहे. पहिल्या भागात आदर्श पती स्पर्धा झाल्या नंतर आता आपण आदर्श पत्नी या स्पर्धे कडे वळणार आहोत. या स्पर्धेत लग्नात किंवा लिव्ह ईन रिलेशनशिप मधे सर्वांना भाग घेता येईल. प्रश्न तयार करताना व्हॉट्सअप्प/ फेसबूक वर ढकलल्या जाणार्‍या सर्व पाणचट विनोदांचा आधार घेण्यात आला आहे.
स्पर्धा अतिशय सोप्पी आहे. तुम्ही फक्त खालील सर्व मुद्द्यांसमोर लिहिलेल्या मार्कांप्रमाणे स्वतःच्या पत्नीला अथवा स्त्रीयांनी स्वतःला गुण द्यायचे आहेत. ज्यांच्या गुणाची बेरीज जास्त होइल त्यांना विजेते घोषित करण्यात येईल.

सेमी ईंग्रजी वाल्यांसाठी टीपः- ऊणे म्हणजे मायनस आणि अधिक म्हणजे प्लस....

१. तुमच्या लग्नाला/ लिव्ह ईन रिलेशनला किती वर्षे झाली आहेत?
१ वर्षे किंवा कमी:- ऊणे १५, १ ते ५ वर्षे :- ऊणे ५, ५ ते १० वर्षे:- अधिक ५, १० ते १५ वर्षे:- अधिक १५, १५ ते २५ वर्षे:- अधिक २५, २५ ते
३५:- अधिक ३५, ३५ ते पुढे:- अधिक ५०.

२. तुमचे मागील ५ वर्षातील वास्तव्य कुठे आहे? भारताबाहेरः- ऊणे २०, भारतातील एका शहरातः- ऊणे ५, भारतातील एका गावातः- अधिक १०, भारतातील एका खेड्यातः- अधिक २५

३. तुमची पत्नी तुम्ही आयुष्यातले काही थोडेफार सोनेरी क्षण मित्रांसोबत अनुभवत असताना तुम्हाला फोन करुन कुठे आहात? किती वेळ लागेल? कधी येणार? असले प्रश्न विचारुन तुमच्या रंगाचा भंग करते का? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक ५

४. तिच्या माहेरच्यांची जशी सरबराई होते तशीच किंवा निदान त्याच्या ५०% तरी तुमच्या घरच्यांची होते का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

५. तुमच्या आडनावाचा उद्धार करुन “हे…..” सगळे असेच हे उठ्सुठ ऐकवते का? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक ५

६. कधीच्या काळी जर चूकुन माकुन एखादा दिवस ऑफिसला सुट्टी मिळाली किंवा ऑफिस मधून लवकर आलात तर तुम्हाला लगेच घरकाम किंवा चला ना फिरायला/ जेवायला/शॉपिंगला बाहेर जावू वगैरे टुमणे लावते का?हो:- ऊणे २ , नाही:- अधिक ५

७. तुम्ही तुमच्या कर्तबगारीचे दोन चार क्षण तिच्या समोर सांगत असताना स्वतःच्या भावाचे, वडीलांचे किस्से सांगून तुमचा कचरा करते का? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक ५

८. तुम्ही घरकाम करताना दुसर्‍यांदा एखादी चूक केली तरी तितक्याच शांतपणे सांगते का? हो:- अधिक २, नाही:- ऊणे २

९. तुम्ही काही करत नसताना "काय करतोयस?" किंवा "कसला विचार करतोयस?" असले प्रश्न सारखे सारखे विचारते का? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक २

१०. तुम्ही तिची चूक दाखवायची हिम्मत केलीच तर ती चूक ती मान्य करते का? हो:- अधिक २, नाही:- ऊणे ५

११. जरी मान्य करत नसेल तर तूमची चूक न दाखवता/ जुन्या गोष्टी उकरुन न काढता तिला स्वतःची चूक डिफेंड करता येते का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे २

१२. तुम्ही केलेल्या कांमामधे ज्या कामात ती चूका काढते ती कामे तिला स्वतःला नीट करता येतात का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

१३. तुम्ही दमला असाल तर स्वतःच्या दमण्याचे कौतुक न सांगता तुमची कंबर दाबून देणे, तुम्हाला मसाज देणे अशी कामे करते का? हो:- अधिक २, नाही:- ऊणे २

१४. ३६५ पैकी एक टक्का रात्री तरी स्वतःहुन पुढाकार घेते का? हो:- अधिक २, नाही:- ऊणे १०

१५. शॉपिंग, माहेरी जाणे असले उद्देश नसताना पण घेते का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे २

१६. जेवढी अपेक्षा तुम्ही शाहरुख सारखं रोमँटीक असावं अशी ठेवते त्या प्रमाणात शयनेषू रंभा व्हायचा निदान प्रयत्न तरी करते का? हो:- अधिक २, नाही:- ऊणे १०

१७. आपले वडील, सर्व भाऊ हे महा सज्जन अणि तुम्ही, तुमचे भाऊ, तुमचे मित्र हे सगळे बिघडलेले असा तिचा ठाम समज आहे का? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक ५

१८. तिला इलेक्ट्रिशीअन/ प्लंबर/ पेंटर/ गवंडी/ माळी/ हमाल आणि नवरा यातला फरक कळतो का? हो:- अधिक २, नाही:- ऊणे २

१९. तुमच्या (तिला माहित असलेल्या) मैत्रीणी/गफ्रे वरुन, त्यांच्या दिसण्यावरुन/ राहणीमानावरुन तुम्हाला टोमणे मारते का? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक ५

२०. तुमच्या निवांत क्षणी/ आरामाच्या/वामकुक्षीच्या वेळी/ टीव्ही बघताना तुम्हाला सुटलेल्या पोटाकडे बघून टोमणे मारते का? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक ५

२१. हे टोमणे मारत असताना स्वतः उगाच टिपिकल बायकी कारणे न देता स्वतः सुडौल बांधा राखुन आहे का? हो:- अधिक २, नाही:- ऊणे ५

२२. उगीचंच तुम्हाला डाएट, व्यायाम करायचे सल्ले देते का? हो:- ऊणे २ , नाही:- अधिक २

२३. मित्र, नातेवाईक, मैत्रीणी यांच्यासमोर तरी खोटे खोटे का होईना तुमचे कौतुक करते का? तुमचा कचरा न करता सन्मानाने वागवते का? हो:- अधिक २, नाही:- ऊणे २

२४. तुमच्या साधेपणाला गबाळेपणा म्हणून हिणवते का? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक २

२५. तुम्हाला बळेच तिच्या आवडीचे कपडे घालायला लावून तुम्हाला जोकर बनवते का? हो:- ऊणे २ , नाही:- अधिक २

२६. तुमचा पेग तुम्हाला कसा आवडतो हे तिला माहीत आहे का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे २

२७. कधी तरी स्वतःहुन तुम्हाला ती पेग बनवून देते का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे २

२८. तुम्ही घरीच "बसला" असाल तर, मुलांना खेळायाला/अभ्यासाला पाठवून तुम्हाला तुमचा आवडता चकणा बनवून देते का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे २

२९. प्यायल्यावर तुमचे जुने किस्से, पिण्याच्या स्टॅमिन्याची स्वयंस्तुती, तुमची आवडती गाणी प्रत्येक वेळेस न कंटाळता ऐकते का? हो:- अधिक १०, नाही:- ऊणे २

(तुम्ही जर "घेत" नसाल तर शुन्य मार्क द्या....... बायकोला नव्हे स्वतःला.....)

स्पर्धेचे नियम.

१. पुरुषांनी स्वतःच्याच बायकोचे मुल्यांकन करणे अपेक्षित आहे.
२. गुण लिहिताना लग्नाला किती वर्षे झाली हे लिहावे.
३. प्रश्ननाचे टंकलेखन करायला कामवार ठेवलेला माणूस सेमी ईंग्रजी वाला आसल्याने शुद्धलेखनातल्या चूका काढू नये.
४. सर्व स्पर्धकांनी ईथे प्रामणिकपणे आपल्या पत्नीचे किंवा स्त्रीयांनी स्वतःचे एकुण गुण लिहिणे अपेक्षित आहे. कोणाचे गुण खोटे आहेत असे आढळल्यास माबो वर जाहीर अपमान करण्यात येईल.
५. वरील प्रश्न सोडून तुम्हाला काही प्रश्न या स्पर्धेत असवे असे वाटत असेल तर ते प्रतिसादात लिहावे. पुढील वर्षीच्या स्पर्धेत ते विचारात घेतले जातील
६. आदर्श पती आणि पत्नी स्पर्धांचे विजेते श्रावण संपल्यावर घोषित करण्यात येतील.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२६

३०. तुम्ही प्यायला बसल्यावर, ती "माझा पण पेग भर रे!" म्हणून तुम्हाला कंपनी देते का?
हो. अधीक ५०. नाही. शून्य.

९ वर्षे. गुण ३
Submitted by पाथफाईंडर on 3 September, 2018 - 09:25
>>>>>
हा वर टंकलेला स्कोअर मी हाफीसातून टाकलाय. कारण घराच्या बाहेर मी'शेर" आहे. (बायको माबो वाचतेय.) जगलो वाचलो तर तिचे स्वमुल्यांकन टाकेन. Biggrin

पत्नी ही कायमच आदर्शच असतेच. त्यामुळे हा धागा अर्थहीन आहे>> +११११११११११
स्वमुल्यांकन >> +१४ Uhoh
२ वर्षे जुन लग्न आहे

मला ती ऊणे अधिक भान्गड कळत नाहीये. माझा स्कोर द्या काढुन कुणीतरी. Happy
अधिक गुणांमधुन ऊणे गुण वजा करायचे का?
लग्नाला १४ वर्षे झालीत.
अधिक ८१ आणि ऊणे३७ = ??

लग्न झाल्या झाल्या ' आदर्श' वागणं हे काही खरं नसतं. जितकी जास्त वर्षं हे वागणं टिकेल तितके जास्त मार्क असं लॉजिक असणार. त्याचप्रमाणे परदेशात राहताना नवरे बायकांना ( स्वतःच्या ) जास्त मदत करत असावेत ( असं भारतात राहून मला वाटतं). त्या दृष्टीनेही उतरती भाजणी असेल.

आता आदर्श सासू, सासरे, नणंद, भावजय, पुत्र पुत्री, जावई अशी लागोपाठ सिरीज सुरु करा.>>>>>>>

बोकलत,
चांगली कल्पना आहे.

वावे, बरोबर आहे.

सर्व वयोगटातील, देशी परदेशी स्थायिक लोकांना समान संधी देण्यासाठी, पहिल्या दोन मुद्दयातील गुण तसे ठेवले आहेत.

१ वर्षे किंवा कमी:- ऊणे १५, १ ते ३ वर्षे :- ऊणे ५, ५ ते १० वर्षे:- अधिक ५, १० ते १५ वर्षे:- अधिक १५, १५ ते २५ वर्षे:- अधिक २५>>>>> ४ वर्षे पूर्ण असणारे यामध्ये include नाहीत का?? का??
पत्नी ही कायमच आदर्शच असतेच. त्यामुळे हा धागा अर्थहीन आहे. >>>>>+१२३४५६७८९१०

इतके प्रश्न?
एकच प्रश्न पुरेसा असतांना..

>>> तुम्ही जर "घेत" नसाल तर शुन्य मार्क द्या....... बायकोला नव्हे स्वतःला.....

ह्यावर थोडा वेगळा विचार
टाइम मॅगझिनवर आलेल्या ह्या "नव्या" बातमीनुसार:
"नवीन" अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की मद्यपान करण्याची कोणतीही पद्धत आपल्यासाठी वाईट आहे. Light 1

विशेषज्ञांचे येथे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी येथे टिचकी मारा:
http://time.com/5376552/how-much-alcohol-to-drink-study/

तर, माझी सूचना खालीलप्रमाणे आहे:
१. तुम्ही जर "घेत" नसाल तर +१० मार्क द्या (स्वतःला)
२. तुम्ही जर "सोडली" असेल (कायमची), तर कितीही मार्क दिले तरी कमीच
३. तुम्ही जर "घेत" असाल, तर.... जाऊ द्या, "घेणाऱ्यांचा" राग ओढवून "घ्यायचा" नाहीये मला Happy

टीप: "घेण्या" वर चार प्रश्न जरा "जास्तंच झाले" असं मला वाटतं. Uhoh

>>> पत्नी ही कायमच आदर्शच असतेच. त्यामुळे हा धागा अर्थहीन आहे.

सारं जीवनाचं सार ह्या एका वाक्यात सामावलेलं आहे. क्या बात है! (हा स्वप्नील जोशींचा प्रभाव नाही, तर ही ओरिजिनल प्रतिक्रिया आहे)

टीप: पत्नीला केलेली पहिली स्वमूल्यांकनाची विनंती तिने साफ फेटाळून लावली. पुन्हा प्रयत्नं करावा लागेल. Biggrin Biggrin

मला उगाचच का वाटतेय की, "पत्नी ही आदर्शच असते अन हा धागा अर्थहीन आहे" या प्रतीसादाला भगिनीवर्ग थोडा जास्तच सपोर्ट करत आहेत (या धाग्यावर स्वमुल्यांकन कमी आहेत Biggrin ). आदर्श पती धाग्यावर भगिनीवर्ग किंचित अधिक सक्रिय होता. (बघूया काडी तर टाकलीयं )

-१० (८ वर्षे)

मला उगाचच का वाटतेय की, "पत्नी ही आदर्शच असते अन हा धागा अर्थहीन आहे" या प्रतीसादाला भगिनीवर्ग थोडा जास्तच सपोर्ट करत आहेत (या धाग्यावर स्वमुल्यांकन कमी आहेत ). आदर्श पती धाग्यावर भगिनीवर्ग किंचित अधिक सक्रिय होता. (बघूया काडी तर टाकलीयं )>>> ३ ते ५ मधल्यांच काय?? ईथे criteria नाहीच दिलाय मग कसं करणार मुल्यांकन??

@किट्टु२१
मान गये आपकी नजरको. आम्ही बावळटा सारखे तो प्रश्न ऑप्शनला टाकून पुढे सरकलो. Rofl Light 1

Pages