आदर्श पती स्पर्धा

Submitted by अतरंगी on 26 August, 2018 - 13:06

नमस्कार मंडळी,

तर या वर्षी आपण श्रावणमासात आदर्श पती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत लग्नात किंवा लिव्ह ईन रिलेशनशिप मधे असलेल्या सर्वांना भाग घेता येईल. प्रश्न तयार करताना व्हॉट्सअप्प/ फेसबूक वर ढकलल्या जाणार्‍या सर्व पाणचट विनोदांचा आधार घेण्यात आला आहे.
स्पर्धा अतिशय सोप्पी आहे. तुम्ही फक्त खालील सर्व मुद्द्यांसमोर लिहिलेल्या मार्कांप्रमाणे स्वतःच्या पतीला अथवा स्वतःला गुण द्यायचे आहेत. ज्यांच्या गुणाची बेरीज जास्त होइल त्यांना विजेते घोषित करण्यात येईल.

सेमी ईंग्रजी वाल्यांसाठी टीपः- ऊणे म्हणजे मायनस आणि अधिक म्हणजे प्लस....

१. तुमच्या लग्नाला/ लिव्ह ईन रिलेशनला किती वर्षे झाली आहेत?
१ वर्षे किंवा कमी:- ऊणे १५, १ ते ३ वर्षे :- ऊणे ५, ५ ते १० वर्षे:- अधिक ५, १० ते १५ वर्षे:- अधिक १५, १५ ते २५ वर्षे:- अधिक २५, २५ ते
३५:- अधिक ३५, ३५ ते पुढे:- अधिक ५०.

२. तुमचे मागील ५ वर्षातील वास्तव्य कुठे आहे? भारताबाहेरः- ऊणे २०, भारतातील एका शहरातः- ऊणे ५, भारतातील एका गावातः- अधिक १०, भारतातील एका खेड्यातः- अधिक २५

३. तुम्ही शॉपिंगला जायचं म्हणता तेव्हा तुम्हाला नवरा तुमच्या कपाटात असलेल्या असंख्य कपड्यांवरुन टोमणा मारतो का? हो:- ऊणे २, नाही:- अधिक ५

४. नवरा तुमच्यासोबत शॉपिंगला येतो का? हो:- अधिक २, नाही:- ऊणे २

५. शॉपिंगला आल्यावर तो शॉपिंगमधे रस दाखवण्याऐवजी एखादा कोपरा पकडून मोबाईल मधे डोकं घालून बसतो की शॉपिंगला आलेल्या दुसर्‍या बायकांकडे बघत बसतो? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक २

६. शॉपिंग करताना तुमच्याकडे एखाद्या विशिष्ठ रंगाचा ड्रेस/साडी आहे हे त्याला माहीत असते का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

७. नवरा स्वतःच्या कपड्यांसोबत तुमचे कपडे पण मशीनला लावतो का/ धूतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

८. धूतल्यावर ते वाळत घालतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

९. वाळल्यावर तो ते काढून घडी करुन तुमच्या कपाटात ठेवतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१०. हे सर्व तो त्याच्या आई वडीलांसमोर, मित्रांसमोर करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

११. नवरा "तसला" काही उद्देश नसताना कंबर, डोकं, हात, पाय दाबून देतो का? हो:- अधिक १ , नाही:- ऊणे १०

१२. तू किती दमतेस असे मनापासून म्हणताना "निस्वार्थपणे" जवळ घेतो का? हो:- अधिक १ , नाही:- ऊणे
१०

१३. तुम्ही कधी माहेरी किंवा ट्रिपला गेल्यास त्याला मनातल्या मनात आनंद होतो का? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक ५

१४. तुम्ही कधी माहेरी किंवा मैत्रिणींसोबत ट्रिपला गेल्यास तो कामशिवाय फोन करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१५. फोन केल्यास तुमच्या भीतीने औपचारीकता म्हणून न करता खरेच आठवण येत असते म्हणून करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१६. शुद्धीत असताना सुद्धा तुम्हाला मिस यू, लव्ह यू असे मेसेज करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१७. घरुन ऑफिसला आणि ऑफिसवरुन घरी असे वर्षातील कमीत कमी ९९% दिवस करतो का?हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१८. ऑफिस सुटल्यावर सरळ घरी येतो की चौकात, टपरीवर मित्रांकडे असे स्टॉप्स घेत घेत येतो ? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१९. आलोच ५ मिनिटात असे म्हणून खरेच ५ मिनिटात येतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२०. कुठे आहात असे विचारल्यावर कुठे आहे ते खरे खरे सांगतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२१. न सांगता स्वयंपाकात मदत करतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२२. एखाद्या वेळेस तुम्ही घराबाहेर असाल तर स्वतः होउन स्वयंपाकाची तयरी किंवा पुर्ण स्वयंपाक करतो का किंवा निदान जेवण बाहेरुन तरी मागवतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२३. स्वयंपाक केला तर बेसिन मधे भांड्यांचा ढिगारा करुन ठेवतो कि खरकटे काढून विसळून ठेवतो? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२४. त्याला पुसायची फडकी आणि स्वयंपाकाची फडकी यातील फरक कळतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२५. तुमच्या स्वच्छतेच्या व्याख्येप्रमाणे त्याला किचन स्वच्छ ठेवता येते का? हो:- अधिक १०, नाही:- ऊणे ५

२६. तुमच्या स्वयंपाकाला नावं ठेवण्याचा उद्धटपणा तो करतो का? हो:- ऊणे ५, नाही:- अधिक ५

२७. स्वतःच्या आईच्या हातच्या चवीचे कौतुक न सांगता तो वर्षातून ५०% वेळा तरी जेवतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

२८. त्याच्या मोबाईलचे आणि सर्व अ‍ॅप्सचे पासवर्ड तुम्हाला दाखवले आहेत का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

२९. ते पासवर्ड्स बदलल्यास तो स्वतःहुन सांगतो का? हो:- अधिक १० , नाही:- ऊणे १

३०. घरातले वातवरण टेन्स झालेले असताना किंवा तुमचे भांडण झालेले असताना एखादा पाणचट का होईना जोक करुन वातावरण हलके करायचा प्रयत्न करतो का? हो:- अधिक १० , नाही:- ऊणे ५

३१. तुम्हाला हसतमुख ठेवायचा प्रयत्न करतो का?हो:- अधिक १० , नाही:- ऊणे १०

३२. त्यात यशस्वी होतो का? हो:- अधिक १० , नाही:- ०

स्पर्धेचे नियम.

१. स्त्रीयांनी स्वतःच्याच नवर्‍याचे मुल्यांकन करणे अपेक्षित आहे.
२. गुण लिहिताना लग्नाला किती वर्षे झाली हे लिहावे.
३. प्रश्ननाचे टंकलेखन करायला कामवार ठेवलेला माणूस सेमी ईंग्रजी वाला आसल्याने शुद्धलेखनातल्या चूका काढू नये.
४. सर्व स्पर्धकांनी ईथे प्रामणिकपणे आपल्या पतीचे किंवा स्वतःचे एकुण गुण लिहिणे अपेक्षित आहे. कोणाचे गुण खोटे आहेत असे आढळल्यास माबो वर जाहीर अपमान करण्यात येईल.
५. वरील प्रश्न सोडून तुम्हाला काही प्रश्न या स्पर्धेत असवे असे वाटत असेल तर ते प्रतिसादात लिहावे. पुढील वर्षीच्या स्पर्धेत ते विचारात घेतले जातील
६. पुढच्या श्रावणी सोमवारी आदर्श पत्नी स्पर्धेची घोषणा करण्यात येईल.
७. दोन्ही स्पर्धांचे विजेते श्रावण संपल्यावर घोषित करण्यात येतील.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल आहे हे..
माझा स्कोअर : + १०
लग्नाला झालेली वर्षे : + ७

३३. अंघोळ झाल्या झाल्या न्हाणीघरातील फरशी पाण्याने साफ करून न्हाणीट्रॅप मधील केसांचा पुंजका उचलून कचरापेटीत टाकतो का?

३४. लिक्विड सोप डिस्पेन्सर मधील साबण संपलेय हे लक्षात येताच, त्यात लिक्विड सोप भरून ठेवतो का?

३५. अंडी विकत आणल्यावर ती तशीच फ्रीजमध्ये डंप न करता आधी धुवून आणि पुसून मग ठेवतो का?

३६. छत्री बंद करून कशी बशी तीची नाडी ओढून ताणून तिचे बटन न लावता, छत्रीची एक एक निरी व्यवस्थित काढून त्या गोल गुंडाळून मग लावतो का?

३७. प्रवासाला जाताना / प्रवासाहून आल्यावर, सुटकेस सरळ गादीवर ठेवून न उघडता, खाली वर्तमानपत्र पसरून त्यावर ठेवतो का?

३८. "अरे कीती घाण झालाय तुझा पॉकेट कोंब, बदल की आता!" हे सांगण्यापूर्वी स्वतःहून बदलतो का?

३९. "अरे किती भोक पडत चाललीय त्या गंजीफ्रॉकला, घे की नवीन आता तरी!" असे संगण्यापूर्वी स्वतःहून नवीन घेतो का?

४०. भिंतीला ड्रिल करून स्क्रू बसवण्यापूर्वी खाली वर्तमानपत्र ठेवून त्यावर धूळ पडेल आणि स्वतःलाच ती लगेच साफ करता येईल असे आवर्जून करतो का?

४१. वरवंट्यावर नारळ फोडण्यापूर्वी त्याखाली वर्तमानपत्र ठेवून, मग फोडून झाल्यावर नारळाचे सांडलेले पाणी पुसुन घेतो का?

४२. कफ सिरप वगैरे घेताना ते त्या बाटलीच्या झाकणानेच घेऊन ते झाकण तसेच बाटलीवर लावण्याऐवजी, सिरप चमच्याने घेऊन, मग झाकण लावून बाटलीवर सिरपचे ओघळ येत नाही ना, असतील तर बंद बाटली नळाखाली धरून मग पुसून ठेवतो का?

भारीये हे Lol

१) आंघोळ झाल्यावर स्वतःचा टॉवेल नीट वाळत घालणे, गादीवर अजिबात न टाकणे
२) मळलेले कपडे, कपाटात न कोंबता धुवायला टाकणे
३) हाक मारल्यावर मोबाईल मधून डोके वर करणे, ओ देणे

35) अंडी धुवून पुसून????
च्यायला, उद्या आंघोळ केलेल्या कोंबडीची अंडी आणता का? म्हणून विचारतील

ताक: आमचा मुलाणी, स्वच्छ अडीच विकतो

मस्त.
मी माझे मार्क्स मोजत होते. पण बरचसं ऊणं व्हायला लागलं मग थांबवलं. Happy
मानव पृथ्वीकर, हे असं कोण करतं? कुणी म्हणेल माझा नवरा करतो तर अफवा आहे म्हणा. Happy

@सिम्ब: सोवळं म्हणून नाही हो. बाजारातील अंड्यांना बरेचदा डाग, काहीबाही चिकटलेलं असतं. धुवून पुसून घेतली की काय मस्त पांढरी शुभ्र दिसतात.

@सस्मित: असतात हो काही नमुने. बिचाऱ्या बायकोला नसता वैताग. मग ती फूल यांच्या भाषेत चर्चेने प्रश्न सोडवते.

दुध, दही ताक हे घेऊन झाल्यावर फ्रिजमधे ठेवताना व्यवस्थित ओघळ पुसून ठेवतो का ? की भांड्याच्या बाजूने दुधा-दह्याचे ठिपके दुसर्‍य दिवशी तुम्हाला पुसावे लागतात?
शेवटचे बिस्कीट, बाकरवडी, किंवा ब्रेड संपवल्यावर प्लॅस्टीक्ची पिशवी टाकून ड्बा घासायला टाकतो की नुसतेच झाकण लावून बंद करून ठेवतो?
पाहुणे आल्यावर, बाहेरच्या खोलीत बसून त्यांना आग्रह करत असताना आत तो पदार्थ संपलाय की आहे ह्याचं भान त्याला असतं का?

मेधावि,

पाहुणे आल्यावर, बाहेरच्या खोलीत बसून त्यांना आग्रह करत असताना आत तो पदार्थ संपलाय की आहे ह्याचं भान त्याला असतं का?

या मुद्द्याला माझी बायको मला -१०० वगैरे गुण देईल Lol

त्याला पुसायची फडकी आणि स्वयंपाकाची फडकी यातील फरक कळतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५
हा प्रश्नच पडत नाही कारण पंखा/खिडकी पुसायची वेळ आलीच तर शिडीवर चढून मगच फडकं मागायचं ही ट्रीक ठरलेली आहे. गाडी पुसायची असेल तर खाली जाऊन मग हाक मारून फडकं मागायचं...

अर्थात नसतं म्हणून.

एक दोन वेळा पंगत चालू असताना मीच तिला ओरडलो कि अगं लवकर आण, ताटातला पदार्थ संपला आहे.

आणि पाहुणे गेल्यावर माझं काय झालं असेल ते सर्वश्रुत आहेच.....

>>>>>हा प्रश्नच पडत नाही कारण पंखा/खिडकी पुसायची वेळ आलीच तर शिडीवर चढून मगच फडकं मागायचं ही ट्रीक ठरलेली आहे. गाडी पुसायची असेल तर खाली जाऊन मग हाक मारून फडकं मागायचं...>>>>>

Lol

Lol मज्जा आली मला calculate करताना आणि माझ्या नवर्‍याला चक्क +44 मार्क्स मिळालेत याचं खरंतर आश्चर्य वाटतंय... लग्नाला साडेपाच वर्षे झालीत..

मस्त ... पण माझा स्कोर लयच आहे राव ७३ आणि लग्नाला २ वर्षे झाली ( टीप आमचा लव्ह कम अरेन्ज लग्न आहे )

३६) तुम्ही त्याच्याशी महत्वाचं बोलत असताना तो नुसतच मान हलवून हो हो म्हणतॊ (म्हणजे खर तर ऐकतच नसतो ) का ?
नाही : अधिक २०, हो : उणे २०

तुम्ही त्याच्याशी महत्वाचं बोलत असताना तो नुसतच मान हलवून हो हो म्हणतॊ (म्हणजे खर तर ऐकतच नसतो ) का ?
नाही : अधिक २०, हो : उणे २०>>>>>>१ बरोबर

भारीये हे.
बापरे!! तब्बल ९९ मार्क्स मिळाले
लग्नाला १७ वर्षे झालीत
(पण यातील काही मुद्दे कधी कधी असे ही आहेत. :))

राजसी,

टाका ईथे ती लिस्ट. त्याला पण मार्कस देऊन ठेऊ.

Pages