....

Submitted by अज्ञातवासी on 22 December, 2018 - 12:37

एका हलकट, मनोरुग्ण आणि निर्लज्ज व्यक्तीसाठी हे कुरण मोकळं सोडलंय. त्याने जी घाण करायची ती इथेच करावी. मी त्याच्या एकाही प्रतिसादाला उत्तर दिलेलं नाही, आणि देणारही नाही.
तुमचा नंगानाच चालू दयावा ही विनंती.
ऍडमिनने कृपा करून हा धागा उडवू नये.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट पाहिला नाही कदाचित पाहणार ही नाही .
पण ट्रेलर , गाणी बघितली आहेत त्यावरून ...

आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा.. >>>>> + १००००००००००००००००००००

कमल हसनचा अप्पू ब्येष्ट !!

कमल हसनचा अप्पू ब्येष्ट !! >>>>>> हेच लिहायचं होतं स्वस्ति मला, पण जमेल तितकं तटस्थ परीक्षण कुणाशीही तुलना न करता लिहायचं होतं, त्यामुळे हात आवरला... Happy
थँक्स.

परीक्षण अगदी रोखठोक. छान. प्रेक्षक बदलले, पण शाहरूख काही बदलायला तयार नाही. त्याचा देवानंद होऊ नये म्हणजे झालं...

>>त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!>>
हे अगदी मनापासून पटलं... त्या बुव्वा सिंग सगळे का भाव देतायत अस वाटलं आणि मग लक्ष्यात आलं की ते बुव्वा सिंग या कॅरॅक्टर ला भाव देत नसून शाहरुख खान ला भाव देतायत.. अगदी दोन्ही हिरविणी किंवा आजू बाजू चे सगळे शाहरुख आहे बाबा म्हणून आलेत काम करायला असं वाटलं.. अनुष्का बाबतीत पण अचूक लिहिलंय... आधी च शाहरुखचा बुव्वा बघून डोक्याला झिणझिण्या येत होत्या त्यात ही डक बया आली...आधी जरा तरी आवडायची पण ओठाचा डोनाल्ड डक केल्यापासून डोक्यातच जायला लागली... आणि त्यात ते तोंड वेंगाडंण आणि हलणं... भयंकर... कॅट बाईंचं पण तेच...डोनाल्ड डक आहे पण हिच्या पेक्षा जरा कमी... आधी क्युट वाटायची पण आता सुजलीये ती रणबीर ने टाकल्यापासून.. 1 किंवा 2 सीनमध्ये च जरा बरी वाटली... नवरा म्हणाला त्यापेक्षा 2.0 किंवा केदारनाथ परवडला असता... जवळजवळ आख्ख थेटर खाली आणि काही अर्ध्या तासात जे गेले ते आलेच नाहीत... शाहरुख ने आता चरित्र भूमिका कराव्यात स्वतःची च डिग्निटी राखली जाईल त्याने.. आणि काजोल,आलिया,दीपिका,श्रीदेवी,जुही बळच एका सिनसाठी... ओव्हर ऑल फ्लॉप...पहिल्या दुसऱ्या वीक ला जी काय कमाई होईल तीच बहुतेक...

मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला.
>>>>>

हे फार महत्वाचे आहे. भारतासारख्या देशात चित्रपट असेच बनवावेत. अन्यथा एक दुजे के लिये पासून खुद्द शाहरूखच्याच डर पर्यण्तचे अनुभव आहेत. चित्रपट त्यात खोलवर घुसून प्रभाव पाडणारे बनवले तर येथील जनता त्यातील नेमके नको ते उचलते.

कलात्मक चित्रपटांनी हबे ते विषय हाताळावेत. पण लोकप्रिय कलाकारांनी चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे हे ध्यानात ठेऊन निव्वळ आनंद देणारेच चित्रपट बनवावेत.

इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल,
>>>>>

हे मात्र काही पटले नाही.
म्हणजे सुण्दरतेला अण्डएस्टीमेट केल्यासारखे वाटले.
सौण्दर्याला कालही डिमांड होता, आजही आहे आणि उद्याही राहणार.
एखादी कुरुप चेहरयाची व्यक्ती कितीही उच्च कोटीचा अभिनय करत असली तरी तिला ईतर कुठल्याही भुमिका मिळतील पण हिरो हिरोईन म्हणून त्यांचा स्विकार आपणच करणार नाही हे सत्य आहे.

चित्रपटातच कश्याला? लग्न जमवतानाही जोडीदाराच्या सौंदर्याला किती प्राधान्य दिले जाते हे दाखवायला कुठल्या आकड्यांची गरज नाही.

सौण्दर्य हा देखील अभिनयासारखाच एक पैलू आहे. दर्शक सुखावतात Happy

गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो.

√√√√√

हे फार गरजेचे होते. शाहरूखने कुठल्याही भुमिकेत आपल्यातील शाहरूख दिसेल याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण ती त्याची स्ट्रेंथ आहे. त्याचा एक्स फॅक्टर आहे. त्याला दडपून कॅरेक्टर साकारण्यात काही अर्थ नाही. अन्यथा शाहरूखचे करोडो चाहतेच या चित्रपटाकडे पाठ फिरवतील.

'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत.

√√√√√

शाहरूख आणि सलमानचे गाणेही छान आहे तसे.
पण येस्स √√√. अजय अतुल हिंदीत नेहमी आपटी खातात हे खरे आहे आणि का ते समजत नाही. त्यांनी आता मराठीतच आपल्या मातीतलेच संगीत द्यावे.
मेरे नाम तू हे गाणे सैराट कम धडक टायटल सॉगच्याच रांगेतील असल्याने त्याचेही त्यांना वेगळे गुण द्यावेसे वाटत नाहीत.

अश्या चित्रपटांना चांगल्या संगीताची किंबहुना चांगल्या बॅकग्राऊंड म्युजिकची फार गरज असते. जर अजय अतुल यांनी त्यात निराशाजनक कामगिरी केली असेल तर चित्रपटाला त्याचा फटका बसणार..

छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.

√√√√√

मोठ्या पडद्यावर २०० कोटी बजेटचा सिनेमा ३०० रुपयांचे तिकीट काढून पॉपकॉर्न पेप्सी प्रवासभाडे पकडून जवळपास ५०० रुपये पर डोई खर्चून चित्रपट बघताना असे भव्य दिव्य नेत्रसुखद आणि लार्जर दॅन लाईफ बघायला मिळणे फार गरजेचे.
अन्यथा चित्रपट कितीही चांगला असला आणि आपल्याला आवडला तरी घरी छोट्या स्क्रीनवर बघितला असता तरी चालले असते असे वाटत राहते.

कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे.
>>>>

हिच खरे तर वाचायला ईथे आलेलो. पण अजूनपर्यण्त एकाही परीक्षणात ही फोडलेली नाही. असे वाटते सब शाहरूखसे मिले हुये है Happy
नक्की काय अशी कथा आहे. शाहरूख रॉकेटने चंद्रावर जातो की मंगळावर जातो आणि का जातो हे प्रश्न डोक्याचा भुगा करत आहेत Sad

कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय.

√√√√

त्या बुव्वा सिंग सगळे का भाव देतायत अस वाटलं आणि मग लक्ष्यात आलं की ते बुव्वा सिंग या कॅरॅक्टर ला भाव देत नसून शाहरुख खान ला भाव देतायत.. अगदी दोन्ही हिरविणी किंवा आजू बाजू चे सगळे शाहरुख आहे बाबा म्हणून आलेत काम करायला असं वाटलं..

√√√√√

शाहरूखबाबत हे नेहमीच होत. आणि हे त्याचे दुर्दैव्य आहे.
कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो तसे कोणताही कलाकार हा कलाकृतीपेक्षा मोठा नसतो. पण दुर्दैवाने शाहरूख तसा झालाय वा सहकलाकारांनी त्याला तसे बनवलेय. परीणामी शाहरूखची अदाकारी कितीही चांगली झाली तरी ती चित्रपटाला तारू शकत नाही.

उत्तम परीक्षण.
प्रतिसादात धागा ऋन्मेषवासी झाला.

नक्की काय अशी कथा आहे. शाहरूख रॉकेटने चंद्रावर जातो की मंगळावर जातो आणि का जातो हे प्रश्न डोक्याचा भुगा करत आहेत Sad.>> तुम्ही अजुन बघितलाच नाही?? आश्चर्य आहे

तुम्ही अजुन बघितलाच नाही?? आश्चर्य आहे
>>>>>

यात आश्चर्य कसले?
मी दुसरया धाग्यावर म्हटल्याप्रमाणे शाहरूखचा चाहता हा कमालीचा बुद्धीजीवी वर्ग आहे. तो शक्यतो त्याचे चांगलेच चित्रपट बघतो आणि त्याने चांगली अदाकारी दाखवलीय तेच उचलून धरतो.
शाहरूखने काहीही करावे आणि मी त्याचे कौतुक करावे यातला मी नाही.
पण येस्स जेव्हा ट्रेलर बघून वा साधे पोस्टर बघूनही आतून एक आवाज येतो तेव्हा ते चित्रपट जरूर फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो. आणि आजवर यात फसलोही नाही. जसे की,
मै हू ना
कल हो ना हो
कभी खुशी कभी गम
मोहोब्बते
चक दे
माय नेम ईझ खान
चेन्नई एक्स्प्रेस

हे काही चटचट आठवणारे चित्रपट जे मी पहिल्याच दिवशी पाहिले. यातही गेल्या काही वर्षात चेन्नई एक्सप्रेसच पहिल्या दिवशी पाहिलेला आहे. धमाल होता.

अरे हो, डिअर झिंदगी सुद्धा सेकंड डे पाहिला होता. तो सुद्धा बरेपैकी आवडला होता.
पण तो बघण्याआधी मी यूट्यूबवर पहिल्या दिवशीचे पब्लिक रिव्यू पाहिले होते..सिंगल स्क्रीन वाली पब्लिक चित्रपटाला बोअर बोलत होते, शाहरूखला शिव्या घालत होते. तर मल्टीप्लेक्सचा मॉडर्न यंग क्राऊड तोंड फाटेस्तोवर कौतुक करत होते. मी यातल्या कुठल्या गटात बसतो हे मी ठरवले आणि बघायला गेलो.

“#Zero slips on Day 2… Biz should’ve witnessed solid growth on Day 2 after an underwhelming Day 1, but is struggling at the BO… Decline on Day 2 [vis-à-vis Day 1]: 9.53%… Fri 20.14 cr, Sat 18.22 cr. Total: ₹ 38.36 cr. India biz.”
तरण आदर्शच हे ट्विट बघितलं, तर झिरो फ्लॉप होण्याच्या उंबरठ्यावर आहे असं वाटतंय. कारण जनरली शुक्रवार हा कामाचा दिवस असून, शनिवारी लोक चित्रपट बघायला जात असल्याने शनिवारच्या कलेक्शन नेहमी जास्त असतं. जर माऊथ पब्लिसिटी निगेटिव्ह झाली, तर शनिवार डाउन होतो आणि चित्रपट हमखास पडतो. इथेही तोच किस्सा वाटतोय...
असो, २०१८ ने तिन्ही खानाची सद्दी संपवायला सुरुवात केलीये असं म्हणायला हरकत नाही...

धागा हायजॅक झाला/ धागा अवसान हरवुन बसला/ धागा गळाठला/ धागा थरथरला ........

आता पळा नाहीतर सुनामी येईल स्वगताची...

हे खर आहे की शाहरूख देव आनंद राजेश खन्ना च्या मार्गाने जातोय. त्याचा कमल हसन व्हायची भीती जास्त वाटते.
असो! झीरो झीरोच ठरला.

असो, २०१८ ने तिन्ही खानाची सद्दी संपवायला सुरुवात केलीये असं म्हणायला हरकत नाही...
>>>>>

येस्स, ट्रेंड तसाच आहे

सलमान संपेल. त्याचे चाहते त्याचे तेच तेच दाक्षिणात्य मसाला स्टाईल चित्रपट बघून बोअर झाले की तो संपला.

आमीर देखील बॉलीवूडचा कमल हसन होण्याच्या मार्गावर आहे. थोडेफार रंगरंगोटी प्रयोग करून फुल्ल टाईम समाजकार्यात रममाण होईल.

शाहरूखची मात्र केस वेगळी आहे. त्याचे ओळीने सलग दहा चित्रपट टोटल झिरो झाले तरी शाहरूख हा शाहरूखच राहील. कारण त्याचे स्टारडम चित्रपटांपलीकडचे आहे.

धागा हायजॅक झाला/ धागा अवसान हरवुन बसला/ धागा गळाठला/ धागा थरथरला ........

आता पळा नाहीतर सुनामी येईल स्वगताची...>>>>> म्हणलं ना !!

त्याचे ओळीने सलग दहा चित्रपट टोटल झिरो झाले तरी शाहरूख हा शाहरूखच राहील. कारण त्याचे स्टारडम चित्रपटांपलीकडचे आहे. >>> +११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
ऋन्मेष ह्यांचे हे वाक्य चंदनाच्या लाकडावर सोनेरी शब्दात कोरून ठेवले पाहिजे. चंदनाचा सुवास आणि सोन्याची झळाळी कुठल्याही ऋतूत कमी होत नाही. पण पावसाळा आला की आपल्याला वाटते सुवास आणि झळाळी कमी झाली आणि ऊन्हाळा आला की अचानक सुवास पुन्हा दरवळायला लागतो सोने चमकायला लागते. खरं तर सुवास आणि झळाळी आहे तशीच आणि तेवढीच असते पण आपल्या मनाच्या स्थितीनुसार आपण ती अनुभवतो. (काही जळाऊ(लुझर) लोकांसाठी सगळे दिवस पावसाळेच असतात)
शाहरूखचे (आणि फक्त शाहरूखचेच बरंका) सुद्धा तसेच आहे चित्रपटांचे ऊन्हाळे,पावसाळे येत जात राहतील पण शाहरूखचा फेम, स्टारडम, श्रीमंती आणि सर्वात महत्वाचे क्लीन ईमेज (जिला आजच्या जमान्यात बिलिअन डॉलर पेक्षा जास्त वॅल्यू आहे) चंदन आणि सोन्यासारखे झळाळत राहिल.
धन्यवाद

सर्वात महत्वाचे क्लीन ईमेज (जिला आजच्या जमान्यात बिलिअन डॉलर पेक्षा जास्त वॅल्यू आहे) चंदन आणि सोन्यासारखे झळाळत राहिल.
>>>>>>>>

हा खरेच खूप महत्वाचा मुद्दा अहे. मी शक्यतो चित्रपटांच्या चर्चेत वैयक्तिक आयुष्य नको म्हणून यावर चर्चा टाळतो. पण आज या ईंडस्ट्रीत एवढी वर्षे टॉपला राहूनही शाहरूखने जे पावित्र्य जपलेय त्याला तोड नाही. त्याचे एक आदर्श नवरा आणि कुटुंबवत्सल पिता म्हणून ओळखले जाणे त्याचे युथ आयकॉन असणे सार्थक करते. त्याचे मग्रूरीचे आणि तापट स्वभावाचे किस्से त्याच्या द्वेषातून चघळले जातात. असतो एकेकाचा स्वभाव. त्याचा काय बाऊ करायचा. पण महिला सहकलाकारांबद्दल त्याला असलेला आदर आणि प्रेमभावना हे त्याच्यातील जंटलमॅन दर्शवतात.. बोलायला बरेच आहे..