पुण्यातील नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी

Submitted by हर्ट on 16 October, 2014 - 04:24

मला पुण्यातील नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी एकदा आतून बघायची आहे. चांदणी चौकाजवळून एक आतमधे रस्ता जातो तिथे सुद्धा नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीशी निगडीत तिथे काही आहे का? खडकवासल्याला नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी आहे हे माहिती आहे पण चांदणी चौकाजवळून आतमधे जो रस्ता जातो तिथे नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी चे नक्की काय आहे? ही दोन्ही स्थळे बघायला काही खास अनुमती मिळवावी लागते का?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांदणी चौकाजवळून आतमधे जो रस्ता जातो तिथे नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी चे नक्की काय आहे? >> तो रस्तापण नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधेच घेउन जातो. आतमधे जाण्यासाठी परवानगी लागते. सैन्यदलात किंवा अकॅडमी मधे कोणि ओळखिचं असेल तर आत जायची परवानगी मिळू शकते.

कुठे एन. डी.ए.त.. तिथे कुठे बोटींग.. पिकॉक बे च्या बाजूला म्हणत असाल तर चेक करावे लागेल.. नक्की कल्पना नाही..

एन.डी.ए. चा दीक्षांत समारंभ असतो तेव्हा त्याच्या आधी एक रंगीत तालीम असते.. ती जवळपास प्रत्यक्ष दिवसासारखीच असते.. तेव्हा काही ओळख असेल तर आतून एन.डी.ए. बघता येते.. पण ओळख पाहिजेच.. त्याशिवाय आत जाता येत नाही.. कारण निमंत्रणाशिवाय प्रवेश नसतो..

मधे वर्षातून काही ठराविक दिवस एन. डी.ए. आतून दाखवण्याचा कार्यक्रम पुर्वी व्हायचा. पण ठराविक ठिकाणेच दाखवायचे. उदा. हत्यारांचे कायमस्वरूपी प्रदर्शन असलेला हॉल, मेस इ. आता होतो की नाही माहिती नाही.

आम्ही शाळेत असताना गेलो होतो तेव्हा बोटिंग केले होते. माझी आई तेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये होती त्यामुळे अम्हाला तिथे सगळे बघायला मिळाले. तिथुन आल्यावर माझ्या भावाला एन डी एत जाण्याची क्रेझ होती. त्याने नंतर प्रयत्नही केले पण नाही जमले.

त्याच सुमारास कधीतरी नाना पाटेकरचा प्रहार आला होता.