मदत हवी आहे, भारतीय आणि परदेशी शाळेचे नियम आणि होणारे परिणाम ?

Submitted by निर्झरा on 20 January, 2018 - 01:54

येत्या काही महिन्यांनी आम्ही फिनलँड येथे जाणार आहोत. आत्ता मुलगा ६ वीत शिकत आहे. तिकडच्या शाळेची चौकशी केली असता, त्यांच्या नियमाप्रमाणे त्याला तिकडे ५ वीत टाकावे लागेल. अशा वेळी पुन्हा एक वर्षा नंतर भारतात परत आल्यावर त्याला नक्की कुठल्या वर्गात अ‍ॅडमिशन मिळेल. आपल्या नियमा प्रमाणे वय बघता ८वीच्या वर्गात घालता येईल की परत ६वीत टाकावे लागेल ?
कोणाला असा अनुभव असल्यास अथवा माहीती असल्यास सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांच्या नियमाप्रमाणे तेथील पाचवीच्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो तेथील सहावीकरता तयार आहे असे त्यांना दिसले तर ते तयार होतील का असे विचारून घ्या, आणि उरलेल्या वेळात तो अभ्यासक्रम मिळवून ते चेक करून किंवा तशी तयारी करून घ्या. तुमच्या हातात काही दिवस आहेत असे दिसते, त्यामुळे अभ्यासक्रम मिळाला तर तशी तयारी करून घेणे जमू शकेल. शाळांचे बोर्ड्स सहसा अशी माहिती लगेच देतात.

ते जर जमले नाही, तर परत इथे आल्यावर कोणत्या इयत्तेत असेल ते आत्ताचीच शाळा नीट सांगू शकेल.

एक दोन वर्शांचाच प्रश्न असेल तर मुलाला इथेच चांगल्या रेसिडेन्शिअल स्कूल मध्ये ठेवा. सुट्टीत गावी न्या तुमच्याकडे. म्हणजे शिक्षण ब्रेक होणार नाही. त्याचा अभ्यास क्रम कोणता आहे? एस एस सी, सीबी एस ई आयसी एस सी की आय बी? त्या प्रमाणे शाळा शोधता येइल. एक वर्श कमी किंवा जास्त असे झाले तर मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. कोप करायला अवघड जाते. त्याची क्षमता बघून निर्णय घ्या.

dhanyavad

आपल्याला एकटेच सोडुन पालक परदेशात गेले या भावनेचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. सातवीतला मुलगा म्हणजे पौंगंडावस्थेच्या उंबरठ्यावर असणार. सारासार विचार करुन निर्णय घ्या.

व्यत्यय + १

मुलाला तिथे गेल्यावर नविन अनुभव / एक्स्पोजर मिळेल हे ही लक्षात घ्या. नुसते वय न बघता अभ्यासक्रम बघून वर्ग ठरवला जावू शकेल का ( तिथे जाताना आणि इथे परत आल्यावर ) याची चौकशी करा.
बेस्ट लक.

परत आल्यावर सहावीत तर नक्कीच जावे लागणार नाही. दोन वर्ष तिथेही तो शिकेलच ना.
हल्ली भारतातल्या बऱ्याच शाळा मुलांचा जुना अभ्यासक्रम बघून त्या अनुशंगाने पुढच्या वर्गात प्रवेश देतात.
तो जे शिकला आहे ते त्याला इथे किंवा तिथे रिपिट करायला लागू नये. ते मुलांना कंटाळवाणे होवू शकते.

एक वर्षात (आणि या वयाच्या मुलाला) असे काय नवीन एक्स्पोजर मिळणार . उगीच कंपॅरिझन होईल परत आल्यावर. आणि मित्रांमधे थोडा भाव खायला मिळेल. बस!

दोन वर्ष आहेत ना?
मी दिड महिन्यासाठी स्टुडंट एक्चेंजमध्ये गेलेल्या १३-१४ वर्षाच्या मुलावर एक्स्पोजरचा चांगला परिणाम बघितला आहे. हा आत्ता ११ वर्षाचा असेल.

शाळेत चौकशी करुन घ्या. काही शाळा प्रवेश-परिक्षा घेउन आठवीत जरी सातवीचा निकाल नसला तरी घेतात. अम्हाला दोन शाळानी प्रवेश देण्याची तयारी दाखवली होती. त्यात घराजवळ असलेल्या शाळेत आम्ही प्रवेश घेतला.

शक्य असेल तर इथेच सहावी पूर्ण करून जा. जातांना सहावी पास चा दाखला घ्यायला विसरू नका. म्हणजे परीक्षा देवून गेलात तरी जून मध्ये त्याचा सहावी पास चा दाखला कुणाकरवी घेवून ठेवा. इथे परत आल्यानंतर सहावी पास झाल्याचे वर्ष, वय याची सांगड घालून एखादी प्री टेस्ट घेवून त्याला योग्य त्या वर्गात प्रवेश मिळेल.