साधी-सोपी गणित शिकवणारी साईट वा पुस्तके हवी आहेत.

Submitted by रश्मी. on 1 January, 2018 - 22:19

माझी मुलगी ५ वी मध्ये आहे. गणितात तिला उत्तम मार्क्स असुनही ती त्यात रस दाखवत नाही. त्यामुळे वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये मागे पडते. नेट वर आपल्याला हवी ती माहिती मिळु शकते पण मराठी वा ईंग्लिश मध्ये गणित सोपे करुन समजवणारी पुस्तके आहेत का? कुणी वापरली आहेत का? असल्यास इथे कृपया माहिती द्यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त वर्ड प्रॉब्लेममध्ये मागे

फक्त वर्ड प्रॉब्लेममध्ये मागे पडणे हा गणितापेक्षा भाषेचा प्रॉब्लेम असू शकतो. शिवाय शब्दांत मांडलेल्या संकल्पनांना मूर्त (इथे गणिती) रूप देणं हाही.
याचं कारण आपण मुलांनी स्वतः विचार करण्याचा, समजून घेण्याचा अभाव.
पुस्तकांपेक्षा , जे शब्दांत दिलंय ते चित्रात किंवा वस्तू घेऊन तिच्या सोबत मूर्त करायचा प्रयत्न करा. थोडा वेळ बोट धरून चालवा आणि मग पुढे पहा.
(हे मी गणित शिकवण्याच्या माझ्या तुटपुंज्या अनुभवावरून लिहितोय. गांभीर्याने घेतलंच पाहिजे असं नाही)

मी या पुस्तकांबद्द्ल काही मित्रांकडून (त्यांच्या मुलांसंदर्भात) ऐकले आहे. मला प्रत्यक्ष त्याचा अनुभव नाही.
Fractals, Googols, and Other Mathematical Tales
by Theoni Pappas

The I Hate Mathematics! Book
by Marilyn Burns

मी शाळेत असताना एकेकाळी मला गणित आवडत नसे. मार्कही कमी मिळायचे. केंव्हातरी बीजगणित आणि भूमिती वेगळे झाले आणि मला एकदम भूमिती आवडायला लागली. त्यातून आत्मविश्वास आल्यावर बीजगणित आणि एकूणच गणिताचे सगळे प्रकार आवडायला लागले. ही आवड इंजिनियरीगला ला M1 शी गाठ पडेपर्यंत टिकली.

गणितात कमजोर असणारी मुलं त्यातल्या त्यात भूमिती समजू शकतात हे मीही पाहतोय. पुन्हा भूमितीत गोष्टी कल्पना स्वरुपात असतात, हा फरक असेल (का?)

उलट भूमितीत गोष्टी कल्पना स्वरूपात नसतात. एखादे प्रमेय प्रत्यक्ष आकृती काढून दाखवता येते. बाजुंची लांबी मोजता येते, कोन मोजता येतात त्यामुळे सोपे जाते असे माझे तरी झाले होते.

मंगला नारळीकर यांनी वर्षभर लोकसत्तेत गणित गप्पा नावाचं एक साप्ताहिक सदर लिहिलेलं. त्या लेखांच्या संकलन दोन भागांत पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. नाव तेच - गणित गप्पा.

वर्ड प्रॉब्लेममध्ये मागे पडणे हा गणितापेक्षा भाषेचा प्रॉब्लेम असू शक>>>>
भरत बरोबर, माझ्या तिसरीत मुली बरोबर हेच पाहतोय,
2 3 ओळींचे गणित दिसले की ती चक्क सोडून देते,

अजय, धन्यवाद परत एकदा या पुस्तकाकरता. हे पुस्तक भारतात अ‍ॅमेझॉन वर उपलब्ध आहे आणी रिव्ह्युज खूप चांगले आहेत. पुस्तक घेतल्यानंतर इथे फिडबॅक देईनच. तसेच भरत यांनी सुचवलेली मंगला नारळीकरांची गणित गप्पा पण मिळतय का ते बघते.

विनीता धन्यवाद कुमॉन सिरीज बद्दल. अशी पुस्तके व त्यातुन मिळणारे ज्ञान इतरांना पण देता येते आणी आयुष्यभर आपल्याला पण उपयोगी पडते.

राजसी, तिला लिखाणाचा कंटाळा आहे हे खरे आहे. पण तोंडी उत्तर चांगली देते.

अजय तुमचे म्हणणे एकदम सही. काल नवर्‍याशी हेच बोलणे झाले की भूमिती एकदम सोपी कारण प्रमेय सिद्ध करता येतात.

रश्मी , जर वापरलीत पुस्तकं तर first hand review ऐकायला आवडेल . माझा लेक पण वर्ड प्रोब्लेम मध्ये गोंधळ घालतो .
गणित आवडत नाही असं नाही पण फार गडबड असते.

वर्ड प्रॉब्लेम्समध्ये भरत म्हणतात तसं असु शकेल.

वर्ड प्रॉब्लेममध्ये दिलेल्या फॅक्ट्स नीट न वाचताच घाईत गणित सोडवायला घेणे आणि मग उत्तर चुकलं की ही अशी गणितं मला आवडतच नाहीत म्हणणे हा एक प्रकार आमच्या घरी बघितला आहे.

खान अ‍ॅकडेमी ला + १११
अगदी सोप्या भाषेत समजवलेलं आहे. आपण आधी पाहून मग मुलांना ( पॉझ करत करत ) समजवायला फार उपयोगी आहे. मराठी माध्यमातून शिकलेल्या संज्ञा आजकालच्या गणिताच्या इंग्रजीतून भाषांतर करताना उडणारी तारांबळ टाळता येते .

माझ्याकडे सुचवायला पुस्तके नाहित पण मुलाला आणि मेंटीजना शिकवताना जे अनुभवले ते -
गणितातले वर्ड प्रॉब्लेम वाचून, त्यात दिलेली माहिती वापरुन उत्तर मिळवणे याचा सराव व्हायला बर्‍याच मुलांना वेळ लागतो. अशावेळी आपण सोबत करायची. उपलब्ध माहिती (आकडे), काय शोधायला सांगितले आहे ते आणि की वर्ड्स(ज्यातुन गणित सोडवण्याची रीत ठरणार) हे कागदावर कसे मांडायचे, आणि दिलेला वर्ड प्रॉब्लेम हा साध्या आकड्यत कसा आणयचा ते सुरवातीला बसून स्टेप बाय स्टेप शिकवले तर मुले लवकर आत्मसात करतात. अगदी साध्या प्रॉब्लेमपासून सुरुवात करायची. मुलांना आधीच येत असलेल्या साध्या बेरीज वजाबाकीच्या गणितापासून सुरुवात करुन वर्ड प्रॉब्लेम मधील माहिती आकड्यात कशी आणायची ते दाखवायचे . असेच साधे गुणाकार, भागाकार वापरुन करायचे वर्ड प्रॉब्लेम्सचे करावे. असे करताना गणितातील संकल्पनांची उजळणी देखील होईल. सराव करताना, कीवर्ड्स आणि त्या संबंधित ऑपरेशन अशी यादी करत जायला शिकवले. उदा. + (बेरीज) याच्याशी संबंधीत increased by, more than, combined together, total of, sum, added to असे कीवर्डस . असा सराव करताना आम्ही फक्त वर्ड प्रॉब्लेम आकड्यात बदलणे एवढेच करायचो, आकडेमोड करण्यात वेळ घालवायचो नाही. . साधे वर्ड प्रॉब्लेम जमू लागल्यावर दिलेली माहीती , शोधायची माहीती आणि माहीत असलेला फॉर्म्युला अशी सांगड घालायला शिकवले. दिलेल्या माहीतीचा आणि आपण शिकलेल्या गणितातील संकल्पनांचा एकत्रीत वापर उत्तर शोधायला कसा करायचा करायचा हे लक्षात आल्यावर गुंतागुंतीचा वर्ड प्रॉब्लेम देखील लहान तुकड्यांत मांडणे, २-३ वेगवेगळे फॉर्म्युले वापरुन उत्तर मिळवणे सहजतेने जमू लागले.

स्वस्ति, जरुर लिहीन. मेधा, हो मी मराठी तुन आणी नवरा इंग्रजीतुन शिकल्याने, बर्‍याच वेळा मी मुलीला शिकवायचे ( गणित ) काम नवर्‍यावर ढकलते. ते कॅरी ओव्हर प्रकरण जाम वैतागवाणे.
स्वाती, धन्यवाद, खूप छान प्रतीसाद. हे ही करुन बघता येईल.