अवांतर
खबरदार जर......
वाईटाशी वाईट!!!!
प्रत्येकालाच मिळालेली वाईट वागणूक सहन होते असे नाही? वाईटांना धडे शिकवणे, त्यांना उलटून बोलणे, त्यांची तक्रार करणे, शाब्दीक मार देणे -- यापैकी कुठलीच वागणूक देणे प्रत्येकालाच जमते असे नाही. उदा - मला वाईटाशी कसे वागावे बोलावे हे कळत नाही. परिणाम मला त्याचा आणखीनच जास्त त्रास होतो. टाळता येत तेवढे मी त्या व्यक्तीला टाळतो पण रोजचं ज्या व्यक्तीशी संबंध येतो अशा व्यंक्तींशी कसे वागावे कळत नाही. तुमचे विचार तुमचे उपाय कदाचित मला उपयोगी पडतील आणि माझ्यासारख्या अनेकांना!!!!!!!!
पुणे की मुंबई की बंगलोर की दिल्ली - घर घेऊ कुठे बरे?
मी जेंव्हा केंव्हा भारतात परत जायचा विचार करतो तेंव्हा आणि तेंव्हा मला हाच प्रश्न भेडसावतो की नक्की आपण कुठे स्थित व्हायचे. कारण छोट्या शहरात नोकर्या मिळत नाही. आपल्याला हवी असलेली जीवनशैली लाभत नाही, आपल्या भविष्याचा विकास होत नाही, आपण मेहनतीने घेतलेल्या शिक्षणाचे चीज होत नाही! मग प्रश्न पडतो --- आपण मुंबईत की पुण्यात की दिल्लीत की बंगलोर की आणखी कुठल्या तरी मोठ्या शहरात स्तित व्हावे. मला इथे लहान शहरातून पुढे आलेल्या मुलामुलांची मते वाचायला आवडतील की त्यांना भविष्यात कुठे स्थिर व्हायचा आवडेल? आणि का? त्यांच्याचं शहरात का नाही... म्हणजे जेथून ती आलेली आहेत? धन्यवाद!
अस्वस्थ करणारं काही...
मिसळपावावर ह्या लिंक्स दिसल्या, बघितल्या आणि प्रचंड अस्वस्थ व्हायला झालंय.
http://www.youtube.com/watch?v=EwOecpMkHH0
http://www.youtube.com/watch?v=hWomaejpSkg&feature=related
http://www.youtube.com/watch?v=hG3i2EwSCGs&NR=1
http://www.youtube.com/watch?v=Djz5wiyYWl8&NR=1
मला स्वतःला सत्यसाईबाबांविषयी फारशी काही माहिती नाही, आणि भारतातल्या इतर 'देव-देवतुल्य किंवा संत-साधू-स्वामीं'विषयी देखिल नाही. जो काय कंटेंट ह्या व्हिडिओजमधे आहे, तो अत्यंत सेंसिटीव्ह असा विषय आहे. पटत असो वा नसो, कृपया त्याची तशाच प्रकारे दखल घेतली जावी.
हॅपी मदर्स डे!
मायबोलीवरच्या समस्त मातांना आणि समस्त मायबोलीकरांच्या मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा!
आजच एक व्हिडिओ पाहिला.-
कॉस्ट ऑफ मदर्स डे
हमिंगबर्डच्या करामती
६ मेला ऑफिसमध्ये शिरलो आणि खिडकीबाहेर एक हमिंगबर्ड हवेत ईंग्रजी यु आकाराचे सूर मारतांना दिसला. माद्यांना आकर्षित करण्याचे त्यांचे हे तंत्र आहे. ५-६ वेळा त्याने हे केले. तोपर्यंत माझा कॅमेरा सुरु होऊन विडिओ घेणे मी सुरु केले होते. एकदा उच्चतम बिंदुपर्यंत पोचणे आणि खाली मारलेला सुर पकडता आला आणि तो गायब झाला. मी कॅमेरा काही क्षण सुरु ठेवला, नंतरही अधुन-मधुन बाहेर पहात होतो, पण तो काही परत आलेला दिसला नाही.
मातृदिन (मदर्स डे, ९ मे २०१०) आई होताना...
आई होताना आई नसताना
तिर्थरुप ताईस नलिनीचा शिरसाष्टांग दंडवत.
मी, पिल्लू अगदी मजेत आहोत. तू कशी आहेस?
गेले कित्येक दिवस मी एकटीनेच तुझ्याशी बोलतेय, आज मातृदिनानिमित्त हा पत्र लिहिण्याचा खटाटोप.
शिक्षण संपलं, तुर्तास करीअर बाजूला ठेवून पालकात्वाची जबाबदारी स्विकारायचे ठरले. लवकरच आपण आई होणार ही कल्पनाच किती सुखावह होती. नुसती कल्पनाच एवढे सुख देऊन जाते तर तो आई होण्याचा क्षण कोणत्या परिमाणात मोजणार मी.
मातृदिन (मदर्स डे, ९ मे २०१०) आईच्या कलाकृती
'गुलमोहोर'मध्ये फक्त स्वतः लिहिलेले साहित्य पोस्ट करणे अपेक्षित असल्याने तुम्हाला तुमच्या आईने लिहिलेली कविता, कथा, लेख, प्रकाशचित्र प्रकाशित करायचे असेल तर या धाग्यावर पोस्ट करा. तुमचे रंगीबेरंगी पान असेल तर तेही वापरु शकता.
मातृदिन (मदर्स डे, ९ मे २०१०) प्रिय आईस..
लहान मुलांनी या निमित्ताने केलेले लेखन, हस्तकला, चित्रकला पोस्ट करण्यासाठी हा धागा.
Pages
