सचित्र बारा गटग (वृत्तांताशिवाय) - जुलै २०१०

Submitted by Adm on 28 July, 2010 - 23:30

बारा गटगत काढलेली काही प्रकाशचित्रे. वृत्तांत लिहायचा होता पण मधेच ताट कलंडलं त्यामुळे वृत्तांत अर्धवट राहिला. Wink

देसाईंचं "काहितरी" आणि भाईंचं सी फूड : दोन्ही अप्रतिम होते !!

IMG_7390.JPG

सायोची भरली वांगी आणि बाईंची अंबाडीची भाजी.. चिकन आणि सी फूड असल्याने मी त्याकडे वहावत गेलो आणि ह्या भाज्या अगदी एकच घास खाल्ल्या.. Happy

IMG_7391.JPG

सिंडीने आणलेल्या जिलब्या..

IMG_7392.JPG

वृंदाताईंनी आणलेला दहीभात..

IMG_7393.JPG

दहीभाता बरोबर तळलेल्या मिरच्या.

IMG_7395.JPG

बुवांनी आणलेलं चिकन.. ऑस्सम होतं !

IMG_7394.JPG

शोनूने तळलेले मासे.. मला एव्हडेच मिळाले.. Sad

IMG_7396.JPG

लालूचे रॉकींग बटाटेवडे.. नशिब इतके तरी उरले आम्ही पोहोचेपर्यंत !

IMG_7397.JPG

बुवांच्या हॅपीबड्डेचा केक.. पिपाण्यांचा फोटो नाहिये Happy

IMG_7406.JPG

वृंदाताईंनी केलेले मलाई सँडवीच.. अमेझिंग होते !!!!

IMG_7410.JPG

"लालूच्या रावणपिठल्यापेक्षा माझं जास्त टेस्टी आणि फोटोजनिक होतं" असं सिंडीने सांगितल्याने त्याचा फोटो काढायचा राहिला. Proud

माणसांचे फोटो सगळ्यांना मेल करतो.. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथेही मीच पहिला आलो का बघायला??
मस्त पण Happy जेवणाची वेळ झालीच आहे!

--------------------------------------------------
कालपासुन कोणीतरी मासे मासे ओरडत होतं.
सायोनं केलेल्या भ. वांग्याचा मोठा फोटो पण मागण्यांमधे होता.
मलाई सँडवीच नव्हते कुठेही फोटोत. आहाहा!
काहीतरीच रेसीपी कोणी कृयोजाटा करणार आहे का?
--------------------------------------------------

भारीच!

वा, वा! वड्यांचा क्लोजअप, मिरच्या, जिलब्या मस्त आल्यात.
>>लालूच्या रावणपिठल्यापेक्षा
मी आणला होता तो पदार्थ 'झुणका'.

कॅट फिश फार भारी झाले होते. माझे तर मासे खाऊनच पोट भरलं, नंतर थोड्या वेळानी सगळ्या भाज्या एक एक ट्राय करुन बघितल्या. मलई सँडविच फारच मस्त! Happy
झकास आलेत फोटो.

शोनू मला कॅटफीश आहे म्हंटली भाई. Happy
असो, त्या मिरच्या म्हणजे थोडेसे वितळलेले एक्लेअर चे चॉकलेट वाटतायत.

भारी आहेत सर्व फोटो. माझ्यासाठी खास मसाले भात आणला होता वृंदाताईंनी. त्याचा फोटो कुठाय ?

भन्नाट फोटो.

>>>शोनूने तळलेले मासे.. मला एव्हडेच मिळाले..
चाऽर चाऽर तुकड्या कमी आहेत? Proud

वृंदाताईंनी मलई सँडविचेसची पाककृती टाकावी ही त्यांना विनंती. बाई, तुम्ही पण आपल्या अंबाडीभाजीची पाकृयोजाटा!

अंबाडी खाल्लीच नाहीस होय! >>>>> खाल्ली ना चव बघण्यापुरती..
शेवटी ती माझ्यासारखीच होती ना (म्हणे) ! मग कशाला जास्त खा... काही नविन नको का ? Proud

लालू.. रावण झुणका ? Happy

धन्यवाद सगळ्यांना.. Happy

चांगले फोटो पग्या. पण यात लालूच्या झुणक्याचा आणि मैत्रेयीने आणलेल्या भाकर्‍यांचा फोटो कुठाय? लालूचा झुणका ही छान होता चवीला. मी तो आणि स्वातीची भाजी,कोथिंबीरीचं लोणचं, माझी कांद्याची चटणी एवढंच खाल्लं भाकरीबरोबर.

<'रावण' कशाला आधी? टायटल देताना वापरायची फॅशन आहे काय?>

असावी. तुमच्या बटाटेवड्यांना कुणितरी 'हिलरीबटाटेवडे' म्हणाले असे आठवते आहे.

तिखट आणि गोड दोन्ही पुर्‍या फारच भारी होत्या! वृंदाताई, तुम्ही बघत असालच इकडे रोमातून तर तेवढं पा कृ देण्यापुरत्या तरी प्रकट व्हाच! नंतर ताबडतोब रोमात गेलात तरी चालेल Proud

चांगले आहेत फोटो!
मलई सँडविचबद्दल खूप ऐकून झाले, आता फोटोही पाहिला, तोंपासु, लवकर रेसिपी येउ देत वृंदाताई!!!
पुर्‍यांची पण येउ देत सविस्तर !!

स्वाती, तू केल्यास की आम्हांला पाठव. 'बर्‍या' झाल्यात की नाही ते कळवू. Proud
तेवढं अंबाडीच्या भाजीच्या रेसिपीचं मनावर घे.

इथे आहे :

अंबाडी चिरून त्यात थोडी चण्याची डाळ आणि शेंगदाणे घालून कुकरमधे शिजवून घ्यायची. शिजवलेलं पाणी टाकून द्यायचं. शिजली की थोडं डाळीचं पीठ लावून डावेने घोटून घ्यायचं. चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ आणि गूळ घालायचा, आणि भरपूर लसूण आणि एखादी सुकी लाल मिरची घातलेली खमंग फोडणी द्यायची. थोडं पाणी घालून चांगले दोन कढ आणायचे.

जमल्यास भाकरीसोबत खायची. खाताना वरून पुन्हा लसणीची फोडणी घेतली तर बहार येते. जोडीला लसणीचं तिखट किंवा तिळकूट असेल तर बहार दुप्पट होते. Happy

मृण, टाकते. Happy

थॅन्क्स. मी चणाडाळ, शेंगदाणे न घालता तूरडाळ. भात आणि मेथी घालते.
भाकरी शिळी असल्यास बहार किती पटींनी वाढते? Wink

>>प्रतिसादात रेस्प्या लिहून आम्हाला कसं कळणार
तुम्ही विपूत लिहिता ते? Proud

माझ्याकडे झुणक्याचा फोटो (स्टेप बाय स्टेप) आहे.

माझ्याकडे झुणक्याचा फोटो (स्टेप बाय स्टेप) आहे.>>> मग तू काय आम्ही ला. पि. वाजवायची वाट बघतीयस का? Proud
टाक की ती सचित्र पाकृ.

तो स्टेप बाय स्टेप फोटो आणी थोडा झुणका पाठवण्यात यावा. सिंडीनेही रावणपिठलं आणि फोटो पाठवावेत. म्ह्णजे कंपॅरिझन करणे सोपे जाइल Proud

लाल्वाक्का, पण आम्ही स्वातीसारखी, 'प्रतिसादात लिहिलीय पाककृती. तिथे बघा' असं सूचित करून बोळवण करत नाही. कुणी विचारल्यास त्यांच्या विपूत जाऊन (पुन्हा पुन्हा) पाकृ टाकून येतो. Proud

तुझ्याकडे पायर्‍या-पायर्‍यांनी पाकृ लिहिलीय म्हणतेस. पण इथे टाकेपर्यंत काय उपयोग आम्हाला? Proud लापि मोडात : टाकच सखे! Proud

Pages