पाककला
मलिदा
नाही, हा म्हणजे तो "लाच खाद्य" संस्कृतीतला मलिदा नाही. मोहरमच्या सुमारास गावागावांमध्ये पीर बसतात. ठिकठिकाणी ऊरूस म्हणजे यात्रा भरतात. विशेषतः कोल्हापुर, सांगली, मिरज, सोलापूर या भागांमधल्या मुस्लिमांच्या या सणात हिंदूही मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले दिसतात. ऊरूसाला गावोगावच्या पाहुण्यारावळ्यांना बोलावलं जातं. गावच्या मशिदीत किंवा पिराला जाऊन दर्शन घ्यायचं आणि मग मलिदा खायचा. हा मलिदा फक्त मुस्लिम कुटुंबांमध्येच बनवला जातो असं नाही. सर्व हिंदू घरांमध्येही तो असतोच. गेल्या काही वर्षांमध्ये अशा कुठल्याही ऊरूसाला जाणं किंवा मलिदा खाणं झालं नाही.
ओरिसा: छुईं आळू पोटळं भजा (फोटोसहित)
मागची आळूपोटळं तरकारी अजुनतरी कोणी करुन बघितलेली दिसत नाही. ते बहुधा भयापोटी असावे. पण ते तोंडली परवर कन्फ्युजन मुळे असावे असे मानायला मला वाव आहे. म्हणुनच आज दुसरी रेसिपी टाकते आहे. अर्थातच हि रेसिपीही माझी नाहीच. मात्र नवर्याच्या शिकवण्याबर हुकुम हि रेसिपी मी करते. (म्हणजे भलतीच सोपी असणार बघा!)
छुईं आळू पोटळं भजा (फोटो नंतर देईन)
छुईं - शेवग्याची शेंग
आळू - बटाटा
पोटळं - परवर
बिशी बेळे हुळी अन्ना (सांबार भात)
उडप्याकडचं सांबार अनेकांचं फेव्हरिट. कर्नाटकच्या काही भागांमध्ये बिशी बेळे हुळी अन्ना किंवा बिशी बेळे अन्न हा प्रकार प्रचलित आहे. आमच्याकडे माझी आई हा भात करायची. यात भात शक्यतोवर शिळा असेल तर त्याला जास्त मजा येते. त्यामुळे आम्ही रात्री जास्तीचा भात करायचो आणि मग सकाळी धम्माल बिशी बेळे अन्न.
साहित्य-
तयार भात. (हा आपला नेहमीचा पांढरा भात)
सांबारासाठी
तूरडाळ, मसूरडाळ- साधारण १०- १५ ग्रॅम प्रत्येकी
सांबार मसाला
टोमॅटो- १
कांदा-१
भेंडी- ३ किंवा ४
थोडा लाल भोपळा
वांगं १
शेवग्याची शेंग (आवडीप्रमाणे मुळा वगैरे घालता येईल.)
चिंच
लाल- सुकी मिरची
धणे जिरे पावडर
मोहरी
हिंग,
गव्हाची खीर- हुग्गी
मी मराठी माध्यमात शिकले असले, मराठी वातावरणात वाढले असले तरीही माझी मातृभाषा कन्नड आहे. शिवाय घरात कन्नड-मराठी वातावरण असल्याने पदार्थही कर्नाटक स्टाईलने केले जातात. महाराष्ट्र-कर्नाटक- कोल्हापूरच्या सीमावर्ती भागांमध्ये विशेषतः कर्नाटकात या हुग्गीला एक महत्त्वाचं स्थान आहे. लिंगायतांच्या घरांमधली लग्नं हुग्गीशिवाय पूर्ण होत नाहीत. पंगतीत पत्रावळीवर हुग्गी, त्यावर तुपाची धार, भात, आमटी आणि वांग्याची भाजी हा बेत केला नाही तर लग्न अपूर्ण राहिल्यासारखं अनेकांना वाटतं.
हुग्गी -
साहित्य-
१०० ग्रॅम खपली गहू (हे गहू खिरीचे म्हणून वेगळे असतात. ते थोडे महागही असतात. मुंबईत ते मिळत नाहीत. )
मिष्टान्नशास्त्र - आमचाही एक प्रयोग- रोस्टेड रेड पेपर सूपचे नूडल्स
अजय, आदित्य (स्वाती आंबोळे), मानस-राहूल (लालू) या सर्वांनी मॉलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमीचे केलेले प्रयोग पाहून मीही एक कीट मागवलं पण शिवानीच्या अॅक्टिव्हीटीज आणि माझी कामं यातून फुरसद मिळत नव्हती. शेवटी मुहूर्त मिळाला आणि एक सोपा प्रयोग करून बघितला. रेड रोस्टेड पेपर सूपचे नूडल्स.
तुम्ही आंबा कसा खाता?
उन्हाळा आला की सुट्टीबरोबर चाहुल लागते ती फळांचा राजा "आंब्याची"! तुम्ही आंबा कसा खाता? नुसता चोखुन, रस काढुन, चिरुन, इ.इ. प्रांताप्रांतानुसार आंबा, आमरस करण्याची, खाण्याची पद्धत वेगळी......चला तर मग आपापली पद्धत सांगा, ! प्र.चि. देखिल टाका.
अशाच आशयाचा दुसरा धागा असल्यास सांगा. हा डिलीट करुन टाकेन.
ओरिसा: आळूपोटळं तरकारी (फोटोसहीत)
मी रेसिपी टाकतेय म्हणजे धक्का बसला का? कारण खरतर टाकायची या विचारानेच मला धडधडत होतं हे काही माझं क्षेत्र नव्हे. पण काही दिवसापूर्वी जपान बीबी वर मी 'परवर' म्हणाले तर सायो, आडो आणि मंजिरीला बहुतेक ते पडवळ वाटले. म्हणून मग ही रेसिपी नवऱ्याला करायला लावून साग्रसंगीत लिहून घेतली इथे टाकण्यासाठी. मध्ये मध्ये फोटो सुद्धा काढले.
लेक विचारत होती कि तू फोटो कशाला काढतेस, इंटरनेट वर टाकणार का?
तर ही आळूपोटळं तरकारी
आळू - बटाटा
पोटळं - परवर (फोटो खाली बघा)
लागणारा वेळ:
माहीत नाही. (विचारुन सांगू का?)
लागणारे जिन्नस:
आलू चला के
लागणारा वेळ:
२ मिनिटे (उकडलेले बटाटे हाताशी असतील तर)
५ मिनिटे (बटाटे मावेमध्ये उकडणार असाल तर)
१५ मिनिटे (बटाटे कुकरमध्ये उकडणार असाल तर)
लागणारे जिन्नस:
तेल, धणापूड, जीरापूड (भाजलेल्या जीर्यांची असेल तर उत्तम), तिखट, गरम मसाला*, मीठ, किंचित आमचूर (ऑप्शनल) ...... आणि अर्थात बटाटे.
*हा माझ्याकडे बेसिक गरम मसाला असतो तो वापरते. म्हणजे दालचिनी, लवंग, मिरे भाजून पूड करून ठेवलेला. पण बादशाहचा नबाबी मटण मसालाही छान लागतो. किंवा इतर कोणताही आपल्या आवडीनुसार गरम मसाला.
प्रमाणः दोन माणसांकरता
साधारण २-३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे.
पुरी
पुर्या मऊ होतात, कडक होतात, तेलकट होतात, फुगत नाहीत इत्यादी चर्चा इथे करू.
पाणीपुरी, दही-बटाटा-शेव-पुरी वगैरे सगळ्या पुर्या इथेच!!
जुन्या मायबोलीवरची पुर्यांची चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93035.html
Pages
