मलिदा

Submitted by ठमादेवी on 18 May, 2011 - 03:48

नाही, हा म्हणजे तो "लाच खाद्य" संस्कृतीतला मलिदा नाही. मोहरमच्या सुमारास गावागावांमध्ये पीर बसतात. ठिकठिकाणी ऊरूस म्हणजे यात्रा भरतात. विशेषतः कोल्हापुर, सांगली, मिरज, सोलापूर या भागांमधल्या मुस्लिमांच्या या सणात हिंदूही मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले दिसतात. ऊरूसाला गावोगावच्या पाहुण्यारावळ्यांना बोलावलं जातं. गावच्या मशिदीत किंवा पिराला जाऊन दर्शन घ्यायचं आणि मग मलिदा खायचा. हा मलिदा फक्त मुस्लिम कुटुंबांमध्येच बनवला जातो असं नाही. सर्व हिंदू घरांमध्येही तो असतोच. गेल्या काही वर्षांमध्ये अशा कुठल्याही ऊरूसाला जाणं किंवा मलिदा खाणं झालं नाही. पण इचलकरंजीच्या आसपास असलेल्या अब्दुल लाट, यड्राव, कबनूर, रुई, रुकडी अशा गावांमध्ये ऊरूसाला गेलेलं, मशिदीत जाऊन नमस्कार केलेलं मला आजही आठवतं. या मलिद्याची चव आजही मला अस्वस्थ करते.

मलिदा
साहित्य :
गहू अर्धा किलो, गूळ, सुकं खोबरं, सुंठ पावडर, फुटाण्याची डाळ, बडीशेप,

कृती :
गहू खरपूस भाजून दळून घ्यावेत. मग त्या पिठाची थोडं मीठ घालून घट्ट कणीक मळावी. कणकेचे पोळपाटावर जाड- जाड रोट तयार करून ते चांगले भाजून घ्यावेत. मग हे रोट खलबत्त्यात घालून कुटावेत. बारीक भुगा झाला की त्यात गूळ किसून घालावा. सुंठ पावडर, फुटाण्याची डाळ, किसलेलं सुकं खोबरं, बडीशेप घालावी. गूळ एकजीव झाला की नाही ते एकदा तपासून घ्यावं. मग ते तव्यावर थोडं गरम करून, त्यात साजूक तुपाची धार सोडून खायला द्यावं. साधारण चॉकलेटी रंगाचा तो दिसतो. जिभेवर आला की त्याची चव अगदीच टेम्टिंग वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे पप्पा अजुन करतात पण सॉट कट मध्ये ... Happy

आई एकीकडे गरम गरम चपाती करत असेल तेव्हा पप्पा वाटी च्या कडाने गुळ काढुन घेतात , चपातीचा कुस्करा करतात .मग घरी केलेल्या तुपा आणी बारीक झालेल्या गुळाच्या मदतीने मलीदा लाडु सारखा बनवतात Happy

ठमे,
मस्त मलिदा !
मलाही खुप आवडतो.
लहानपणी माझ्या आजोळला दश्किरसाहेब म्हणून एक दर्गा ऊरूस असायचा,अख्ख गाव त्यात सामील व्हायचं, मलिदा तर प्रत्येक घरात असायचा, त्यातला बडीशेप आणि खोबर्‍याची चव आवडायची, पण सुंठ' तोंडात आली कि हे कशाला घालतात असं वाटायचं..
ऊरूसामध्ये प्रत्येक कार्यक्रमात इतर धर्मिय देखील सामील व्हायचे,पुढाकार असायचा,कारण मुस्लिम समाज संख्येन कमी असल्यामुळे.
तुझ्या अशा अनेक लेखामुळे गावाकडच्या लहानपणाच्या, सगळ्या आठवणी जाग्या होतात..
Happy

पियापेटी मला पण घरगुतीच पोळिचा लाडू/चूरा आवडतो.. माझी बहीण सुरेख करते.. शिळ्या पोळिचा पण छान होतो. तुप गरम करून घातलं आणि गुळ बारिक किसून घातला की मस्त लाडू वळता येतो, नाही लाडू झाला तरी की फर्क पडता? अखिर में पेटमेच डालनेका Happy

मस्त प्रकार. बडीशेप, खोबरं भरलेला रोट पण मिळतो ना? अगदी लहानपणी खाल्लेला पण चव अजुन आठवते. पोळीचा लाडु आणि मलिदा दोन खुप वेगळ्या तोंपासु गोष्टी.

मलिदा नावाचा काही खरंच खाण्याचा प्रकार असतो हेच मला माहित नव्हते. धन्स ग ठमे. घोड्यांना पण मलिदा चारतात ना?

ठमादेवी.. तुम्ही अश्या पदार्थांची आठवण करून देउन एकदम नॉस्टॅल्जिक करून टाकताय सध्या..

मला माहिती नव्हतं की मलिदा फक्त सांगली-कोल्हापूर भागातच करतात/म्हणतात..

piraalaa malida aani god bhaat asto
mala khup aavdto. aamachya gharee kartat yatrechy divashi

अश्या नावाचा पदार्थ देखील असतो हे माहित नव्हते.

लाच खाद्य संस्कृतीतला
मलिदा हा शब्द ह्याचवरून पडला असावा... Happy

पाककृती मस्त आहे.. Happy खायला कधी मिळणार काय माहित..

अतिशय आवडता पदार्थ Happy

ठमादेवी.. तुम्ही अश्या पदार्थांची आठवण करून देउन एकदम नॉस्टॅल्जिक करून टाकताय सध्या..>>>अगदी अगदी

ठमादेवी, तुम्ही 'पाककृती' लिंक वापरुन का लिहीत नाही? हे गप्पांचं पान आहे. बिशी बेळे पण तसंच. ग्रूपमध्ये वरुन पाचवी लिंक 'नवीन पाककृती' अशी दिसते, ती क्लिक केल्यावर वेगळा फॉर्मॅट येतो तिथे 'साहित्य', कृती' असे तुम्हाला लिहावे लागणार नाही.

लालू, बरं झालं सांगितलंत. मी आपली झापडं लावूनच हे पान उघडत असल्याने लक्ष गेलं नव्हतं. आता तिथे टाकत जाईन पाकृ. Happy

मामी, घोड्याचा मलिदा वेगळा. Proud

पियापेटी तो तहानलाडू. Happy
पक्का भटक्या, तुम्ही ऊरूसाच्या दरम्यान कोल्हापूरकडच्या एखाद्या गावात गेलात तर मिळेल खायला. मी पण सध्या तरसतेय खायला. Happy

नाही लाडू झाला तरी की फर्क पडता? अखिर में पेटमेच डालनेका
दक्षीणा अगदी अगदी!!!! Happy

पियापेटी तो तहानलाडू
हो का? मला फक्त मलीदा नावानेच हा पदार्थ माहीत आहे.
तसे पण माहेरीच खायला मिळतो.. सासरी नाव अस्तीत्वात आहे पण कोणाला आवडत नाही Sad

तसे पण माहेरीच खायला मिळतो.. सासरी नाव अस्तीत्वात आहे पण कोणाला आवडत नाही >> पियापेटी, अग असे असते पण आपण आपल्यासाठी करुन खायचे. बाकीच्यांना नाही आवडत म्हणुन आपणही का नाही खायचे?
......... सॉरी विषयांतर झाले

उत्तर भरतात चुरमा करतात , त्याची पाकक्रुती अशीच आहे. फरक इतकाच कि कणकेचे रोट च्या एवजी बाटी करतात. बकी क्रुती साखीच.