पाककला

हँडी चॉपर

Submitted by लालू on 24 November, 2009 - 16:09

ही वस्तू घेऊन ठेवा. उपयोगी पडते.

हँडी चॉपर

दुकानात बहुतेक $९.९९ ला मिळेल. साल्सा, भरड चटण्या, बटाटेवड्यासाठी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर वाटण चांगले होते.

विषय: 
शब्दखुणा: 

दीपावली फराळ

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

IMG_1656.JPG
बेसन लाडू
IMG_1657.JPG
मराथि चकली
IMG_1658.JPG
चिवडा

विषय: 

छोल्याची भजी

Submitted by हसरी on 7 October, 2009 - 02:43

साहित्य

भिजलेले छोले १.वाटी , हिरव्या मिरची ३ (आवडीनुसार), मिठ (अंदाजे), आलं लसणाची पेस्ट (आवडीनुसार ), बेसन, तेल , सोडा , हळद

छोले ४-५ तास भिजवावेत

मिक्सर मध्ये छोल्याची भरड काढावी , मिरच्या वाटुन किंवा तुकडे करावे
भांड्यामध्ये छोल्याची भरड,मिरच्या, आलं लसणाची पेस्ट ,मिठ,हळद , सोडा घालावा बेसन पिठ आवश्कतेनुसार (भज्याचे पिठ करतो त्यानुसार) घ्यावे तेलाची मोहन घालावी तळुन काढावे

टिप : आपल्या आवडीनुसार धने-जिरे पुड किंवा ओवा घालु शकता

विषय: 

मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही

Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47

इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.

विषय: 
शब्दखुणा: 

बटाट्याच्या गोल काचर्‍या.

Submitted by दक्षिणा on 16 September, 2009 - 07:31

लागणारा वेळ:
१० मिनिटे.

साहीत्य :
आकाराने साधारण छोटे ४ बटाटे (खूप मोठे असतील तर चकत्या खूप मोठ्या होतील) २ कांदे, तिखट, हळद, एक आमसूल, मीठ, साखर, कोथिंबीर, ओलं/सुकं खोबरं.

क्रमवार पाककृती:

विषय: 

चीझ : भाग २

Submitted by मेधा on 1 September, 2009 - 21:37

फ्रेंच चीझबद्दल लिहायचं म्हणजे कुठून सुरुवात करावी ते कळत नाही. आपल्याकडे भाषा, बोलीभाषा नसतील तेवढे चीझचे प्रकार असतील. अन् प्रत्येकाची चव वेगळी, पोत वेगळा, खाण्याची पद्धतदेखील वेगळी अन् सोबत प्यायच्या वाईन्स वेगळ्या.

विषय: 

चीझ

Submitted by मेधा on 28 August, 2009 - 00:03

पहिल्यांदा युनिव्हर्सिटी कॅम्पसवर काहीतरी खायची वेळ आली तेव्हा त्या ट्रक्सवर लावलेल्या बोर्डांवरचे कुठलेही प्रकार ओळखीचे वाटत नव्हते. अर्ध्या पदार्थांचा उच्चार कसा करायचा तेही माहीत नव्हतं. ओरिएंटेशनच्या नंतर एका सिनियरने सांगितल्यावरून "रिचीच्या ट्रकवर त्यातल्या त्यात बरे प्रकार मिळतात, बाकीच्या ट्रक्सवरचे प्रकार देशी लोकांना आवडत नाहीत/चालत नाहीत" एवढं ऐकून माहीत होतं. म्हातार्‍या रिचीने तीन वेळा "मे आय हेल्प यू?"म्हटल्यानंतर घाबरत घाबरत 'ग्रिल्ड चीझ' सँडविच मागितलं अन् माझं वाक्य संपायच्या आत त्याने "व्हॉट काइंड ऑफ चीझ?'"विचारल्यावर परत ' मुखं च परिशुष्यति' अवस्था झाली होती.

विषय: 

बाप्पासाठी आगळा वेगळा नैवेद्य

Submitted by संयोजक on 20 August, 2009 - 15:51

गणपती बाप्पाच्या प्रसादाची एक आगळीच मजा असते. विशेषत: मंडळाचा अथवा सोसायटीचा गणपती असेल तर रोजचा प्रसाद म्हणजे उत्सुकतेचा विषय. एखाद्या सुगरण काकू असतात ज्या अगदी कल्पकतेने दरवर्षी नवनवा नैवेद्य बनवतात. त्यांच्या हातच्या प्रसादाची गोडी काय वर्णावी असेच सर्वांना वाटते. एखादे आजोबा असतात जे हौसेने गावातल्या प्रसिद्ध हलवायाकडचे चांगले तळहाता एव्हढे पेढे प्रसादाला आणतात. हे पेढे एरवी कितीही खाल्ले तरी गणपतीच्या दहा दिवसात प्रसाद म्हणून हातावर टेकलेला एकच पेढा किती गोड लागतो.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पाककला