गव्हाची खीर- हुग्गी

Submitted by ठमादेवी on 14 May, 2011 - 05:05

मी मराठी माध्यमात शिकले असले, मराठी वातावरणात वाढले असले तरीही माझी मातृभाषा कन्नड आहे. शिवाय घरात कन्नड-मराठी वातावरण असल्याने पदार्थही कर्नाटक स्टाईलने केले जातात. महाराष्ट्र-कर्नाटक- कोल्हापूरच्या सीमावर्ती भागांमध्ये विशेषतः कर्नाटकात या हुग्गीला एक महत्त्वाचं स्थान आहे. लिंगायतांच्या घरांमधली लग्नं हुग्गीशिवाय पूर्ण होत नाहीत. पंगतीत पत्रावळीवर हुग्गी, त्यावर तुपाची धार, भात, आमटी आणि वांग्याची भाजी हा बेत केला नाही तर लग्न अपूर्ण राहिल्यासारखं अनेकांना वाटतं.

हुग्गी -
साहित्य-
१०० ग्रॅम खपली गहू (हे गहू खिरीचे म्हणून वेगळे असतात. ते थोडे महागही असतात. मुंबईत ते मिळत नाहीत. )
५० ग्रॅम गूळ
सुक्या खोबर्‍याचा तुकडा
सुंठ
वेलची, मनुके, काजू (इच्छा असल्यास)

कृती
खपली गहू आदल्या रात्री नीट धुवून भिजत ठेवावेत. सकाळी कुकरला चांगल्या तीन-चार शिट्ट्या काढून शिजवून घ्यावेत. (हे गहू कडक असतात. त्यामुळे शिजायला वेळ लागतो. ) मग कुकर उघडून त्यातच किंवा साहित्य दुसर्‍या भांड्यात घेऊन त्यात गूळ घालावा. हा गूळ चांगला घोटवून घ्यावा. ताक करण्याची रवी किंवा पावभाजीचा स्मॅशर याच्यासाठी वापरता येईल. सुंठीची पावडर करून (ही हल्ली बाजारात तयार मिळते. बेडेकरांची उत्तम) ती घालावी. मनुके, काजू घालायचे असल्यास ते घालावेत. सुकं खोबरं किसून तेही त्यात घालावं. चांगली शिजली, गूळ मुरला की गॅस बंद करावा.

या खिरीत खरंतर दूध घालत नाहीत. पण घालायचे असल्यास खीर थोडी कोमट झाल्यावर त्यात कोमटच दूध घालावे. गरम खिरीत ते घातल्यास गुळामुळे फुटू शकतं. पूर्ण खीर खराब होऊ शकते. किंवा ताटात घेतल्यावरही दूध घालता येईल.

हुग्गी थोडी घट्टच असते. कर्नाटकात तिला पूर्णअन्नाचा दर्जा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चातका अरे, तिचा फोटो मिळणं मुश्किल आहे रे. मी घरात गेल्या दोनेक वर्षांमध्ये ती केलेली नाही. आता जयसिंगपूरला जाईन तेव्हा गहू घेऊन येईन म्हणते.

छान

आई करते कधी कधी. ती सडून घेते गहू. त्यामुळे लवकर शिजतात. आमच्याकडे श्रावणातल्या एखाद्या शनिवारी असते. मला नीट आठवत असेल, तर सज्जनगडावर पण हेच जेवण असते.

मस्तच! जसा विचार केलेला तशीच आहे खीर..'जाडसर्-घट्ट'. यात गुळा एवजी मिठ-मसाला टाकलं तरी वेगळी रेसिपी तयार्...म्हणजे 'गव्हाची खिचडी'...'मसाला खिर' वैगेरे... हो की नाही..? Happy

हे पूर्णअन्न आहे १००%.

चातक याहीपेक्षा घट्ट असते ती. हा इंटरनेटवरचा फोटो आहे म्हणून थोडी पातळ दिसतेय. नाहीतर थोडा सैल भात असतो तशी दिसते. आमच्याकडे गव्हाचे नाही पण त्याच्या थोड्या जाड रव्याचे तिखट घालून उपमाही करतात. त्याच रव्याचा गोड सांजा माझा फेव्हरिट आहे.

हा इंटरनेटवरचा फोटो आहे म्हणून थोडी पातळ दिसतेय.>>>> फोटो प्रताधिकारमुक्त आहे की नाही ते तपासून घ्या. Happy

मला आवडते ही खीर. दूध न घालता केलेलीच आवडते. गुळाचा एक वेगळाच खमंगपणा येतो. Happy

दलियाचीच करतो आता आम्हीपण...छान होते Happy आणि एका मैत्रिणीनी दिलेली टिप, दलिया शिजवताना मूठभर बासमती तांदूळ घालायचे, म्हणजे खीर मस्त मिळून येते.

आम्ही दलिया शिजवून घेतला की, खवलेला नारळ (भरपूर) गूळ, केशर-वेलची हे सगळ घालून एक उकळी आणतो वरुन हवं असेल तर दूध, तुपाची धार मात्र आवश्यक. Happy

ठमे, किती वर्षांनी 'हुग्गी' पहायला अन वाचायला मिळाली. गरीबाच्या घरात गोड धोड असेल तर असंच काहीतरी असायचं. जावई घरी आला कि त्याला धोंड्याच्या म्हणजे अधिक मासात गव्हाची 'लाफशी' असा एक मस्त प्रकार असायचा. तेव्हा काजु बदाम नाही मिळाले खायला पण शेंगदाणे टाकले तरी मस्तच लागते हि खीर. लांबून आलेल्या पाहूण्यांसाठी खास रेसीपी आहे हि.

साध्या गव्हाची अशी खीर करता येते..कुकर मधे दुध पाण्यात शिजवुन गुळा ऐवजी साखर घालुन ती छान मुरली कि गव्हाच्या दुप्पट दुध घालुन मंद आचेवर दाटसर शिजवायचे..कितीही दुध घातले तरी थंड झाली कि घट्टपणा येतो..खायला देताना वरुन तुप टाकुन खायचे....बाऊल भर खाल्ली कि जेवणच होते..चवीला लिम्बु लोणचे थोडेसे..
हा प्रकार शेंगदाणे,मिरची,मटार दाणे वरुन लिम्बु पिळुन केले तर त्याल उब्जे /फाडे असे म्हणतात..यासाठी गव्हासारखाच तांदुळचा जाड रवा ,/कणी वापरतात..

मस्त आहे रेसिपी. अगदी साधा, सोपा, रुचकर आणि तृप्ती देणारा पदार्थ आहे हा! आपल्याकडे तांदळाचे / मूग डाळीचे पायसम् , गव्हाची हुग्गी अशा सर्वसामान्य घरात सहज असणार्‍या धान्यांपासूनच्या ज्या गोडधोडाच्या कृती आहेत त्या पदार्थांची चव खरोखरीच अतुलनीय असते.

आमच्या वाड्यातल्या रामनवमीच्या उत्सवाला ही खीर असायची प्रसाद म्हणून. Happy

मिनोती , नी बा नम्मकडे. याड्डुमंदी माडुनी. Happy
आमच्याकडे या खिरीशिवाय लग्नाच्या अगोदरच सुवासिनी जेवण पुर्ण होत नाही. Happy सोप काम नाही खरं हे खीर करण. स्पेशल आयटेम आहे हा बर्‍याच कार्यक्रमात.
पण ठमादेवी , नुसते खपली गहू चालणार नाहीत ना?. पाण्याचा हात लावून ते व्हणात थोडेसे कुटून घेतात आमच्याकडे. फोटो टाकते थोड्यावेळात.माझ्याकडे आहेत सासुबाईनी दिलेले कुटलेले गहु. बरेच दिवस झाले खीर करुन . करुन बघायला पाहिजे. Happy

हे झक्कास... हुग्गी.... गावाकडे अगदी काहिल भरुन करतात... फेवरेट डिश....

ननगु भाळ शेरतेत इद....अर्थात फक्त खायला, करायला नाही. Proud
आमच्या साखरपुड्याला ( सासरी झाला होता) केली होती. आम्ही पुणेकर मंडळी पहिल्यांदाच खात होतो
." नको नको " म्हणत सगळ्यांनी ताव मारला होता. Lol
माझ्या साबा छान बनवतात. त्या गहू कुकरमध्ये ठेवून सात शिट्ट्या काढतात.
रच्याकने...ठमे, तू पोस्ट केलेला फोटो मीच टाकला होता नेटवर. आता मी तुझी तक्रार करणार Wink Proud

हिंग माडरी, निव्यु यल्लारु कुडी नन्न मणेगे उट्ट्क्के बन्नी. नन्न आयी कैले माडीदु, चन्नगी मुगचीदु हुग्गी उटुक्के हाकतीनी. Happy
हेळी यवाग बरतीरा......

मला वाटलेच आजुन मल्लीची "खास" कॉमेंट कशी नाही आली.
रच्याकने, ठमा, मी सोलापुरची. माझ्या जुन्या आठवणी जागृत झाल्या, हुग्गीच्या, माझी आई नेहमी करते.
धन्स

लाप्शी म्हणून ओळखला जातो तो पदार्थ पण हाच का ?>>> नाही... ती जाड्या रव्याची असते..

न्युवर यल्लारने कन्नड माताडका बरतीत? नंगु छुलू आर्स्तीतु. यवाग करती री नंग हुग्गी तिनाक?

रच्याकने कन्नड मायबोलीचाही प्रस्ताव मांडावा काय? :अओ:\\

रुणुझुणू, हे घे तुला क्रेडिट. नी बरी इकडे, निंग तिनाक कुडत्यान.. Proud (मस्का मारतेय तुला.)

खपली गव्हाच्या खीरीची सर साध्या गव्हाला येत नाही.>>> हे बरोबर.

शैलजा तुला खपली गहू एखादवेळी पुण्यात मिळतील. हे गहू नेहमीच्या गव्हापेक्षा थोडे बारीक आणि लांबुडके असतात.

कोमल मस्त रेसिपी.

मी अशी गव्हाच्या रव्याची खिर करते. म्हणजे लापशीच्या रव्याची.

आणि हो तुला गहू आणलेस की मला पण आण.

Pages