लहान मुलांची समस्या : डोक्यात चमक

Submitted by bvijaykumar on 24 February, 2015 - 09:22

माझ्या एका मित्राच्या मुलाला वय वर्ष २ पासून त्याला वारंवार सर्दी होते. तो आता ५ वर्षाचा आहे. आता डोक्याच्या मागील बाजुस कानाच्या वर काही सेकंदासाठी चमक निघते. क्रु प या माहीती ह वी आहे. उपाय सुच व ला त री चालेल .. सध्या सर्दी साठी होमिओपाथी उ प चा र चा लू आहेत .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

** मी अजिबात डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नाही**** पण हे डोक्यातील चमक प्रकरण रीसेन्टली अनुभवलेय म्हणून लिहितेय. माझ्या मुलीला मधे १-२ आठवडे डोक्यात असह्य चमक येण्याच त्रास झाला. मी तर जाम घाबरले होते, डोक्टरांनी एम आर आय पण काढायला लावला, कुठे कन्कशन वगैरे नाही ना बघायला. पण फायनली इयर वॅक्स ब्लॉकेज निघालं ! त्या ब्लॉकेज मुळे कुठल्यातरी नसेवर प्रेशर येत होतं म्हणे. डॉक्टरांनी कानात घालायचे डृऑप्स दिले, त्याने वॅक्स निघाल्यावर त्रास बंद झाला.

सध्या सर्दी साठी होमिओपाथी उ प चा र चा लू आहेत .
<<
शुभेच्छा!
*
आमच्या तोकड्या माहितीनुसार,

सर्दी → वारंवार कान फुटणे / कोलेस्टिआटोमा → मेनिन्जायटिस → ...

↑ रस्त्यात कुठेतरी कर्णनासगलशल्यचिकित्सक नावाचे अधुनिक वैद्यकाचे स्टेशन लागले तर त्या जिवाचे भले होईल.

maitreyee

डॉक्टरांनी कानात घालायचे डृऑप्स दिले, त्याने वॅक्स निघाल्यावर त्रास बंद झाला.>> नाव सान्गा

माझी कन्या आता ११ वर्षांची आहे. ती साधारण २-४ वर्षांची असताना... असेच खेळता खेळता कळवळुन रडायला लागायची.
कारण हेच... आम्ही पण असेच घाबरलो होतो. पण कान दुखतो अशी तक्रार केंव्हाच केली नाही. सर्दी कायम असयची.
टिचे टॉन्स्लिल्स हि वाढलेले असायचे..ड़ॉ. त्याला 'किस्सिंग टॉन्स्लिल्स' म्हणायचे. १० वर्षे पुर्ण झाल्या वर टॉन्स्लिल्स काढुन टाकले.

सर्दी चे औषध आणि कानाचे ड्रॉप्स उत्तम उपाय आहे.
बाहेर जाताना कानटोपी कायम घालावी, टॉन्स्लिल्स कडे लक्श असावे आणि पेशंस ठेवावेत. प्रतिकार शक्ति वाढेल तशी तक्रार पण कमी होते.