२०२१ यु.एस.ऑलिंपिक्स स्विम ट्रायल्स, सी.एच.आय.सेंटर, ओमाहा: एक अविस्मरणिय अनुभव!
तुम्हा सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची म्हणजे या आठ्वड्यात आमच्यापासुन ३ तासाच्या ड्राइव्हिंग अंतरावर ओमाहा, नेब्रास्का इथे यु एस ऑलिंपिक्स स्विम टिमची निवड चालु आहे ऑलिंपिक्स ट्रायल्स मधे. तुम्हा सगळ्यांना सांगण्यास आनंद होत आहे की या शनिवारच्या दोन्ही सेशनची तिकीटे मिळवण्यात मी यशस्वी झालो आहे. त्या दिवशी संध्याकाळच्या सेशनमधे केलब ड्रेसल( ज्याच्याकडुन अमेरिका टोकियो ऑलिंपिक्स मधे ७ सुवर्णपदके मिळवायची आशा ठेवुन आहे!) ५० मिटर्स सेमि फायनल व १०० मिटर्स बटरफ्लाय फायनल पोहणार आहे! माझा मुलगा आदित्य जो गेली ७ वर्षे कंपॅटिटीव्ह स्विमिंग करतो त्याचा केलब ड्रेसल हा आयडल आहे.