मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/48464 पानावरच्या पोस्टी इथे डकवतो -

अनिश्का. | 10 April, 2014 - 14:01
१२ वीच्या मराठी बुक मधे कलिंगड नावाचा धडा होता....आजही तो माझा पाठ आहे.....मला खुप खुपच आवडायचा तो धडा
प्रतिसादचैत्रगंधा | 10 April, 2014 - 14:07
माझ्याकडे पण अजून आहे ९ वी चे पुस्तक..
आणि १२ वीचे पण.. कलिंगड खूप छान होता धडा.. मला मराठी नव्ह्तं १०वी नंतर पण वाचायची आवड खूप होती म्हणून मुद्दाम ११/१२ वी ची पुस्तके संग्रही ठेवली होती.
प्रतिसादरिया. | 10 April, 2014 - 14:19
माझ्याकडे १२वीचे पुस्तकंही आहे
अनू सेम हिअर
आणि त्या धड्यावर आधारातील एक छोटासा एपिसोड पण सादर झालेला मागे दुरदर्शन वर
मला कलिंगड म्हणलं की तो धडा आणि एपिसोड आठवतो
आणि कोणी मुलं दत्तक घेतलं की तो धडा आणि कलिंगड आठवतं
प्रतिसादरिया. | 10 April, 2014 - 14:19
लाल चिखल पण आठवत असेलच तुम्हाला

या धाग्यावर अवांतर होतय
सॉरी
प्रतिसादमी देवी | 10 April, 2014 - 14:27
लाल चिखल पण होता, पण लेखक आठवत नाहियेत, सांगा ना प्लीज

मला कलिंगड म्हणलं की तो धडा आणि एपिसोड आठवतो <<< गौरी देशपांड्यांचा होता ना तो?

लाल चिखल पण होता, पण लेखक आठवत नाहियेत, सांगा ना प्लीज <<< रुस्तुम अचलखांब?

लाल चिखल पण होता, पण लेखक आठवत नाहियेत, सांगा ना प्लीज <<< रुस्तुम अचलखांब?>>
गंगाधर पाणतावणे बहुतेक.
की त्यांचा मी जालन्याच्या शाळेत हातो होता?\

दमडी मध्ये ती बाजारात गेलेली असते गवत विकायला. (?)
तिथे तिला शेवेचा घाणा दिसतो.
तिला एका झाडाखाली झोप लागते.
स्वप्नात ती शेवेचा भारा विकायला घेवुन जात असते असा अब्राच सिक्वेन्स होता.
गजाभाउ ९६ धावी वाल्याला हा नस्णार धडा.
नंतरच्या बॅच वाल्याना होता.
मी भावाच्या पुस्तकात वाचलेला आठवतोय.

आधुनिक शिक्षणाने आपल्याच समाजापासून दुरावलेल्या दलित तरुणाचा धडा होता 'झूल' नावाचा, त्याचे लेखक कोण होते?

मी जालन्याच्या शाळेत हातो >> "जातो" (?) बहुदा तो आनंद यादवांचा होता..

अजून एक होता "बोलावणे आल्याशिवाय नाही" ... "धुणं" (??)

'कलिंगड' धडा म्हणूनही कधी आवडली नाही आणि नंतर वाचताना तर अत्यंत आव आणून लिहिलेली कृत्रीम कथा वाटली.

बोलावणे आल्याशिवाय नाही >> हो. आठवीत होता.. एकांकिका होती ना ती..
अजून एक म्हणजे 'कोकणातले दिवस'. हा मला नव्ह्ता पण जुन्या अभ्यासक्रमात होता.

आधुनिक शिक्षणाने आपल्याच समाजापासून दुरावलेल्या दलित तरुणाचा धडा होता 'झूल' नावाचा, त्याचे लेखक कोण होते? <<< आगाऊ, म्हणजे तोच का ज्यात कथानायक बर्‍याच काळाने आपल्या घरी गावी येतो पण बसमधून उतरल्या क्षणापासून त्याच्या तुसड्या वागण्याला सुरुवात होते. घरातली प्रत्येक गोष्ट त्याला ठसठशीतपणे ओंगळ दिसू लागते. त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न याने करावे असे आई-वडलांचे मत असते पण त्याला अचानक मामाची मुलगी (सीता?) गावंढळ वाटू लागते. तो हा धडा नसेल तर या धड्याचं नाव/लेखक कोण होते?

झकासा, कितवीला होता दमडी?

सातवीत 'स्नेही' नावाचा धडा जाम आवडायचा. <<< मलापण. त्यात एका स्नेह्यांच्या शेंडीचा उल्लेख होता. तो खास आवडीचा पॅरा होता. Lol

'कलिंगड' धडा म्हणूनही कधी आवडली नाही आणि नंतर वाचताना तर अत्यंत आव आणून लिहिलेली कृत्रीम कथा वाटली.
>> त्यात एक वाक्य होत 'आपण एक मुल पाळू या का' या अर्थी... इतकं खटकलं होतं ते.
पण बाकी कथा आवडलेली.

त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न याने करावे >> यावरून एक धडा आठवला, त्यातली मुलगी गरीब असून शिकलेली असते. पण नवरा हूंडा मागतो म्हणून ऐन लग्नात नकार देते. तिचा डॉक्टर आत्येभाऊच लग्न करतो मग तिच्याशी.
कोणाला नाव आठवतय का? त्यात आत्येभावाला काहीतरी वेगळा शब्द होता.. फुय वरून..

आगाऊ सांगतोय त्यातला एकही धडा मला नव्हता Happy
दमडी मलाही होता. मला भाकरीचं झाडं सुद्धा होता ७वी मध्ये.
दमडी ६वी मध्ये Happy

कलिंगडची तीच कथा आहे चैत्रा, तिला दत्तक मुलं घेणं पटत नसतं पण एक कलिंगड त्यांना जवळ कसं आणतं Happy

लाल चिखलचे लेखक माहीती करुन सांगते Happy

लाल चिकलचे लेखक लिहिले आहेत की वरती.. भास्कर चंदनशिवे...

रेडिओची गोष्ट म्हणून पण एक धडा होता.. बहुतेक ९वीला..
आणि नरेंद्रबांसी भेटी अनुसरण...

आणि बुद्ध हसला असाही एक धडा होता..

झोंबी आनंद यादव

लाल चिखल मधे शेवटच वाक्य....'' आणि नंतर कितीतरी वेळ तो त्या चिखलात नाचत होता" Sad

दमडी ( ५ वी ) >>> तीला भाकरी बरोबर शेव खायला हवी होती...

गोकुळ > अर्धा तोळा साखर आणि शेरभर केशर आणतो

शितु > हुप्प्याने हात फोडला

बेगड > प्रकाश बर्‍याच काळाने आपल्या घरी गावी येतो पण बसमधून उतरल्या क्षणापासून त्याच्या तुसड्या वागण्याला सुरुवात होते. घरातली प्रत्येक गोष्ट त्याला ठसठशीतपणे ओंगळ दिसू लागते. त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न याने करावे असे आई-वडलांचे मत असते पण त्याला अचानक मामाची मुलगी (सीता?) गावंढळ वाटू लागते.

धुणं > साट्यालोट्याचे लग्न.. मनाने प्रेमळ पण आपल्या मुलीला सासुरवास होतोय हे ऐकुन रागाने सुनेला म्हणजे मुलीच्या नणंदेला थोबाडीत मारणारी सासु

दादी माय - ५ वी........मुलं भांडत असतात... " दादी माय तु कोनाची" मग दादी माय चिडते आणि बोलते " माहे कांडके करुन घ्या " मग मुलं गप्प बसतात

माझ्यावर खोल परिणाम केलेला धडा म्हणजे कुरुंदकरांचा शिवाजी महाराजांवरचा. त्यांच्या लिखाणाच्या प्रेमातून मी अजून वर आलेलो नाही!

Pages