लेखन

उद्घाटन

Submitted by आतिवास on 14 November, 2013 - 06:23

“नमस्कार” एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.
प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले.
“कोण आहेत हे?” मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं.
“अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले.” त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं.

चंद्रमुखी - लेखक - विश्वास पाटील

Submitted by दिनेश. on 13 November, 2013 - 07:51

विश्वास पाटील हे माझे अत्यंत आवडते लेखक. त्यांच्या बाकीच्या कादंबर्‍या वाचून झाल्या होत्या तरी चंद्रमुखी मात्र वाचायची राहिली होती.
या कादंबरीची जाहीरात बरीच झाली होती पण त्या मानाने ती वाचकप्रिय झाली नाही. पाटलांची म्हणून वाचायला जाल तर तितकिशी आवडणार नाही, पण तशी वाचनीय आहे.

तमाशा कलावंत चंद्रमुखी व महाराष्ट्रातील खासदार दौलत यांची हि कथा. प्रेमकथा म्हणवत नाही, कारण
खरे प्रेम दोघांकडून आहे असे वाटत नाही. शेवटही अपेक्षेपेक्षा थोडा वेगळा आहे.

अंत नसलेल्या कथा- १

Submitted by साजिरा on 13 November, 2013 - 07:05

आताच्या रविवार-सकाळी त्याला पुन्हा ते सारं आठवलं.

कालच त्याने त्याच्या सुंदर वन-बीएचके महालाचा ताबा घेतला होता. फर्निचरचा सोस नव्हताच, पण किचन-प्लंबिंग-खिडक्या-पडदे-बसायची जागा-झोपायची जागा-स्टडी-लायब्ररी हे त्याने मनासारखं आणि अद्ययावत करून घेतलं होतं. खिडक्यांतून दिसणार्‍या टेकड्या, त्यांमधला सुर्यास्त आणि त्यानंतरचा दूरवर दिसणारा हायवेवरचा झगमगाट हे फारच विलोभनीय होतं.

विषय: 

एक संवाद

Submitted by सुशांत खुरसाले on 12 November, 2013 - 09:18

"आपणच फुलवलेली जुनी बाग पाहायला जावी आणि पायात काटे टोचावेत, असं काहीतरी झालं गं !"

"जुनाट ,जळमटलेल्या स्मृतींच्या बाजारात एकटाच फिरशील ..तर मग त्रास तर होणारच !!"

"किती तल्खली आहे ना ! जुन्या स्मृतींचं शहर, प्रत्येक रस्त्यावरती अतृप्तीचा एक कोष मिरवणारी इच्छा ,स्वतःचाच होऊ देईना आणि दुसर्यापर्यंत पोचू देईना अशी आसक्ती ,पराभवाचे जुनाट मनोरे ,विजयाच्या उन्मादाला चिकटलेले पूर्वग्रहांचे सूर !"

"आणि त्यातच शुन्यात पाहणारे निरिच्छ आजोबा, तोच चहा करणारा पोरगा ,स्वतःच्याच धुंदीत सायकल पिटाळणारी लहान पोरं ..आणि यांच्यापैकी कोणीच कसं बदललं नाही याची खंत...मला वाटलंच होतं .तू हेच बोलणार ."

विषय: 

बायको म्हणजे.....

Submitted by डॉ अशोक on 12 November, 2013 - 00:20

बायको म्हणजे.....
(कविवर्य फ.मु. शिंदे यांची माफी मागून)

xx xx xx xx xx xx xx xx xx xx
xx xx xx xx xx xx xx xx xx xx

बायको म्हणजे.....

Submitted by डॉ अशोक on 12 November, 2013 - 00:20

बायको म्हणजे.....
(कविवर्य फ.मु. शिंदे यांची माफी मागून)

बायको म्हणजे नुसते नाव नसते
सार्‍या आयुष्याला केलेला घेराव असते

जवळ असते तेंव्हा जाणवत नाही
दूर जाते तर "जा" म्हणवत नाही

पंगत संपते, पानं उठतात
भरल्या पोटी आसवं दाटतात
बायको हातात तशीच ठेवते काही
नवर्‍यालाच कळावं असं काही-बाही

बायको असते एक धागा
संसाराच्या देवळातल्या पणतीची जागा
घर हंसतं तेंव्हा तिही हंसते विसरून भान
घर रडलं की
ती ही सैरभैर, घालून खाली मान

बायको घरात नाही?
तर मग कुणाशी बोलतात जाइ-जुई?
बायको खरंच काय असते?
आपल्या मुलाची आई असते
बहिणीची ताई असते
तर नवर्‍यासाठी

बदला

Submitted by तुमचा अभिषेक on 10 November, 2013 - 05:41

दूरवर मोकळे आकाश आणि त्या पलीकडे काहीच न दिसणार्‍या एका ओसाड माळरानावर अगदी मध्यभागी धापा टाकत मी एकटाच उभा होतो. पायातना कळा निघत होत्या, जणू काही नुकतेच एखादी मॅरेथोन मी जीव तोडून संपवली होती. पण अजूनही उराची धडधड काही थांबली नव्हती, जणू अजूनही ती जीवघेणी शर्यत बाकी होती. आणि हो, खरेच. पुन्हा क्षितिजावर धुळाचे लोट उठताना दिसू लागले. काहीच सुस्पष्ट दिसत नव्हते, एक किनार ती काय, पण मी समजून चुकलो की पुन्हा ती जनावरे माझ्याच दिशेने चाल करून येत आहेत. मी वळून त्यांना पाठ करून पळायला सुरूवात केली. पुढे कुठवर पोहोचायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन