चंद्रमुखी - लेखक विश्वास पाटील

चंद्रमुखी - लेखक - विश्वास पाटील

Submitted by दिनेश. on 13 November, 2013 - 07:51

विश्वास पाटील हे माझे अत्यंत आवडते लेखक. त्यांच्या बाकीच्या कादंबर्‍या वाचून झाल्या होत्या तरी चंद्रमुखी मात्र वाचायची राहिली होती.
या कादंबरीची जाहीरात बरीच झाली होती पण त्या मानाने ती वाचकप्रिय झाली नाही. पाटलांची म्हणून वाचायला जाल तर तितकिशी आवडणार नाही, पण तशी वाचनीय आहे.

तमाशा कलावंत चंद्रमुखी व महाराष्ट्रातील खासदार दौलत यांची हि कथा. प्रेमकथा म्हणवत नाही, कारण
खरे प्रेम दोघांकडून आहे असे वाटत नाही. शेवटही अपेक्षेपेक्षा थोडा वेगळा आहे.

Subscribe to RSS - चंद्रमुखी - लेखक विश्वास पाटील