लेखन

दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस )

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस)

चि शरण्या (उर्फ पिन्नीस)

उद्या तुला पाच वर्ष होतील. तुला म्हणून हे असम्बद्ध पत्र लिहीतो आहे. खरतर स्वतालाच उद्देशून आहे हे. शब्द तोकडे असतील पण भावना मात्र खर्‍या आहेत.

पाच मार्चची तारीख माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी तारीख आहे. देवाने मला दिलेला स्पेशल डे आहे म्हण ना. आता मी लिहीलेल तुला कदाचित वाचता येणार नाही पण थोडी मोठी झाल्यावर तुला कळेल मला नक्की काय म्हणायचे आहे ते.

विषय: 
प्रकार: 

हरवलेली कविता

Submitted by सई केसकर on 4 March, 2017 - 02:26

माझ्या लेखनाची सुरुवात कवितांनी झाली. मी तेव्हा पाचवीत होते. नुकतीच माझी शाळा बदलली होती. आणि नवीन शाळेत मला कुणीच जवळचं असं नव्हतं. ना मैत्रिणी, ना आवडत्या बाई (किंवा ज्यांची मी लाडकी असीन अशा बाई), ना आवडणारं एखादं बाक किंवा एखादी कोपऱ्यातली डबा खायची जागा. माझ्या सवयीचं आणि आवडीचं असं नव्या शाळेत काहीच नव्हतं. दर सोमवारी सकाळी, अंथरुणातच माझ्या छातीवर एक मोठ्ठा, काळा ढग येऊन बसायचा. आता उठून आवरून परत त्या रुक्ष इमारतीत जायचं, या विचारानी डोळे उघडायच्या आतच त्यात काठोकाठ पाणी भरायचं. ते वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं. आणि कदाचित त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मी कविता करू लागले.

विषय: 

पुढेच जाणे शक्य असावे फक्त नदीला

Submitted by सुप्रिया जाधव. on 2 March, 2017 - 21:21

डोंगराकडे पाठ फिरवते उगमघडीला
पुढेच जाणे शक्य असावे फक्त नदीला

निसर्गासही ऋतुचक्राची वारी घडते
चुकला आहे प्रवास कोणाच्या राशीला ?

वीज मुक्याने अंधाराला कापत जाते
गडगडून ढग जाहिर करतो मर्दुमकीला

आपुलकीचा बांध घालुया मनामनांवर
विचार राहू दे सामायिक वहिवाटीला

लाटेवरती स्वार होउनी वारा येतो
आतुरलेला नवरदेव जणु लग्नघडीला !

सुप्रिया

विषय: 

फुले फुलतात देठावर!

Submitted by सत्यजित... on 28 February, 2017 - 14:53

कुठे असतात भानावर...
फुले फुलतात देठावर!

मनाची काहिली होते...
तुझा शिमगा जरा आवर!

जरासा तोल जाऊ दे...
भले नंतर मला सावर!

तुझे येणे कुठे लपवू?
जसा गजरा..तुझा वावर!

जळाले आजही काजळ...
तुझ्या लालीच ओठावर!

—सत्यजित

गुब्बी

Submitted by मुग्धमानसी on 28 February, 2017 - 05:27

फेणीची अख्खी बाटली रिचवून तर्र झालेल्या अस्सल बेवड्यासारखी बेताल झोकांड्या घेत मी त्या करड्या गुळगुळीत डांबरी रस्त्याशी अचानक फारकत घेउन तोर्‍यानं मागे वळून तरातरा खाली दरीत उतरू लागते तेंव्हा माझी मलाच मी कुणी ’वेगळी’ आणि ’छानदार’ असल्यासारखं वाटतं. मी मोकळी हसते त्या वळणापाशी. खिदळते म्हणाना...!

शब्दखुणा: 

पद्मा आजींच्या गोष्टी १५ : श्रद्धेचे बळ

Submitted by पद्मा आजी on 26 February, 2017 - 00:30

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

सर्वांच्या अभिप्रायां बद्दल धन्यवाद. तुमच्या अभिप्रायांमुळे मला प्रोत्साहन मिळते व नवीन गोष्टी आठवतात. म्हणून प्रतिसाद देण्याची विनंती.

मी तुम्हाला आज माझ्या बहिणीच्या सासऱ्यांची गोष्ट सांगणार आहे. फार जुनी गोष्ट आहे.

एकदा काय झाले, मी गेले होते माझ्या मोठ्या बहिणीच्या सासरी म्हणजे - नागपूरला. धंतोली परिसरात राहायची ती.

तुमचा" फर्स्ट" क्रश कोण होता/होती????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 24 February, 2017 - 09:44

फर्स्ट क्रश ....सर्वांच्याच मनाचा हळवा कोपरा.फर्स्ट क्रशवर याआधी जुन्या मायबोलीवर धागा येऊन गेला आहे.पण तेव्हाचे बरेच सदस्य गायब आहेत व तांत्रिक अडचणीमुळे तो धागा वर काढता येत नाही आहे.त्यामुळे हा नविन धागा सुरु करत आहे.

विषय: 

मराठी भाषा २०१७ लेखमाला ( अहिराणी )

Submitted by jayantshimpi on 24 February, 2017 - 09:36

मना मामाना गावमा एक डाव असं घडनं. मी तवयं धाकला व्हतू.पन मना मामा , मना दोस्त व्हता. रातले, मी मामाना जोडे जपाले जाये. तवय मना मामा माले रोज गावमा काय काय घडनं, ते सम्दं सांगे. मामाले चावयानी भलती गोडी व्हती. मामीले आयकाना भलता कटाया व्हता. म्हनिसन माले गावमा काय काय भानगडी चालु शेतस त्या बठ्ठा समजे.

विषय: 

लहानग्यांचं युद्ध ( विचित्रकथा: weird fiction )

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 February, 2017 - 10:23

“या फोटोकडे एकदा काळजीपूर्वक पहा. मुलांनो, तुमच्यापैकी दोघांना आतापर्यंत मिशा चिकटवता आल्या नाहीत. व्यवस्थित खेळा, रशियाचं भविष्य तुमच्या हातांत आहे.”

राजीनामा

Submitted by सोन्याबापू on 22 February, 2017 - 02:42

आधी इतरत्र प्रकाशित

लेखक/अनुवादक - सोन्याबापु

कथा - राजीनामा

बोलीभाषा - वऱ्हाडी

मूळ कथा - इस्तीफा

मूळ लेखक - मुन्शी प्रेमचंद.

मूळ भाषा - हिंदी

राजीनामा

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन