दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस )

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
<1’

दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस)

चि शरण्या (उर्फ पिन्नीस)

उद्या तुला पाच वर्ष होतील. तुला म्हणून हे असम्बद्ध पत्र लिहीतो आहे. खरतर स्वतालाच उद्देशून आहे हे. शब्द तोकडे असतील पण भावना मात्र खर्‍या आहेत.

पाच मार्चची तारीख माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी तारीख आहे. देवाने मला दिलेला स्पेशल डे आहे म्हण ना. आता मी लिहीलेल तुला कदाचित वाचता येणार नाही पण थोडी मोठी झाल्यावर तुला कळेल मला नक्की काय म्हणायचे आहे ते.

मला तो दिवस अगदी कालच्या सारखा आठवतो. सन्ध्याकाळी ४ पासून मी अस्वस्थ येरझार्‍या घालतो होतो. डॉक्टरीण बाई मध्ये मध्ये येऊन काय काय सान्गून जात होत्या. त्या म्हणाल्या नॉर्मल डीलीव्हरी कठीण दिसतेय बहुदा सीझेरीयन करायला लागेल. रात्री १०.३७ मिनीटानी मला बोलवण्यात आल. आता बहुदा सीझेरीयन करायला लागणार मला वाटल. पण डॉक्टर काही बोलल्याच नाहीत. मनातून खुप खुप भिती वाटली अगदी रडू फुटल म्हण ना. त्या म्हणाल्या अहो बघा तरी बाळाकडे. आणि इतक्या वेळ काळजीत असलेल्या मला तू दिसलीस डॉक्टरीण बाईन्च्या डाव्या हातात. इतकुशी वितभर, टुकुर टुकुर डोळ्याने बघणारी, माझ्या सारख्याच लाम्ब कानाची आणि तान्बूस गोर्‍या रन्गाची

तुझा पहिला फोटो काढण्यासाठी मी केमेरा सरसावला आणि तू अगदी फ्रेम कडे बघायला लागलीस अगदी पोझ दिलीस म्हण ना. मला वाटल तू तुझ्या चिन्गूट्ल्या डोळयाने अगदी थेट केमेरा आडच्या माझ्या डोळ्यात बघते आहेस. फोटोला अशी लोभस पोझ देण्याची तुझी सवय अगदी तेन्व्हा पासूनची बर का. नन्तर तुझे खुप सारे फोटो काढले पण त्या पहील्या फोटोची सर अगदी कश्शालाही नाही बर का. माझ्या साठी तो जगातला सर्वात सुन्दर फोटो आहे.

खर तर मला खुप काही लिहायचे आहे पण जमतच नाहीये ग. पण मला काय म्हणायच आहे ते खुप थोडक्यात सान्गतो जी जगातल्यामाझ्या सारख्या अगदी अगणीत पित्यान्च्या भावना असतील.

बापूस नावाचा हापूस असतो

आई सान्भाळते उदरात आणि बापूस जपतो काळजात

लुटुपुटुच्या खेळात...
बापूस असतो कन्स लेक होते कृष्ण
लेक जर भीम तर बापूस जरासन्ध

भातुकलीच्या खेळात जीरे कढी पत्त्याची फोडणी पडते
बापूस खोकतो फोडणीने आणि लेक नेत्रातून हसते
डोळ्यातला हर्षदव तीच्या गालावर ओघळतो
हसू तीचे झेलत बापूस मनात पाघळतो

पाठवणीच्या वेळी माय मावशी रडते पण बापूस मात्र रडत नाही
पालवी कुढल्यावर झाडाचे आक्रन्दन जगाला कधी कळत नाही

पडलेल्या आम्ब्याचा बाठा कधी झरत नसतो
गर झडला बाठा उरला तरी गोडवा कधी सरत नसतो
कारण ....
बापूस नावाचा हापूस असतो बापूस नावाचा हापूस असतो

केदार अनन्त साखरदान्डे

विषय: 
प्रकार: 

पडलेल्या आम्ब्याचा बाठा कधी झरत नसतो
गर झडला बाठा उरला तरी गोडवा कधी सरत नसतो
कारण ....
बापूस नावाचा हापूस असतो बापूस नावाचा हापूस असतो >>> निशब्द अप्रतिम. खूप गोड वर्णन केलय. पु.ले.शु.

Dhanyawad