लेखन

तो आणि ती

Submitted by अक्षय. on 8 February, 2017 - 07:14

तो आणि ती
( आज ते दोघे भेटणार होते. तसे ते प्रत्येक विकेंडला भेटतात पण आज थोडं विशेष होतं. त्याला player of the tournament भेटलेलं.दोघेही excited होते. तो तिला काय भेटलं ते दाखवायला आणि ती Congrts करायला. रोजच्या कामा मधून वेळात वेळ काढून विकेंडला भेटणा-या प्रत्येकासाठी तो आणि ती )

शब्दखुणा: 

तो आणि ती

Submitted by अक्षय. on 8 February, 2017 - 07:14

एक्साईटमेंट मुळे जास्त वेळा पोस्ट झालीय अॕडमिन ना रिक्व,ंंट आहे त्यांनी जास्ती झालेले धागे डिलीट करावे.

शब्दखुणा: 

सार्थक

Submitted by रेव्यु on 6 February, 2017 - 23:28

आजि सोनियाचा दिनु
"बाबा ,मी निघतोय् ",ला अर्धवट झोपेतच अवि ---अविनाशने -विवेकला आपल्या लेकाला "बॉन व्हॉयेज" असा झोपाळू प्रतिसाद दिला.

विषय: 

अव्यक्त (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 6 February, 2017 - 09:40

"पाच जुनला लग्न आहे.."

केतनचा मेसेज होता, मी तेवढेच वाचू शकले, पुढचा मजकूर मला वाचायचा नव्हता.

मेसेज जरी बऱ्याच दिवसांनी आला असला तरी केतनची आठवण रोज येत असे, आठवण नाही, त्याची सवय लागली होती, माझ्यासारख्या सत्तावीस वर्षाच्या मुलीची, केतन एक चांगली, वाईट कशी का असेना, एक सवय होता, तुमचं नात संपत पण सवय नाही ना संपत!

रोजची एक सवय, सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना आणि मग कामाच्या मधूनच, त्याचा व्हाट्सअँप डीपी, स्टेटस बघायचा, त्याचा नंबर डिलिट करायचा, परत सेव्ह करायचा, ब्लॉक करायचा, अनब्लॉक करायचा, नंबर पाठ असला तरी!!

"तो सध्या काय करतो?"

Submitted by चिन्गुडी on 6 February, 2017 - 02:15

ती सध्या काय करते " च्या धर्तीवर "तो सध्या काय करतो?" असा साधारण पडलेला प्रश्न !

विषय: 

बाळ! तू मोठेपणी कोण होणार?

Submitted by सचिन काळे on 5 February, 2017 - 21:23

'बाळ! तू मोठेपणी कोण होणार?' हा प्रश्न मला वाटतं बालपणी कोणालाही चुकलेला नाही. घरी आलेले पाहूणे सहज कौतुकाने बाळांना विचारत. आणि बहुतेक बाळांचे ह्यावर ठरलेले उत्तर असायचे. "मी ना! डाकतल होणार आणि सर्वांना टोची टोची कलणाल" नाहीतर "मी ना! अमिता बच्चन होणार आणि ढिशुम ढिशुम कलणाल" ह्यावर पाहुणे बाळाचा गालगुच्चा घेऊन "हो का रे लब्बाडा!" असे म्हणत बाळाची प्रेमाने पापी घेत. आणि तिकडे बाळाच्या आईवडिलांनाही आपल्या बाळाला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं होऊन जाई. काही बाळांना मोठेपणी 'परी' तर काहींना 'बाप्पा' व्हावेसे वाटे.

शब्दखुणा: 

५० सुक्ष्मकथा: मेँदुला खुराक पुरवणारा कथांचा एक भन्नाट प्रकार

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 31 January, 2017 - 02:30

सुक्ष्मकथा म्हणजे अतिशय छोट्या कथा. इंग्रजीमध्ये हा प्रकार ten words story, twenty words story, nanofiction वगैरे नावांनी मिरवतो. मराठीमध्ये एवढ्या छोट्या कथा लिहण्याचा प्रयत्न फार क्वचित झाला आहे.

शब्दखुणा: 

ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा...

Submitted by सत्यजित... on 30 January, 2017 - 14:26

ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा...
का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा!

मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा...
अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा!

आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते...
केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा!

ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी...
खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा!

काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती?
ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!

—सत्यजित

Pages

Subscribe to RSS - लेखन