तुमचा" फर्स्ट" क्रश कोण होता/होती????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 24 February, 2017 - 09:44

फर्स्ट क्रश ....सर्वांच्याच मनाचा हळवा कोपरा.फर्स्ट क्रशवर याआधी जुन्या मायबोलीवर धागा येऊन गेला आहे.पण तेव्हाचे बरेच सदस्य गायब आहेत व तांत्रिक अडचणीमुळे तो धागा वर काढता येत नाही आहे.त्यामुळे हा नविन धागा सुरु करत आहे.
सुरवात अर्थात माझ्यापासून करतो,माझा फर्स्ट क्रश माझ्या वर्गातली माझी वर्गशिक्षीका होती.तिचे नाव अपर्णा होते.तेव्हा मी असेन सातवीत.तिचा तास पहिलाच असायचा व मी नेहमीप्रमाणे उशीरा जायचो.तेव्हा मी हाफ पॅन्ट ,शर्ट या गणवेशात असल्याने भारी लाज वाटायची तिच्या समोर जाताना.शिकवताना रांगेतून फेर्या मारत ती जवळ आली की माझ्या छातीत धडधडायचे.अनेकदा मि तिच्याबरोबर पळुण जाऊन लग्न केल्याची स्वप्न बघायचो(हो! सातवीत!!) .नंतर अनेक क्रश होते ,आजही आहेत .पण पहिल्या क्रशची शिरशीरी अजून अंगावर येते.
तर मंडळी लाजू नका ,लिहा तुमच्या फर्स्ट क्रशविषयी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूख आणि काजोल Happy

मला लहानपणी नेहमी वाटायचे की त्या दोघांचे घटस्फोट व्हावेत आणि आमचे तिघांचे लग्न व्हावे आणि आम्ही तिघांनी धमाल करत एकत्र राहावे Happy

तुला शाखामृगाशी लग्न करायचे होते, हा हन्त हन्त

आत्तापर्यंत मी तुला वेगळाच समजत आलेलो.....

तु एकदमच आगळा वेगळा निघालास Happy

आशुचॅम्प मी तेव्हा लहान होतो. आणि तुम्ही कधी लहानपणी घर घर नाही खेळला आहात का? लहानपणी आपल्यासाठी लग्नाचा अर्थ एकत्र मजा करत राहणे ईतकाच असतो. मग कुठेतरी आपण वयात येतो. आणि लग्न म्हणजे सर्वात पहिले शरीरसुखाची सोय बघणे असा नव्याने अर्थ लागतो.

ऋन्मेष,
वयात आल्यावर लग्न म्हणजे शरीरसुखाची सोय हा अर्थ लागतो आणि अक्कल आल्यावर काय लागतो?

>>>> ऋन्मेष, वयात आल्यावर लग्न म्हणजे शरीरसुखाची सोय हा अर्थ लागतो आणि अक्कल आल्यावर काय लागतो? <<<< Lol
सातीतै, तुम्ही हा प्रश्न त्याला "फार म्हणजे फारच आधी" विचारताय असे नै वाटत? Wink त्याचे तर लग्न व्हायचे आहे अजुन...... त्यानंतर (आली तर) येणार अक्कल..... Proud बराच अवधी आहे की अजुन Rofl Light 1

ते एकत्र मजा प्रकरण पण झेपलं नाही बाबा
वयात आल्यावर लग्न म्हणजे शरीरसुखाची सोय हा अर्थ लागतो >>>>>>>>
हे पूर्वीच्या पिढीचे झाले, तुझ्या दाव्यानुसार तू नव्या पिढीचा प्रतिनिधी आहेस, त्यामुळे त्या साठी लग्नाची गरज नाही.

लहानपणी घर घर नाही खेळला आहात का?>>>>> सुदैवाने माझे बालपण अशा काही लोकांसोबत गेले की फिल्मी नट नट्या आमच्या आयुष्याचा भाग नव्हत्या, फँटसी मध्येही नाही. आम्ही आपले नॉर्मल लोक होतो.

लिंबुभौ, ऋन्मेषला आधी अक्कल आली नंतर तो वयात आला.
अक्क्ल नक्की केव्हा आली ते सांगणे कठीण पण बालवाडीय ते शालेय जिवनात केव्हातरी आली असावी. शालेय जिवनात ती होती याची उदाहरणे माबोवर सापडतात.

सिंजी,
माझा फर्स्ट क्रश आमच्याच पाचवीच्या वर्गातला एक मुलगा होता.
जल्ला सेकंड क्रश पण त्याच वर्गातला एक मुलगा होता.
Happy

मानव पृथ्वीकर धन्यवाद,
अक्कल लवकरच आलीय मला. तेव्हापासून चक्रवाढ व्याजाने वाढतेय. आणि जरा जपून खर्च करत असल्याने शिल्लकही बरीच आहे Happy

साती, अक्कल आल्यावर क्रश आणि प्रेम यातला फरक समजतो. मग क्रश आपल्या जागी आणि प्रेम आपल्या जागी ठेवायला जमते.

लोकं उगाच एखाद्याला म्हणतात की प्रेमात आंधळा झाला आहे. खरे तर आपल्याला काय हवेय याची अक्कल त्याला आली असते. फक्त ते समजण्याची अक्कल जगाला नसते.

अक्कल लवकरच आलीय मला. तेव्हापासून चक्रवाढ व्याजाने वाढतेय. आणि जरा जपून खर्च करत असल्याने शिल्लकही बरीच आहे Happy >>>>
थोडी त्या सई आणि स्वनील ला तरी दे की, इतके प्रेम उतू जातय तर

किमान चाळीशीत तरी कॉलेजमध्ये जाणाऱ्या लोकांचे रोल करू नयेत ढेरपोट्या अंगाने इतपत अक्कल दिलीस तरी तमाम मराठी चित्रपट रसिक तुझे आजन्म ऋणी राहतील

तेच तर,
क्रश, शारीरीक आकर्षण, आणि प्रेम या तिघांमधील फरक स्पष्ट झाला की लग्न कोणाशी करावे हे समजते.
एखाद्या व्यक्तीबद्दल शारीरीक आकर्षण हे अर्थातच वयात आल्यावरच वाटू शकते. पण त्याआधीही एखादी व्यक्ती आवडते ते निव्वळ क्रश असते.
उदाहरणार्थ मला चौथीत असताना शेजारची मुलगी फार आवडायची. तिच्याशी मोठे झाल्यावर लग्न करावे असे वाटायचे. ते शारीरीक आकर्षण नव्हते कारण त्या भावना उत्पन्न व्हाव्यात असे माझे वय नव्हते. पण ते शारीरीक आकर्षणाच्या पलीकडले पवित्र वगैरे प्रेम होते अश्यातलाही भाग नव्हते.
मग मी सातवी आठवीत गेलो. ज्या मुलीला बघून मनात गुदगुल्या व्हायच्या बस्स तिच्याशीच लग्न करावे असे वाटायचे.
मग दहावी ते ज्युनिअर कॉलेज. टप्प्याटप्याने या गुदगुल्यांची तीव्रता वाढली ईतकेच. पण होते ते सारे आकर्षणच.
डिग्री कॉलेजला उगाच मला वाटू लागले की आता मला ज्या मुली आवडतात ते आकर्षण नसून आता मी विचारपूर्वक त्यांच्या प्रेमात पडू लागलोय. पण ते देखील तसे काही नव्हते. मुलगी शॉर्टलिस्ट करायचा माझा क्रायटेरीयाच गंडलेला होता. किंबहुना तो शारीरीक आकर्षणाच्या मार्गानेच जात होता.
आणि फायनली कॉलेज संपल्यावर खरेच प्रेमात पडलो ते कुठलाही विचारपूर्वक विचार न करता सहज घडले.
फार फार वर्षांपूर्वीच शाहरूख खान म्हणून गेलाय, प्यार दोस्ती होता है. हे जेव्हा समजते तेव्हा यातली अक्कल आली असे समजावे.

>>>>>>
लोकं उगाच एखाद्याला म्हणतात की प्रेमात आंधळा झाला आहे. खरे तर आपल्याला काय हवेय याची अक्कल त्याला आली असते. फक्त ते समजण्याची अक्कल जगाला नसते.
>>>>>>>>>>>
जवळपास प्रत्येक प्रतिसादात एक एक quotable quote देणे कसे जमते रे तुला ?

जवळपास प्रत्येक प्रतिसादात एक एक quotable quote देणे कसे जमते रे तुला ? << होना ह्याने धागे बन्द केलेत तर आता प्रतिसाद वाचावे लागतात

ऋन्मेष यांचे प्रतिसाद वाचून मला नेहमी 'बावर्ची' सिनेमातील 'राजेश खन्ना' यांनी साकारलेले कॅरेक्टर आठवते. सर्वगुणसंपंन्न, चतुर, हजरजवाबी आणि सर्वकाही.

अगदी अगदी.
खरं तर ऋन्मेष पण मला खूप आवडतो.
पण त्याला क्रश म्हणता येणार नाही.
Wink
असा मुलगा पाहिजे मला असं वाटतं.
Happy

अडॉप्ट तर केलेलाच आहे. केव्हाच. >>>>> पण अ‍ॅडॉप्ट केलं कि परत de अ‍ॅडॉप्ट करता येतं का, अस काही ऐकिवात नाही (संदर्भ - दुरुन डोंगर साजरे Wink )

साती, गर्लफ्रेंडसह असेल तर माझीही काही हरकत नाही. कारण सुखी संसाराच्या सूत्रानुसार नवराबायकोच्या नात्यापेक्षा सासूसुनेच्या नात्यात कसा संवाद आहे हे जास्त महत्वाचे असते.

ऋन्मेऽऽष यांच्या प्रतिसादामधील अनुप्रास लक्षात घेण्याजोगा आहे! "सुखी संसाराच्या सूत्रानुसार" आणि "नवराबायकोच्या नात्यापेक्षा"