लेखन

रुटीन

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

नविन वर्ष, नविन महिना, नविन दिवस
म्हणायच आपलं नविन म्हणून
पण आहे सगळे नेहमीचेच
रुटीन कामाचे रात्र अन् दिवस

रोज सकाळी हापिसात पोचायची नेहमीचीच घाई
हापिसात गेल्यावर नेहमीचीच कामाची यादी
आजचं काम उद्यावर ढकलू म्हटलं तर

विषय: 

नव्या वर्षातला पहिला धक्का अन खरेदी!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

संथपणे नवीन वर्ष उलगडतय म्हणता म्हणता, गेल्या वीकांताला चांगलाच पचका झाला!! गेला आठवडा तसा शांतच गेला, म्हणजे ऑफिसमधे म्हणतेय मी. कुठलाही सर्वर मोडला नाही, कुठलही सॉफ्टवेअर मोडल नाही..सगळ कस शांततापूर्ण. बर वाटल, कधी नाही ते जरा आराम केला. वर्षाची सुरुवात अशी सुखदायक पाहून अगदी धन्य झाले!!

विषय: 
प्रकार: 

तुम्हीच शोधा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

जेंव्हा भळभळत असतात
जखमा आणि कवी भेटतो
काय बघतो? काय दिसते?
काय घेउन जातो?

तुमच्यावर इलाज करण्यासाठी
एखादा डॉक्टर येइल कदाचीत नाही
कवी साथ देइल? दिली तर कोणाची देइल?
कवीसाठी सगळ्याच जखमा साथीच्या असतात

विषय: 
प्रकार: 

असे प्रेम देवा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सहज गीत ओठी कुणी गुणगुणावे
असे प्रेम देवा नशीबी असावे
जणू शिंपल्यातून मोती वसावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

किती छाटले झाड फुटती धुमारे
किती मेघ आले विझे सूर्य कारे ?
किती, वार झेलूनही ना मिटावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

प्रकार: 

गोष्टीतली गोष्ट

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

विश्वासराव सरपोतदार, एक प्रथीतयश लेखक. विशेषतः 'प्रवास वर्णन' आणि 'व्यक्तीचित्रण' ही त्यांची खासीयत. त्यांच्या लिखाणाची सहज शैली वाचकांना भूल पाडत असे. पण गेले काही महीने, ते अगदी अज्ञातवासात गेलेले.

विषय: 
प्रकार: 

विसूनाना उवाच.... (१)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

नमस्कार मंडळी! मी काय सांगतोय, ऐकता का जरा??

हो, पण त्या आधी, माझी ओळख.... मी विश्वास कुलकर्णी, पण आता वयामानानुसार, विसूनाऽऽऽऽना, होऽऽऽ!! आणि मंडळी, विश्वास वरून विसूनाना या स्थित्यंतरापर्यंत यायला हे केस काळ्यांचे पांढरे झालेत आणि तसाच अनुभव ही जमलाय गाठीशी, म्हणून सांगतोय बापडा...... ऐकायच तर ऐका, उपयोगच होईल!! तर, अस ऐकतोय की लवकरच लग्नाच्या बेडीत अडकायची स्वप्न बघताय आपण?? ठीकाय. तर मग ऐकाच माझे अनुभवाचे बोल एकदा!

विषय: 
प्रकार: 

आमचा बॉस आणि आम्ही

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आमचा बॉस आणि आम्ही, एकत्र राबतो. बॉस राबवतो. आम्ही 'राब'तो. आम्हाला कधीतरी ऑफीसला जायला उशीर होतो. नेमका तेंव्हाच, आमचा बॉस लवकर आलेला असतो. आम्हाला पाहून आमचा बॉस एकवार आमच्याकडे बघतो आणि एक वेळ घड्याळाकडे.

विषय: 
प्रकार: 

बर्‍याच दिवसांनी एक प्रयत्न .. (तिरळे)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

घर सजलं
अंगण भिजलं
... पावलांची प्रतीक्षा !

*******************

तानपुरा आणि ती -
तत्सूर ...
विधात्या, नाहीच कुठे कसूर !

******************

विषय: 
प्रकार: 

संकल्पाची ऐशी तैशी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

जसजस नव वर्ष जवळ येतय, तसतस नवीन वर्षाचे संकल्प, या विषयाला चांगलीच मागणी आणि धार चढायला लागलेली दिसतेय! बर्‍याच अनुदिन्यांवर देखील नवीन वर्ष, नवे संकल्प इ.इ. वर लेखण्या सरसावल्या गेल्यात!! बर्‍यापैकी चावीफळे (पक्षी: कीबोर्ड) बडवून झालेत! बर्‍याच उत्साही जनांनी 'नेमेचि येतो मग पावसाळा' च्या धर्तीवर 'नेमेचि करु या संकल्प आता' म्हणून संकल्प केलेही असतील. हां, आता अजून १ जानेवारी २००८ आणि पुढच वर्ष उजाडलेल नाही, त्यामुळे, हे संकल्प खरोखरीच राबवले जाताहेत का ते मात्र कळायला अजून वाव नाही!!

विषय: 
प्रकार: 

नूतन वर्षाभिनंदन

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

या नववर्षात, सकल मायबोलीकरांच्या आयुष्यात, असेच प्रकाशाचे झाड उजळू दे.
आपलाच
दिनेश.

SURYA.jpg

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - लेखन