लेखन

ओठ...

Submitted by दिपक ०५ on 14 July, 2017 - 13:45

सौंदर्याचे स्वप्न घेउनी रात्र येई माझ्यापाशी,
तुटता मात्र जाग येई.. मन हे माझे हरपून जाई..

सुसांग वारा थटावा मुखाशी,
नाव येई प्रियेचे ओठाशी..
क्षण असा मज कधी मिळाला,
जगून घेईन आयुष्य सारे..,
या हृदयावर नाव कुनाचे,
येईल माझ्या ओठांपाशी...

शिवी

Submitted by सुबोध अनंत मेस्त्री on 14 July, 2017 - 13:01

"सुबू, जरा सार्थककडे लक्ष दे. काल घरात शिवी दिली त्याने. म्हणजे सहज बोलता बोलता बोलला", प्रतिभा आणि मी ट्रेन मधून घरी येत होतो. दरवाजाच्या बाजूला असणाऱ्या पॅसेज मध्ये ती जाळीबाजूच्या पार्टिशनला टेकून उभी होती आणि मी तिच्या समोर. ट्रेनला एवढी गर्दी नव्हती.

"काय दिली शिवी?", मी प्रतिभाचा चेहरा बघून मुद्दाम विचारलं. तिला शिव्या पहिल्यापासूनच आवडत नाहीत.

"अरे ती बहिणीवरून देतात ना ती. मला अगोदर समजलं नाही. मी पुन्हा अण्णांना ऐकायला सांगितलं. तर शिवीच होती ती", ती त्रासिकपणे सांगत होती.

"बरं मग", मी विचारलं.

विषय: 

अनपेक्षीत येणं

Submitted by र।हुल on 14 July, 2017 - 12:22

काही व्यक्ति माणसाच्या जिवनात अनपेक्षितपणे येतात आणि जिवनातील बदलांना सहजपणे कारण होतात. कधीकधी त्यांनाच माहीती नसतं की आपण समोरच्याच्या जिवनात काय बदल घडवला. अशा जिवनात आलेल्या व्यक्ती दिर्घकाळ लक्षात राहतात. ह्या व्यक्ती जर पुढील जिवनात आपल्या सोबत राहील्या तर जीवनाला निराळाच अर्थ प्राप्त होतो.पण अशी सोबत शक्य नाही अशी जाणिव दोन्हीकडे असेल आणि एकमेकांप्रती कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नाहीत तर एकमेकांच्या सानिध्यात घालविलेला *लहानसा काळ*सुद्धा संस्मरणीय होऊन आठवन बनून जिवनभर सोबत करतो. जिथं अपेक्षा नसतात तिथं शुद्ध प्रेम असतं! आपलेपणा असतो.

लहानपणीचे संस्कार! .... (भाग -१)

Submitted by मेघा. on 12 July, 2017 - 08:31

काल एका गप्पांच्या धाग्यावर राहुल ने चोरी करण्यासंबंधी एक प्रतिसाद दिला होता..आपल्या घरातल्या,आजूबाजूच्या वातावरण नुसार आपण कसे घडलो जातो .. आपल्या स्वभावात ,वागण्यात त्याचा कितपत परिणाम होतो..याच ते उदाहरण होतं.. तेव्हा मलाही माझ्या लहानपणीचा एक प्रसंग आठवला ....तो इथे शेयर करतेय.. असे बरेच आहेत आज एक ...

विषय: 

वूडलँडचे सँडल आणि BMW 1300S

Submitted by अतरंगी on 12 July, 2017 - 08:23

" बाबा, मला वूडलँडचे सँडल घ्यायचेत"

"अरे आत्ताच कॉलेज चालू व्हायच्या आधी सँडल घेतले होतेस ना?"

"हो पण ते साधे आहेत, मला वूडलँडचे हवेत"

" का ?"

"तेच चांगलेत, सॉफ्ट असतात, त्या साध्या सँडल ने मला चालताना त्रास होतो...." उगाच काहीच्या काही कारणे द्या मोड मध्ये मी.

"बरं बरं घेऊ "

"कधी?"

"दिवाळीला...."

"नाही नाही मला आत्ताच पाहिजेत"

वडिलांनी किती समजूत काढली पण तरी मी तो सँडल घ्यायला लावलाच. का ? तर आमच्या वर्गातली मोजकी श्रीमंत टाळकी तेव्हा वूडलँडचे सँडल वापरायची आणि मला पण त्यामुळे तोच हवा होता...

पुळण - भाग ४

Submitted by मॅगी on 12 July, 2017 - 02:24

भाग ३

पाऊस थांबला असला तरी 'वनराजी' समोरच्या उंच, भलं भक्कम खोड पसरलेल्या गोरखचिंचेच्या पानापानातून थेंबांचा वर्षाव होत होता. ते पाणी चुकवत समिपा आणि क्यूटी गेटजवळ आल्या. घराची किल्ली जवळ असली तरी घर व्यवस्थित दाखवण्यासाठी जवळ राहणाऱ्या सखुबाई येतील असे मेहतांनी सांगून ठेवले होते. सखुबाईंच्या मुलाला आधी कॉल करूनसुद्धा त्या काही आल्या नव्हत्या.

"ये बाई तो आईही नाही अभीतक! क्या करे मॅम? चलो ना, हम ही अंदर चलते हैं" इतक्या राड्यातही क्यूटीचा उत्साह कायम होता.

विषय: 
शब्दखुणा: 

मोकळे केस

Submitted by मोहना on 11 July, 2017 - 22:56

"बाबा" बागेत खेळणारी माझी चिमुरडी धावत धावत माझ्या दिशेने येत होती. मी पाहत राहिलो तिच्या केसांकडे. कापलेल्या कुरळ्या केसांचं टोपरं इतकं गोड दिसत होतं. मला येऊन घट्ट बिलगली. तिला जवळ घेत मी पापा घेतला तसं तिने माझ्या गालांवर ओठ टेकले.
"काय रे पिल्ला?" लेकीच्या केसातून माझे हात मायेने हात फिरले.
"बाबा, मला तू आवडतोस."
"हो? का गं?"
"आवडतोस." लेक आणखी बिलगली. मी तिच्या लाडिक स्वरात रमून गेलो. ती पुन्हा खेळायला गेली. आणि मनात काही बाही विचार घोळायला लागले. मिटलेल्या डोळ्यांसमोर ’ती’ उभी राहिली.

शब्दखुणा: 

परीकथा - भाग पंधरा >> २.१० - ३ वर्षे

Submitted by तुमचा अभिषेक on 11 July, 2017 - 12:30

४ फेब्रुवारी २०१७

आमच्यावेळी पालकसभा व्हायच्या. पालकांना वर्गात बसवून आम्हा वर्गातल्या "निवडक" आठ-दहा मुलांना सर्व पालकांसमोर उभे केले जायचे. अश्या निवडक मुलांमध्ये नसल्यास तो आपला अपमान समजून मी नेहमीच त्यात असेन ही काळजी घ्यायचो. आणि मग आमची खर्‍या अर्थाने ‘शाळा’ घेतली जायची. त्यानंतर एक राऊंड घरीही व्हायचा तो वेगळा.

विषय: 

घड्याळाकडे पहायचं असतं !

Submitted by शिवाजी उमाजी on 11 July, 2017 - 04:12

घड्याळाकडे पहायचं असतं !

ढग दाटून आल्यावर आणि पाऊस पडून गेल्यावर, वेळेचं भानच उरत नाही. एरवी सावली सोबत पळणार्‍या आम्हाला पाया खालच्या व लांबत जाणार्‍या सावल्यां वरून वेळेचा अंदाज बरोबर घेता येतो.

अशा अंधार वेळी, मग नजर वारंवार घड्याळाकडे जाते, तेंव्हा हळूच कुुणीतरी म्हणतं "काय गडबड, सारखं घड्याळ पाहताय?" काय बोलणार अशांना? वेळेशी तुमचं सुत जमणं फार महत्वाचं असं मला वाटतं. दर वर्षाचा पहिला पाऊस सगळ्यांना हवा हवासा वाटतो, तसाच बेभरवश्याचा अंधार देखिल, नंतर काय तर सवय होउन जाते दोघांचीही.

विषय: 

एकतर्फी

Submitted by र।हुल on 10 July, 2017 - 12:45

तुझ्यासाठी मी 'कुणीतरी' असेल; तु मात्र माझ्यासाठी एकदम 'खास' होतीस..कारण तू अगदी तशीच आहेस जशी मला हवी होती..तुझ्याशी आजवर कधी एकही शब्द बोललो नाही पण तरीही मला कळलं नाही मी का तुझ्यासाठी वेडा होतो..तुझी वाट पहाणं, तु दिसताच स्वत:ला तुझ्यापासुन लपवणं आणि तू नजरेआड जाताच सुटकेचा नि:श्वास टाकणं, हे नेमकं कशाचं लक्षण होतं? मित्र म्हणायचे, 'तू प्रेमात पडलाय.' ते मलाही पटायचं पण तुला कसं गं समजवणार? तु तर कधी ढुंकूनही पहात नव्हतीस..प्रेम हे असंच असतं का एकतर्फी..मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात कदाचित आयुष्य जाईल..तुला सगळ्यात आधी पाहीलं होतं नाक्यावरच्या चौकात!

Pages

Subscribe to RSS - लेखन