लेखन

मला वजन कमी करायचय

Submitted by kokatay on 2 July, 2017 - 15:23

बघुन स्वत:ला आरश्यात
हरवले मी माझ्याच वनात ...

मनात घट्ट केला विचार
आता मी वजन कमी करणार ...

थोडं वजन चिंतांच, थोडं क्लेशाच
आता मी कमी करणार ...

थोडं मनातल्या गुंतांच
थोडं द्वेषाच बोचकं
आता मी रिकामी करणार ...

थोडं आपल्यासाठी आणि थोडं आपल्यांसाठी
धावायला मी सुरु करणार
आता मी वजन कमी करणार.....

प्रेमाच प्रोटीन आणि मदतीचं विटामिन
आता मी दररोज खाणार ....
आता मी वजन कमीच करणार

ऐश्वर्या कोकाटे
मराठी कल्चर एंड फेस्टिवल्स .कॉम

विषय: 

कथुकल्या १४ ( अंतिम भाग )

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 2 July, 2017 - 13:33

१ .गडदघटनांचे लिखित, छापील अवशेष

कधीच न सापडलेल्या पत्राचे अवशेष ( पहिल्या तीन प्रतिमा)

---------------------------------------------------------

२ .सोशल नेटवर्किंग

नियतीचे वर्तुळ

Submitted by सचिन काळे on 2 July, 2017 - 13:25

रेखा झपझप पावलं उचलत चालत होती. कामावर जायला फार उशीर झाला होता. आठ तेराची लोकल आज पुन्हा सुटणार होती. आजकाल कामावर जायला उशीर होणं रोजचंच झालं होतं. अलार्म वाजूनसुद्धा तिची बिछान्यातून बाहेर पडायची इच्छाच होत नसे. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. ती सतत प्रदीपचाच विचार करी. तासंतास त्याचेच विचारचक डोक्यात फिरत राही. प्रदीपबरोबर आपण जसं वागलो त्याचे ती मनातल्या मनात सारखं समर्थन करण्याचा प्रयत्न करीत राही. आपलं वागणं चूक की बरोबर होतं याचा ती निर्णय करू शकत नव्हती.

विषय: 
शब्दखुणा: 

असा होता माझा बाप

Submitted by वृन्दा१ on 1 July, 2017 - 14:16

मनात हिंमत
डोळ्यांत जरब
निग्रही ओठ
आणि देणारे हात
असा होता माझा बाप !
कणा ताठ
रक्तात स्वाभिमान
मोजकेच शब्द
खोलवर परिणाम
मान आमची सर्वांची
सदैव ठेवली ताठ
असा होता माझा बाप !
झिजला लेकरांसाठी
कष्टला अपार
धैर्याने तुडवले
संकटांचे डोंगर
माया फक्त पोटात
पण ओठांवर ठेवला धाक
असा होता माझा बाप !

विषय: 
शब्दखुणा: 

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी 'पुण्यभूषण पुरस्कार' स्वीकारतेवेळी केलेलं भाषण

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं.

२०१० साली 'त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीनं दिला जाणारा 'पुण्यभूषण पुरस्कार' डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते डॉ. ढेरे यांना प्रदान करण्यात आला होता. प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने या समारंभात डॉ. ढेर्‍यांनी केलेलं हे भाषण -

विषय: 
प्रकार: 

पुरीभाजी आणि प्रेम

Submitted by अजय चव्हाण on 30 June, 2017 - 01:31

पुरीभाजी आणि प्रेम...

पार्ट 1..

"अण्णाऽऽऽ एक पुरी भाजी और कांदा चटणी अलगसे....."
आपण गाडीच्या चावीचं किचेन बोटात फिरवत रूबाबात ऑर्डर दिली...
तसा अण्णा ओळखीचा हसला आणि तीच ऑर्डर त्याने त्याच्या पोर्याला दिली....

विषय: 
शब्दखुणा: 

वडील

Submitted by वृन्दा१ on 29 June, 2017 - 15:24

झळाळता तारा आहात तुम्ही माझा
खूप जवळ पण तरीही खूप दूर
स्पर्शतच असेल ना तुम्हालाही
अश्रूंचा अदृश्य महापूर
पण या जगात भावनेला किंमत नाही
आणि सत्य स्वीकारण्याची माझ्यात हिंमत नाही ….

विषय: 
शब्दखुणा: 

घराला मनांचा उबारा करु...

Submitted by सत्यजित... on 29 June, 2017 - 09:18

नको तेच ते तू दुबारा करु
हवा देउनी मन निखारा करु!

भिजू दे मला तू मिठीशी तुझ्या
पुन्हा पावसाला इशारा करु!

नको मोकळे केस झटकून तू
इथे चांदण्याचा पसारा करु!

खुले केस पाठीवरी सोड ना
खुळ्या मोगऱ्याचा पिसारा करु!

तुझ्या पाउली चंद्र उतरेल तो
कसा मी मला सांग तारा करु!

सखे लाट अनिवार होवून,ये
अता थेंब-थेंबा किनारा करु!

शमावी क्षणातच जिथे वादळे
घराला मनांचा उबारा करु!

—सत्यजित

Pages

Subscribe to RSS - लेखन