अनपेक्षीत येणं

Submitted by र।हुल on 14 July, 2017 - 12:22

काही व्यक्ति माणसाच्या जिवनात अनपेक्षितपणे येतात आणि जिवनातील बदलांना सहजपणे कारण होतात. कधीकधी त्यांनाच माहीती नसतं की आपण समोरच्याच्या जिवनात काय बदल घडवला. अशा जिवनात आलेल्या व्यक्ती दिर्घकाळ लक्षात राहतात. ह्या व्यक्ती जर पुढील जिवनात आपल्या सोबत राहील्या तर जीवनाला निराळाच अर्थ प्राप्त होतो.पण अशी सोबत शक्य नाही अशी जाणिव दोन्हीकडे असेल आणि एकमेकांप्रती कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नाहीत तर एकमेकांच्या सानिध्यात घालविलेला *लहानसा काळ*सुद्धा संस्मरणीय होऊन आठवन बनून जिवनभर सोबत करतो. जिथं अपेक्षा नसतात तिथं शुद्ध प्रेम असतं! आपलेपणा असतो. आणि यातूनच पुढे भावनिक नाते निर्माण होते जे जिवनाला अधिक समृद्ध बनवते. अशी नाती रूक्ष अशा जिवनात थंड वार्याची झुळूक निर्माण करतात;जगण्याला अर्थ प्राप्त होतो.आयुष्यातील सुखदुःखात अशा माणसांची प्रकर्षाने गरज भासते, आठवण येते. जिवन सुंदर बनविण्यासाठी अशा माणसांची नितांत आवश्यकता असते. ज्याला जिवनातील प्रत्येक वळणावर आणि टप्प्यावर अशी माणसं भेटतात तो खरंच नशिबवान असतो. अशा माणसांचा मग इतरांना हेवा वाटू लागतो. स्वत:च्या जिवनप्रवासाकडे मागे वळून बघताना अशी अनेक माणसं आपल्या जिवनात येऊन गेलेली असतात.काहीवेळा तर यांची आपण दखलसुद्धा घेतलेली नसते त्यावेळेस आपण आपल्याच धुंदीत असतो मात्र आपल्या जिवनावर, जगण्यावर आपल्या नकळत त्यांचा प्रभाव पडलेला असतो.
अशी माणसं ही नि:स्वार्थी असतात. निरपेक्षपणे केली जाणारी त्यांची कुठलीही कृती समोरच्याला समोर ठेऊन, त्याच हित लक्षात घेऊन केलेली असते जी सुखकारक ठरते.
―₹!हुल

*__* [लेखात वापरलेले लहानसा काळ हे शब्द साधारणपणे वर्षभराच्या आतील काळ ह्या अर्थानं वापरलेले आहेत.]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल लेख चांगला आहे, पण थोडा विस्कळित वाटला. हे माझं वैयक्तिक मत आहे अर्थात.
आयुष्यात लक्षात राहतील असेल बदल कोणामुळे घडले असतील तर ती व्यक्ती दिर्घकाळ आपल्या आयुष्यात असण्याची जास्त शक्यता असते. कारण झटपट बदल ते ही आयुष्यभर लक्षात राहतील असे फक्त सिनेमात होऊ शकते. म्हणतात ना जी वस्तू झटकन वर जाते ती झटकन खालीही येते.
कोणत्या तरी गोष्टीने तात्पुरते हुरळून हा लेख लिहिल्यासारखं वाटतंय. खूपदा मागे वळून पाहिलं की अशा घटना लक्षात सुद्धा रहात नाहीत.
आणि तुला काय म्हणायचं आहे ते मला कळलं नसेल तर लेखात अजून काही महत्वाचे उल्लेख राहून गेलेत मग.
जितकं लिहिलंय त्यातून इतकंच पोहोचतंय. Sad

दक्षिणाताई,
>>> कोणत्या तरी गोष्टीने तात्पुरते हुरळून हा लेख लिहिल्यासारखं वाटतंय.<<<
असं नक्कीच लिहीलेलं नाही.. लेख इमोशनल मुड मध्ये लिहीला गेलाय मान्य. स्वानुभव आहे. जमल्यास संबंधित व्यक्तिरेखा add करून पुन्हा लिहील.. मग अधिक स्पष्ट होईल..
'जे सांगायचंय ते पोहोचले नाही' म्हणजे सदोष लेखन आहे.. हे feedback माझ्यासाठी महत्वाचं आहे..प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Happy

धन्यवाद सचिनजी! Happy
दक्षिणाताई, तळटिप टाकली.. मला वाटतं आता अधिक स्पष्ट होईल.