माझे नवीन गाणे

Submitted by prashant_the_one on 25 January, 2018 - 10:51

काही महिन्यापूर्वी मी माझे नवीन गाणे प्रसिद्ध केले. ऐकून प्रितिसाद द्या.

कवयित्री - जयश्री अंबासकर
गायिका - प्रज्ञा जाधव
संगीत आणि संयोजन - प्रशांत गिजरे
ध्वनी मिश्रण आणि संपादन - साकेत

गाण्याबद्दल थोडेसे - संपूर्ण गाणे इलेक्ट्रॉनिक वाद्ध्यांचा आधार घेऊन सुरुवात ते शेवट मी स्वत: बनवले आहे. गाण्याच्या रचनेचा संपूर्ण अभ्यास करता यावा आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती करून घ्यावी हा सुद्धा गाणे बनवण्यामागचा एक उद्देश होता. गाण्याचे ध्वनिमुद्रण सुद्धा माझ्या घरातल्याच स्टुडिओ मध्ये केले आहे. साकेत गुणे या वॉशिंग्टन डी सी मधल्या माझ्या भाच्यांनी त्याचे पोस्ट-प्रॉडक्शन केले. हे लिहिण्यामागचा उद्देश असा की कुणी असा प्रयत्न करत असेल, शिकत असेल तर काही लागलेली मदत जरूर करू शकतो.

https://soundcloud.com/prashantgijare/ka-udaas-watate
किंवा
https://clyp.it/3wst0rss

तसेच आपल्यापैकी कुणी चाल लावण्यायोग्य गाणी लिहिली असतील तर जरूर लिंक पाठवा.

धन्यवाद,

प्रशांत

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम झालंय गाणं. संगीत आणि गायिकेचा आवाज दोन्ही आवडलं. गाण्याचे लिरिक्स सुंदर आहेत. पुढील गाण्यासाठी शुभेच्छा Happy

ऐकलं आता.
का उदास वाटते, छान जमून आलेय. एखाद्या मालिकेचं शीर्षकगीत वाटतं.

दुसरी चांदरात पण आवडली. दोन्ही ट्रॅक स्लो आहेत . यात व्हायोलीनचे पीसेस साथीला घेतल्याने फिल्मसंगीत वाटतंय.

गाणे ऐकले व आवडले. गायिकेचा आवाज व तयारी उत्तम आहे. थोडे हातचे राखुन गातेय असे ऐकताना वाटले. खुलुन गायले असते तर अजुन छान वाटले असते.