दिलीप कुमार हे नाव जगाला माहित झालं, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे...पण हे नाव त्यांना दिलं बॉम्बे टॉकीज या कंपनीच्या भागीदार असलेल्या देविका राणी यांनी. या त्याच देविका राणी, ज्यांनी ' त्या ' काळात हिमांशू रॉय ( जे पुढे तिचे खरे पतीसुद्धा झाले ) यांच्याबरोबर दीर्घ चुंबनदृश्य देऊन खळबळ माजवलेली होती. त्यांनी मोहम्मद युसूफ खान याला ३६ रुपये महिना अशा भक्कम पगारावर नोकरीवर रुजू केलं. ( त्या काळी नटांना पगारी नोकरीवर ठेवलं जाई आणि त्यांना महिना ५ ते २५ रुपये असा पगार त्यांच्या कुवतीनुसार मिळे...त्या मानाने ३६ रुपये मोठी रक्कम होती.
दिलीपकुमार यांनी पुनरागम केलं ते मनोज कुमार या त्यांच्याच ' कार्बन कॉपी ' च्या ' क्रांती ' द्वारे. एव्हाना क्षितिजावर राजेश खन्ना नामक चॉकलेट हिरो अवतरला होता आणि त्याने आसमंत व्यापून टाकलेला होता. त्याच्याच आजूबाजूला होते शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र असे तगडे ' हिरो '. नाही म्हणायला संजीव कुमार होता, जो अभिनयाच्या बाबतीत दिलीप कुमारांचा वारसा चालवण्याच्या तोडीचा होता. अमिताभ अजून 'बच्चन' व्हायचा होता आणि ' सेकंड लीड ' म्हणून शशी कपूरसारखे देखणे नट आपली जागा निर्माण करत होते. क्रांती आला १९८१ साली....त्याआधीचा १९७६ सालचा ' बैराग ' अभिनयाच्या बाबतीत चांगला असला तरी आपटलेला होता.
दिलीप कुमारच्या अभिनयाच्या कारकिर्दीतला असाच एक महत्वाचा चित्रपट म्हणजे अंदाज. यात प्रेमाचा त्रिकोण असल्यामुळे दिलीपसमोर उभा होता चित्रपटसृष्टीचा भावी शोमन राज कपूर. मेहबूब खान यांच्या दिग्दर्शनात घडलेली ही अप्रतिम कलाकृती दिलीप कुमार यांच्या संयत आणि तरीही प्रचंड प्रभावी ठरणाऱ्या अभिनयाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. दिलीप कुमार जेव्हा जेव्हा राज कपूर यांच्याबरोबर एकाच प्रसंगात उभे राहिले, तेव्हा तेव्हा तो प्रसंग त्यांनी व्यापून टाकला.
मधुमती खरं तर दिग्दर्शकाचा सिनेमा. कथानक अगदी साधं - लाकूड इस्टेटीचा श्रीमंत पण स्त्रीलंपट मालक उग्रनारायण गावातल्या एका सुंदर मुलीला - मधुमतीला हवेलीत बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करतो, तिच्या प्रेमात असलेला आनंद वेडापिसा होऊन हवेलीत जातो, त्याला अर्धमेला करून उग्र आणि त्याचे साथीदार दरीत फेकून देतात, त्याचा जीव वाचतो आणि त्याची गाठ मधुमतीसारखी दिसत असलेल्या माधवीशी पडते. ते दोघे मधुमतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी उग्रनारायणच्या विरोधात एक ' प्लॅन ' आखतात पण शेवटी मधुमतीचं भूत येऊन उग्राचा सूड घेऊन जातं.
" बाबा, हा माणूस तुम्हाला हिरो म्हणून आवडतो? याच्यात आहे तरी काय इतकं? "
" अरे, तुम्ही आजकालची पोरं ' बच्चन वाली '...आणि आता तो नवा शाहरुख का काय तो आलाय तो तुमचा हीरो...पण आम्ही दिलीप कुमारचे ( च ) फॅन राहू, तुम्ही कितीही हसलात तरी "
डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ग्रहण ही वेबमालिका प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झालेली आहे.
जरी ही मालिका एका कादंबरीवर आधारीत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही १९८४ साली झालेल्या शीख विरोधी दंग्यांची पार्श्वभूमी या मालिकेला आहे. १९८४ मधे दिल्ली, कानपूर आणि बोकारो इथे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत लहान मुले, बायका, वृद् आणि तरूण पुरूष या सर्वांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
हरीवू
when the child is born, a father is also born
२०१४ सालचा कन्नड भाषेतील दिग्दर्शक मन्सूर यांचा भावनाप्रधान चित्रपट “हरीवू” ( प्रवाह ) ६२ व्या “ national award festival मध्ये या चित्रपटास “बेस्ट कन्नड फिल्म्स” , कर्नाटक राज्याचे “best movie” अशी अभिमानस्पद पारितोषके मिळाली होती . विशेष म्हणजे हा चित्रपट बेंगलोर मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. डॉक्टर आशा बेनकापुरे यांनी लिहिलेला एक न्यूज कॉलम व दिग्दर्शकाच्या आयुष्यातील काही घटना यांच्या आधारे दिग्दर्शक मन्सूर यांनी स्वत: हि कथा लिहिली आहे.
अमित मसूरकरचा मी पाहिलेला हा दूसरा चित्रपट. त्याच्या “न्यूटन” या सिनेमापासूनच या दिग्दर्शकाविषयी एक विशेष जिज्ञासा जागृत झाली होती. सिनेमा सुखान्त बिंदूवर संपावा अशी सामान्य सिनेमा-रसिकाची साधीशी इच्छा असते. दु:खान्त बिंदूवर सिनेमा संपणार असेल तर किमान तो शेवट भव्यदिव्य असावा असेही सामान्य सिनेमा-रसिकाला वाटत असते. अमित मसूरकरचा न्यूटन कोणताही नाट्यमय प्रसंग न घडता अगदी साध्यासुध्या प्रकारे संपतो. तोच प्रकार “शेरनी” या सिनेमात वापरला आहे. एक शेरनी (वाघीण) मरते, तर दुसरी (नायिका) हरते, आणि सिनेमा संपतो.
(हा चित्रपट पहिल्यांदा टीव्हीवर बघितला, तेव्हा वाक्यावाक्यांना धक्के बसले तरी विषय चांगला वाटला आणि प्रमुख कलाकारांचा अभिनय चांगला वाटला त्यामुळे शेवटपर्यंत बघितला. गेल्या आठवड्यात परत लागणार होता, तेव्हा फारएण्ड, मी_अनु, श्रद्धा, पायस वगैरे मायबोलीवरच्या महारथींचं स्मरण करून खास वेगळ्या प्रकारचं मनोरंजन करून घेण्यासाठी परत बघितला. त्यातून झालेली ही फलनिष्पत्ती!)