मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
Movie Review
गुदगुदुल्यांचा शोध पूर्ण (Movie Review - Finding Fanny)
'बीइंग सायरस', 'कॉकटेल' सारखे सिनेमे देणाऱ्या होमी अदजानियाचा आहे, त्यामुळे 'फाईण्डिंग फॅनी' बघणारच, असं काही दिवसांपूर्वीच ठरवलं होतं.
नो गोल्ड फॉर 'मेरी कोम' (Mary Kom - Movie Review)
'चक दे इंडिया' मध्ये एक दृश्य आहे. मिझोरमहून दिल्लीला भारतीय महिला हॉकी संघाच्या निवड चाचणीसाठी दोन हॉकीपटू येतात. आधी रस्त्यावरची मुलं, त्यांना चीनी समजून छेड काढतात आणि नंतर असोसिएशनचा अधिकारी त्यांना 'पाहुण्या' म्हणतो. ईशान्येकडील राज्यांतल्या भारतीयांची मूळ व्यथा हीच आहे. भारताच्या इतर प्रांतातील लोक त्यांना स्वत:सारखे मानत नाहीत आणि नकाश्यानुसार तर ते भारतात आहेतच ! एक प्रकारचा आयडेन्टीटी क्रायसिस. ह्याच्या जोडीला भौगोलिक मर्यादा आणि सततचे राजकीय व सामाजिक अस्थैर्य, असुरक्षितता. नुकतीच सुटका होऊन पुन्हा अटक झालेल्या इरोम शर्मिलांना पहा.
नॉक आउट पंच - मर्दानी (Movie Review - Mardaani)
खरं तर ही कहाणी आजपर्यंत अनेक सिनेमांत मूळ कथानक किंवा उपकथानक म्हणून येऊन गेली आहे. टीव्हीवर, गुन्हेगारी सत्यघटनांवरील डॉक्युमेंटरी सिरियल्समध्येही अश्या प्रकरणांना पाहून झाले आहे. पण तरी डोळ्यांचं पातं लवू न देता पाहावंसं वाटतं, इथेच 'मर्दानी' जिंकतो.
सेन्सॉर सर्टिफिकेट दाखवणाऱ्या फ्रेमपासून, ते अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत 'मर्दानी'त लेखक-दिग्दर्शकाने एक सूत्र १००% पाळलं आहे. 'नो नॉनसेन्स'. अनावश्यक दृश्यं, संवाद, गाणी, पात्रं, कॅमेरावर्क काही म्हणता काही नाही. फक्त तेच जे कथानकाला पुढे नेणार आहे, हातभार लावणार आहे. म्हणून साहजिकच चित्रपट दोन तासांपेक्षाही कमी लांबीचा आहे.
येडे गुंडे (Movie Review - Gunday)
काळा. काळ्या रंगाचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. त्याच्यासोबत इतर कुठलाही रंग शोभतो, उठून दिसतो. 'मॅच' होतो. काळा रंग पार्श्वभूमीवर असला तर लहानात लहान नक्षी, वस्तूसुद्धा स्पष्ट होते. थोडक्यात काहीही 'खपवायचं' असेल, तर काळा जवळ करावा ! पांढरा रंगही असाच सर्वसमावेशक आणि वैश्विक. पण त्याचा शुभ्रपणा टिकवण्यासाठी प्रचंड काळजी घ्यावी लागते, तितकी काळ्याचा गडदपणा टिकवण्यासाठी घ्यावी लागत नाही. इतकं लक्षात आलं की बास्स ! एक १००% यशस्वी कथानक गुंफता येतं. एक रंग मनाचा - काळा - भरला की बाकी रंग अगदी तैयार उपलब्ध आहेतच ! थोडा दोस्तीचा पिवळा, थोडा प्रेमाचा गुलाबी, थोडा कायद्याचा पांढरा आणि रक्ताचा लाल.
'वेक अप सिड' - मला जाणवलेला - (Wake Up Sid - Movie Review)
काही वेळेस बोलायला खूप काही असतं. कदाचित, भेटणारी व्यक्ती बऱ्याच काळानंतर भेटलेली असते किंवा अचानक बरंच काही घडलेलंही असतं. अश्या संवादात वेळ चटकन निघून न गेल्यासच नवल. बरेचदा जर बोलण्यासारखं खूप काही असेल, तर अक्षरश: कुणीही बोलायला चालून जातं ! पण खरी दोस्ती तेव्हा कळते, जेव्हा बोलायला खूप कमी असतं किंवा नसतंही, तरी वेळ चटकन निघून जातो. न बोलताही, बरंच काही बोललं जातं. 'क्वालिटी टाईम' ह्यालाच म्हणत असावेत.
भविष्यातला देसी सुपरहिरो (Krrish 3 - Movie Review)
मागे एकदा माझा एक मुंबईकर मित्र औरंगाबादला आला होता. ऐन उन्हाळ्यात. म्हणजे नेमके उन्हाळ्याचेच दिवस होते का ते आठवत नाही, पण हवा मात्र होती. त्याच्या येण्याच्या २ दिवस आधी ४३ अंशाच्या आसपास तापमान होतं. त्याने मला विचारलं, 'कसं करावं ?' मीही त्याला म्हटलं की, 'बघ बाबा ! आपण मुंबईकर ह्युमिडिटी सहन करू शकतो, पण हा कोरडा उन्हाळा म्हणजे बिनपाण्याची हजामत केल्यासारखा बिनघामाचं 'डिहायड्रेशन' करवतो. अगदीच आवश्यक असेल तर ये, नाही तर टाळ !' पण त्याचं काम अत्यावश्यक होतं. तो आला. आणि गंमत अशी की पाऊस पडला ! अन् तापमान बऱ्यापैकी सुसह्य झालं !
वेगवान चेन्नई एक्स्प्रेस (Movie Review - Chennai Express)
झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
फसलेल्या 'कास्टिंग'ची पिचकवणी 'दुनियादारी' (Duniyadari - Marathi Movie Review)
कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.
'घनचक्कर' - A perfect Stress buster (Ghanchakkar - Movie Review)
सोमवार ते शुक्रवार (शनिवार), सकाळ ते संध्याकाळ (रात्र) तेच ते रूटीन असतं. अमुक वाजता उठा, तमुक वाजता ऑफिससाठी निघा, पोहोचा, मग पुन्हा अमुक वाजता निघा, तमुक वाजता घरी या आणि सकाळी पुन्हा अमुक वाजता उठायचं असतं म्हणून ढमुक वाजता डोळ्यांवर झोप ओढून घ्या. काही जण, किंबहुना बहुतेक जण ह्या त्याच त्या दिनक्रमाला जरा कंटाळतात आणि मग त्यातील काही चित्रपटप्रेमी सुटीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत किंवा एकट्यानेही 'स्ट्रेसबस्टर' साठी एखादा चित्रपट पाहातात. ह्या 'स्ट्रेसबस्टर'ची प्रत्येकाची व्याख्या निराळी.
Pages
