कृपया हा दुवा पहावा: -
http://www.youtube.com/watch?v=Txa_J7lPRhg
कालच मैत्रीणीनं "हे जरुर ऐक" म्हणुन हा दुवा पाठवला होता.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी!
एवढ्या जगात माय मानतो मराठी!
बोलतो मराठी ऐकतो मराठी!
जाणतो मराठी मानतो मराठी!
....
....
संपुर्ण गीत, एखादा 'अभंग' ऐकत असल्यासारखं ऐकलं.... शांतिदायक वाटलं.
मोठमोठ्या गायकांमधेच चिमुरडी "मुग्धा"ही दर्शन देऊन जाते:)
मा.बो.वरही सर्वांनी जरुर ऐकावं वाटलं म्हणुन इथे तो दुवा देत आहे.
प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान वाटावा असंच आहे हे "मराठी अभिमान गीत."
"मराठीच्या" सन्मानासाठी कार्य केलेल्या आणि करत असलेल्या प्रत्येकाला हे गीत अर्पण आहे!
त्या सर्वांना प्रणाम!!!
सर्वात प्रथम, आपल्या "शिवाजी महाराजांना!"
ते नसते, तर भारताचा इतिहास बदलला असता.
महाराजांना कोटी कोटी प्रणाम!!!
टीपः पुढील ओळी, माझं वैयक्तिक मत आहे. आपले मत यापेक्षा वेगळे असल्यास मी त्याचाही आदर करतो.
त्यामुळे आपले मत वेगळे असले तरीही कृपया, ते इथे मांडुन वाद घालु नये.
--------------------------------------------------
मी राजकारणातला माणुस नाही. मला फार समजत नाही त्यातले.
पण आज मराठी माणसाची जी जागृती होते आहे, आत्मसंमान निर्माण होत आहे-वाढत आहे, त्यात आधी बाळासाहेब ठाकरे आणि आज राज ठाकरे यांचाही हातभार आहे असे मला वाटते... (मार्ग???!!!)
--------------------------------------------------
मायमराठीचा विजय असो!
मातृभुमिचा विजय असो!
लिंक उपलब्ध करून दिल्याबद्दल
लिंक उपलब्ध करून दिल्याबद्दल रूयामजी आपले खास अभिनंदन.
येथे संपुर्ण गीत उपलब्ध करून दिलेत तर फारच चांगले होईल.
हे गीत सर्वार्थाने अप्रतिम गीत झालेय.
७.३३ मिनिटांच्या या गीतास ३५६ सुस्वरांनी सामुहिक आवाज दिल्याचे दिसते.
रूयामजी, या गितगायनातील सर्व मुख्य गायकांची नांवे,वादकांची नावे जर यानिमित्ताने
या बाफवर उपलब्ध झालीत तर फारच चांगले होईल.
प्रतिसाद देणार्यांनीही त्यांच्याकडे याविषयी कोणतीही माहीती असेल तर शक्यतो
विस्तृतपणे नोंदवावी. अशी विनंती.
ख्यातनाम गझलकार सुरेश भटांनी
ख्यातनाम गझलकार सुरेश भटांनी हे गीत लिहिलंय.
गाण्याची माहिती कळवल्याबद्दल धन्यवाद, रुयामा. मात्र वरच्या मसुद्यात फक्त एक दुरुस्ती सुचवावीशी वाटते : 'आत्मसंमान' हिंदीत, हिंदुस्तानीत; आपल्याकडे 'आत्मसन्मान' असतो.
कौशल इनामदारने संगीतबद्ध केलय
कौशल इनामदारने संगीतबद्ध केलय ना? गीत अप्रतिम आहे व सुरेश भटांच्या आवाजात पण ऐकलय.
आत्ता एवढ्या मोठ्या स्तरावर हे गीत सादर केले गेले हे अभिमानास्पद आहे.
या कार्यक्रमासाठी मेहेनत घेतलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन!
कान अगदी तृप्त झाले .मराठी
कान अगदी तृप्त झाले .मराठी भाषेचा अभिमान जागृत होईल असच हे गीत झाल आहे .धन्यवाद .
रुयाम तुझे धन्यवाद. खरंच
रुयाम तुझे धन्यवाद. खरंच संपूर्ण गीत इतकं सुंदर झालंय, कोणाही मराठी माणसाला अभिमान वाटावा असेच. छान वाटलं ऐकून.
मला माझ्या धर्माचा, मी महाराष्ट्रात ज्याचा सह्याद्री पाठिराखा आहे आणि मराठी कुटुंबात जन्माला आले याचा कायमच अभिमान वाटतो.
रुयाम तुला शतशः धन्यवाद ,छाया
रुयाम तुला शतशः धन्यवाद ,छाया ताईंना अनुमोदन
सुरेखच झाले आहे हे गीत.
सुरेखच झाले आहे हे गीत. अभिमान दाटून येतो अगदी मनात. कौशल इनामदार ह्यांना मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.
सुरेश भटांच्या आवाजात हे गीत ऐकताना का कुणास ठाऊक खूप भरुन येते. नेहमीच. यू ट्यूबवर त्याचीही लिंक आहे.
http://www.youtube.com/watch?v=RrX3xy9pkcs