श्वानत्रस्त विरुद्ध श्वानप्रेमी!!!

Submitted by निमिष_सोनार on 7 March, 2010 - 00:12

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस पुणे, मुंबईत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर शहरात सुद्धा असेलच. दिवसा सुद्धा आणि विशेषकरून रात्री अंधार पडल्यावर या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या रात्री च्या मोठमोठ्याने ओरडण्याने झोपमोड सुद्धा होते.

लहान-थोर सगळ्यांनाच या भटक्या कुत्र्यांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने वाहनांचे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याचा संभव असतो. पायी चालणाऱ्या सर्वांनाच कुत्र्यांचा त्रास होतो. कुत्रा चावून लचका तोडून व्यक्तीला मरण ओढावू शकते. कुत्र्यांमुळे इकडे तिकडे घाणीचे साम्राज्य होते.

काही कथित प्राणीप्रेमी संघटना या कुत्रांवर काही बंदोबस्त करायला का नाही म्हणतात हे आकलनापलिकडचे आहे. त्यांना मारणे उचित नसेल तर प्राणीप्रेमी मंडळींनी सरकारी किंवा संघटनेच्या किंवा स्वत:च्या पैशातून त्या कुत्र्यांसाठी एक घर/संग्रहालय बनवून त्यात त्यांना पोसावे आणि २४ तास सोसावे. नसबंदी वगैरे करून त्यांची पैदास नियंत्रीत करण्याचे मागे कुठेतरी वाचले ते प्रत्यक्ष होते की नाही देव जाणे! प्राणीप्रेमी, श्वानप्रेमी मंडळींनी एकदा तरी रात्री गल्लीतून एकटे जावून दाखवावे. म्हणजे या गोष्टींची तीव्रता व त्रास त्यांना समजेल. एकदा तरी त्यांना(सुद्धा) एक तरी कुत्रा कडकडून चावावा, अशी माझासारख्या असंख्य श्वानत्रस्त व्यक्तींची मनापासून इच्छा आहे.

तसेच पाळीव कुत्र्यांना सकाळी फिरायला घेवून येणारी श्वानप्रेमी (कुत्राप्रेमी म्हणू नका बरं! ते चिडतील! ) मंडळी रस्त्यावरच्या इतर जाणाऱ्या येणाऱ्या मंडळीचे बिनधास्त चालणे मुष्कील करून टाकतात. तसेच ही श्वानप्रेमी मंडळी इकडे तिकडे श्वान-विष्टा पसरवून निघून जातात. त्यांना प्रेम असेल कुत्र्यांबाबत, पण ते घरी राहूद्या! इतर सार्वजनीक ठिकाणी ते इतरांना दाखवण्याची आवश्यकता नाही. एवढे बरे की, काही ठीकाणी बागेत श्वान आणण्यास बंदी आहे. नाहीतर सकाळचा व्यायाम, जॉगींग सुद्धा भीत भीत करण्याची पाळी येईल.

याबाबत काय करता येईल?
पालीका/सरकार या प्राणीप्रेमी मंडळींच्या दबावाखाली एवढं का झुकतं?
ह्या श्वानप्रेमी/प्राणीप्रेमी संघटना या कुत्र्यांची जबाबदारी का घेत नाही?
याबाबत कुठे तक्रार करायची?
अनेकदा ओरड होउनही भटक्या कुत्र्यांसंदर्भात पालीका/सरकार ठोस पावले उचलून निर्णय का घेत नाही?

प्रशिक्षीत कुत्रे घराची राखण करतात, पोलीसांत त्याचा उपयोग होतो, ही एक वेगळी गोष्ट झाली, पण म्हणून त्यांना सामान्य माणसांना चावून मारून टाकण्याची परवानगी द्यावी, असे नाही.

गुलमोहर: 

भटक्या कुत्र्यांचा कळवळा असलेल्यांनी प्रत्येकी १००० कुत्र्यांची जबाबदारी घेऊन त्यांचे संगोपन करावे >> प्रचंड अनूमोदन. Happy
एक उपाय आहे.. , भटकी कुत्री पकडून कोरियाला एक्सपोर्ट करा.. Proud

कोरीयाला कुत्रा खात असतील >> अगदी बरोबर रोहिणी. Happy
कोरिया मधे कुत्री अगदी चविने खातात... गूगल मधे "Why Koreans" असे जरी टाइप केले तरी माहिती मिळेल.

त्यामुळे पुण्यात आजही तिकडचे विद्यार्थी ठेवायचे म्हटले तरी मालक नाखूश असतात.

काही नाखूष असत नाहीत . गुन्तवणूक म्हणून प्लॅट घ्यायचा स्वतः दुसरीकडे कुठेतरी रहायचे. आणि परप्रांतीय विद्यार्थी ठेवायचे. त्यांचेकडून सज्जड भाडे घ्यायचे.हे पुण्याच्या घरमालकांचे धन्दे आहेत. सोसायटीतल्या लोकाना या पोरांचा कितीही त्रास झाला तरी या मालकाना त्याचे सोयर्सुतक नसते.ते आरामात भाडे खात तिसरीकडेच रहात असतात.मी ज्या सोसायटीत रहात होतो तिथे निग्रो पोरे दारू पिऊन जिन्याच्या पायर्‍यांवर पडून रहात. त्याना ओलांडून बायकाना जावे लागे. भरपूर भाडे देत असतील तर मालकाना पाकीस्तानी भाडेकरूही चालतील. सोसायट्याना कोण विचारतो?

रॉबिन,
खरं आहे तुमचं. पैसे मिळवण्यासाठी आपले लोक विवेक आणि सभ्यता गुंडाळून ठेवतात. मीपण अशी उदाहरणे ऐकली आहेत. Sad

कुठी आहात हैद्राबाद नवाब, बंजारा हिल्साधिपती मामी सरकार ???
तुमच्या नाका खाली हे काय चालले आहे?

आमच्या आईच्या सोसायटीत एक बिनडोक शाळामास्तरणीला माझ्या बहिणीच्या ट्यूशन्सचा प्रचंड व्हायचा. असूया दुसरं काय. सोसायटीत सगळ्या साऊथ इंडियन्सची एकी. त्यामुळे तिच्याबरोबर त्यांच्याही पोटात दुखायला लागलं. का तर म्हणे मुलांचा त्रास होतो. नंतर तिने असंच भटक्या कुत्र्यांना पाळायला (???) सुरुवात केली. पाळायला म्हणजे काय त्यांची व्यवस्था सोसायटीच्या आवारातच. पण त्यांना खायला द्यायचं. त्यांना मांडीवर बसवून त्यांच्याशी गप्पा काय मारते नि काय काय. पण ह्या सगळ्या प्रकारांचा कोणालाच त्रास होत नाही.

नीरजा कुत्रांचाच बीबी आहे.त्याकडे काय कधीही येता येईल्.पण मालकांवर 'भुंकायची संधी आलीय तर कशाला सोडा? काय ? Proud

शुभं बीबी भटक्या कुत्र्यांचा आहे. मामींकडे पाळीव आहे. त्यांचा दुसर्‍याला त्रास नाही. त्याना इंजेक्षने दिली जातात. (असे मामी म्हणतील.)