"आपली बोली आपला बाणा" म्हणत आपण सारे "मायबोलीवर" आलो आहे.
आपण सारेजण केवळ "मराठी भाषा" या एका धाग्याने बांधले गेलो आहोत.
स्वतःचे लिखाण अथवा दुसर्याचे असो, आतुरतेने ते वाचुन त्याचा आनंद घेण्यासाठी आपण येथे येतो.
आत्ताच विकीपीडीयावर "हेलन केलर" यांच्याबद्दल आर्टिकल बघायला मिळाले.
इंग्रजीमधे होते, पण शेजारी "मराठी" अशी लिंक दिसल्यावर अर्थातच तिकडेच लक्ष गेले.
पण तिथे गेल्यावर निराशाच झाली. तिथे काहीही लिहीलेले नव्हते.
"हेलन ऍडम्स केलर (जून २७,१८८० - जून १,१९६८) या अमेरिकन लेखक, सुधारक व प्राध्यापक होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणार्या त्या पहिल्या मूकबधीर व्यक्ति होत्या."
इतकंच... हे बघा:-
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4...
ते पाहुन मला इतकेच वाटले, की सध्या आपल्यापैकी बर्याच जणांना इंटरनेट मुबलक प्रमाणात वापरायला मिळते. विकीपीडीया सारख्या "विनामुल्य" वापरु शकणार्या ऑनलाईन ज्ञानकोषावर मराठी भाषेत माहिती उपलब्ध होऊ लागली तर ज्ञानाचा एक मोठा खजिना मराठी भाषिकांना उपलब्ध होईल.
आज, या ठिकाणी मराठी बोलणार्या प्रत्येकाला मी संबोधत आहे.
खरंच, "आपण मराठी भाषेसाठी काय करु शकतो??"
"हे काय नवीन?? उठा आणि विकीपीडीया मधे लिहा?? " असे वाटले असेल काही लोकांना..
पण रिकाम्या वेळात आपण जसे आपल्या आवडीच्या विषयावर काही लिहीतो, तसेच हेही असेल.
आणि त्यामुळे मराठी ज्ञानकोषात भरही पडेल. तुमच्या आवडीचा विषय इतर लोकही तुमच्यामुळे मराठीमधे वाचु शकतील.
सदर कल्पना, ही जगातील विविध विषयांवरील ज्ञान, माहिती आपल्या मराठी भाषेतही "विनामुल्य" उपलब्ध व्हावी अशा हेतुने मांडत आहे.
बघा विचार करुन! काय वाटते तुम्हाला??
आपल्या मराठी भाषेसाठी आपण हे करु शकतो का??
"माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके ॥'
-------------------------------------------------------------------------------------------------------------
विकीपीडीया म्हणजे काय??
इथे पहा: -
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%...
ता.क. पटलं तर बघा, नाहीतर सोडुन द्या राव...
पटलं तर बघा, नाहीतर सोडुन
पटलं तर बघा, नाहीतर सोडुन द्या राव..
सोडुन कसं द्या राव ?.. हे तर तुम्ही महत्वाचं बोलता आहात.
मयुर, छान विषयाला हात घातला
मयुर,
छान विषयाला हात घातला आहेस. जाम पटलय!
मयुर, छान विषय! छान मुद्दा
मयुर, छान विषय! छान मुद्दा आहे!
छान कल्पना.
छान कल्पना.
छान आहे आयडिया.... आवडली.....
छान आहे आयडिया.... आवडली.....
कल्पु, नानबा, सुनिधी,
कल्पु, नानबा, सुनिधी, sakshi9)
सर्वांचा आभारी आहे यात सहभागी होण्यासाठी उत्साह दाखवल्याबद्दल!
मुटे साहेब,
>>पटलं तर बघा, नाहीतर सोडुन द्या राव..
हे महत्त्वाचे आहे खरे, पण महत्त्वाची गोष्ट पटली तर अर्थ आहे. जर एखाद्याला महत्त्वच पटले नाही आपल्या भाषेचे, या मुद्याचे, तर त्याने ती गोष्ट सोडुन दिलेलीच बरी असे वाटले म्हणुन लिहीले इतकेच
पण आभारी आहे तुमचाही सहभागी होत असल्याबद्दल!
ही आयडीया अगदी भन्नाट आहे.
ही आयडीया अगदी भन्नाट आहे. आता सुरू करायलाच हवे... मराठीसाठी दिवसातुन थोडा वेळ काढू शकतो ना आपण???
कल्पना अगदीच स्तुत्य आहे,
कल्पना अगदीच स्तुत्य आहे, शुभेच्छा.
अगदी स्तुत्य कल्पना.
अगदी स्तुत्य कल्पना.
मयुर, अगदी स्तुत्य उपक्रम!
मयुर, अगदी स्तुत्य उपक्रम!
पण तिथे कसं, काय लिहायचे ह्याचे पण जरा विस्तृत वर्णन दिलेस तर जरा सुरुवात करायला आत्मविश्वास येईल रे!
मध्यंतरी मी नारायण धारपांवर
मध्यंतरी मी नारायण धारपांवर विकी मध्ये बर्यापैकी टाकलेलं (आधी एकच ओळ होती)
(पण मराठीत नाही) तसं आपले इतर लेखक, चांगली पुस्तकं (जुनी, नवी), आपल्यातले छोटे-मोठे समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक ह्या सगळ्यांवर लिहिलं पाहिजे!
साधना, उदय, अक्षरी,
साधना, उदय, अक्षरी, अश्विनी)
आभारी आहे. सर्वांनी प्रयत्न आणि सहकार्य केले की झालंच!
"सेतु बांधायला खारीचा वाटाही असतोच!"
नानबा. )
बरोब्बर! पुढचा विचार तोच लिहीणार होतो. पुढच्या आठवड्यात
खरचं केलं पाहिजे असं...खरच
खरचं केलं पाहिजे असं...खरच मस्त आहे उपक्रम!!
धन्यवाद प्रिती. सर्वजण
धन्यवाद प्रिती. सर्वजण प्रयत्न करुया.
मित्रांनो, हे पहा.
आपले दादासाहेब फाळके. इंटरनेटवर यांच्याबद्दल विनामुल्य माहिती मिळायचे ठिकाण, विकीपीडीया.
तिथे किती माहिती उपलब्ध आहे?? आपल्या मराठीपेक्षा, इंग्रजीमधे जास्त माहिती उपलब्ध आहे इथे!
काही करु शकतो का आपण??
http://en.wikipedia.org/wiki/Dadasaheb_Phalke
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%...
आ.वि.
रु.या.म.
ह्म्म्म रूयामराव, अरे फार
ह्म्म्म रूयामराव, अरे फार पुर्वीपासुन माझा हा विचार होता / आहे.
पण अजुन तरी काही जमल नाही गड्या ...
वेळ अजिबात होत नाही अस नाही, पण नक्की काय लिहाव हे सुचत नाही.
तसेच लिहिण्यासाठी जरा पुर्वतयारी पण आवश्यक आहे.
रुयाम.... कल्पना आवडली व
रुयाम.... कल्पना आवडली व सहभागी व्हायला नक्की आवडेल!
नमस्कार मंडळी! मराठी
नमस्कार मंडळी!
मराठी विकिपीडियासाठी मी गेली काही वर्षे स्वयंसेवा करीत आहे. रुयामाने अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातल्यामुळे सर्वांना उपयोगी पडतील, असे दुवे आणि तत्संबंधित थोडी माहिती लिहितो :
विकिपीडिया मुक्त ज्ञानकोश आहे. 'मुक्त' म्हणजे यातील माहिती सर्वांना विनामूल्य, प्रताधिकारमुक्त पद्धतीने उपलब्ध राहील (होय, स्वयंसेवक-लेखक मराठी विकिपीडियावर जो मजकूर लिहितील, तो प्रताधिकारमुक्त असेल; त्यावर लेखकांना कधीही प्रताधिकार सांगता येणार नाही.). ज्ञानकोश असल्यामुळे विकिपीडीयावरील लेख मायबोलीवरील गुलमोहोराप्रमाणे वैयक्तिक किंवा गाजलेल्या साहित्यिकांच्या ललित, कथा, कविता यांच्या संकलनासाठी किंवा प्रतिभाप्रदर्शनासाठी नसून शुद्धलिखित, प्रमाण मराठीत एखाद्या विषयाची विश्वासार्ह व पूर्वग्रहरहित (= दृष्टिकोन-निरपेक्ष) माहिती मांडण्यासाठी लिहिणे अपेक्षित आहे.
विकिपीडियाबद्दल थोडक्यात परिचय इकडे उपलब्ध आहे : विकिपीडिया:परिचय
विकिपीडियावरील लेख कसे असू नयेत, याबद्दल मार्गदर्शन ('लेख कसे असू नयेत' हे नोंदवून अप्रत्यक्षरित्या लेख कसे असावेत, हे सांगण्याचा मार्ग चोखाळणे, हा गमतीशीर इरसालपणा म्हणता येईल :फिदी:) : लेख कसे असू नयेत
विकिपीडियावर अगोदर अस्तित्वात असलेले लेख कसे संपादावेत व नवे लेख कसे लिहावेत, याबद्दल सहाय्य : विकिपीडिया सहाय्य:संपादन
रुयाम म्हणतो, तसा मराठी विकिपीडिया संख्येच्या व दर्जाच्या दृष्टीने बघता अजून बाल्यावस्थेतच आहे (१ मे, २००३ सालापासून आजवर गेल्या ७ वर्षांत २६,८५४ लेख मराठी विकिपीडियावर लिहिले गेले आहेत. तुलनेत इतर भाषांची कामगिरी :
# भाषा - #भाषिक लोकसंख्येनुसार जगात क्रमांक - #भाषिकांची जगभरातील लोकसंख्या - #विकिपीडियावरील लेख - #विकिपीडीयाचा दर्जात्मक सखोलपणा
---------------------------------------------------------------------
१. मराठी - १७ वी भाषा - ७.१ कोटी - २६,८५४ लेख - सखोलपणा १७
२. इंग्लिश - ३ री भाषा - ३२.८० कोटी - ३१,९७,४०७ लेख - सखोलपणा ४९०
३. मँडरिन चिनी - १ ली भाषा - ८५ कोटी++ - २,९४,८२२ लेख - सखोलपणा ६४
४. फ्रेंच - १४ वी भाषा - ७.७० कोटी - ९,१४,७०३ लेख - सखोलपणा १३२
५. जपानी - ९ वी भाषा - १२.२० कोटी - ६,५४,३३८ लेख - सखोलपणा ४७
६. इटालियन - २० वी भाषा - ६.१७ कोटी - ६,५९,३०४ लेख - सखोलपणा ७२
७. तुर्की - २१ वी भाषा - ५.९० कोटी - १,४१,२९० लेख - सखोलपणा १६४
८. कोरियन - १८ वी भाषा - ६.६३ कोटी - १,२७,८१० लेख - सखोलपणा ४५
९. मलय भाषा (भासा मलेशिया) - २९ वी भाषा - ३.९१ कोटी - ६१,२३५ लेख - सखोलपणा १८
१०. थाई - ४५ वी भाषा - २ कोटी - ५६,८१८ लेख - सखोलपणा १०४
मराठीपेक्षा इटालियन, तुर्की, कोरियन, मलय (मलेशियन) व थाई भाषिकांची जगभरातील लोकसंख्या कमी असूनही त्या भाषांतले विकिपीडिया लेखसंख्या व सखोलपणा या दोन्ही निर्देशांकांमध्ये मराठी विकिपीडियापेक्षा कैक पटींनी पुढारले आहेत. त्यामुळे 'मराठी माणसाच्या अॅटिट्युडाचे काय करावे?' हा प्रश्न पुन्हा उभा राहतो.

)
स्तुत्य उपक्रम ! प्रयत्न
स्तुत्य उपक्रम ! प्रयत्न करायला हरकत नाही .
खरंच... रिकाम्या वेळात इथे
खरंच... रिकाम्या वेळात इथे तिथे इंटरनेटवर फ़ालतू टाईमपास करण्यापेक्षा मराठी विकीमधे भर टाकायची कल्पना चांगली आहे.
मायबोलीवरचे बरेच लोक यामधे मोलाची कामगीरी करू शकतील.
पण नक्की काय लिहाव हे सुचत नाही >>>> सुरूवात म्हणुन, आहेत त्या इंग्रजी माहितीचे मराठीत भाषांतर करून लिहीले तरीही चालेल ना! नविनच काहीतरी लिहीले पाहीजे असे थोडेच आहे ?
प्रकाश काळेल : अनुमोदन!
प्रकाश काळेल : अनुमोदन! मात्र, पूर्णपणे / तंतोतंत भाषांतर करायचीदेखील खरंतर गरज नाही. लेखाच्या विषयासंदर्भात जी काही माहिती आपल्याला पुस्तकांमधून, वृत्तपत्रे/नियतकालिकांमधून अथवा अन्य ज्ञानकोश, विकिपीडियासारख्या कोशप्रकल्पांतून, संदर्भग्रंथांतून मिळेल, ती माहिती वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून मराठीत लिहायची! हे काम फार अवघड अजिबात नाही... दिवसातून एखाद्या विषयावर आपण ५ माहितीपूर्ण वाक्यांची भर घालायचे अगदी सहजसाध्य उद्दिष्ट ठेवले, तर तीदेखील मराठी विकिपीडियासाठी उपयुक्त भर असेल.
आपण ही माहिती इतर
आपण ही माहिती इतर मराठीजनांनाही कळवूयात.
मी युबुंटु लिनक्स चे
मी युबुंटु लिनक्स चे माहितीपुस्तक मराठीच भाषांतरीत करुन , मराठी संगणक वापरणा-यांना मदत करतो
खूपच चांगली कल्पना आहे..पण
खूपच चांगली कल्पना आहे..पण वास्तवात आणण्याकरता नक्की काय लिहाव हे सुचत नाही सुरूवात म्हणुन, आहेत त्या इंग्रजी माहितीचे मराठीत भाषांतर करून लिहीले तरीही चालेल का?
धन्यवाद सर्वांनाच!
धन्यवाद सर्वांनाच!
अभि_नव)
बघीन आता. धन्यवाद !! काम चालु ठेवा
युबुंटू बद्दल मराठी माहिती आहे हे माहिती नव्हतं
संकल्प)
माहितीसाठी अत्यंत आभारी
वर्षु नील,
धन्यवाद!
वरती "संकल्प द्रवीड" यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग होईल बघा.
किंवा, आपल्या आवडीच्या विषयावर शोध घ्यायचा. इंग्रजीमधे. आणि ते सापडले की मराठी मधे त्याबद्दल काय आहे, हे शोधायचे! बहुधा नसते/खुप त्रोटक असते. ते सुधारले की झाले!
(आणि चायनीज येत असेल, तर तुम्ही विशेष करुन चायनीज गोष्टींबद्दल काही थ्रेड्स असतील, ते शोधुन त्याबद्दलही लिहु शकाल कदाचित! तुम्ही फेमस आहात चायनीज आर्टिकल्स बद्दल मा.बो.वर
फुल्ल आवाहन!)
* मीही मधुन मधुन प्रयत्न करत असतो, पण संकल्प टिकत नाही
संकल्प टिकत नाही ? संकल्प
संकल्प टिकत नाही ?
संकल्प तुम्ही शिलालेख लिहा म्हणजे ते टिकतील
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5635319.cms
नमस्कार मित्रांनो. हे नवं!
खरंच चांगला उपक्रम आहे..आता
खरंच चांगला उपक्रम आहे..आता कामाला लागायला हवं
लेख वाचला. आवडला ऋयाम,
लेख वाचला. आवडला
ऋयाम, संकल्प, आपल्यापैकी अजून कोणी सध्या विकीवर अॅक्टिव्ह एडिटर्स आहात काय?
मुंबईत १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान पहिली विकी कॉन्फरन्स झाली त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित होते. त्या निमित्ताने एक सदर करण्यासाठी ही माहिती हवी आहे.
ज्ञानकोश व ज्ञान वितरण हा
ज्ञानकोश व ज्ञान वितरण हा हेतू असेल तर कुठल्याहि भाषेत मूळ लिखाण असेल त्याचे मराठीत भाषांतर करायला हवे. विकी वर असलेले लिखाण कुणिहि भाषांतर करून परत लिहीले तर चालते का? की त्याला परवानगी घ्यावी लागते? कुणिहि उठून काहीहि लिहावे असे असेल, तर ज्यांना ही ज्ञान वितरणाची कळकळ आहे, नि तेहि मराठीतून, त्यांच्यापैकी कुणालाहि हे करता येईल. पैसे न घेता हे काम करण्याची कुणाची तयारी आहे का?
पण त्याच्यासाठी काही पद्धतशीर योजना पाहिजे. अशी योजना आखून, योग्य व्यक्तींची निवड करून, काही ठरलेल्या मार्गाने, ठरलेल्या पद्धतीने काम होईल हे बघणारे प्रोजेक्ट मॅनेजर पाहिजेत.
मागे गूगलवर मराठी साठी ५००० सह्या (त्याला मराठीत 'साइन्स' असे म्हंटले होते) घेतल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले. एव्हढ्या सह्या (साईन्स) पाहून घाबरले का गूगलवाले? त्यांनी मराठी भाषांतर करण्यासाठी लग्गेच कुणाला भरपूर पैसे देऊन काँट्रॅक्ट दिले का?
असेल तर, आता विकिपिडिया वाल्यांकडे अर्ज करा, ६००० सह्या (साइन्स) घ्या, ते करतील. म्हणजे मग मराठीत ज्याला तुम्ही Reinvent the wheel म्हणता तसे करावे लागणार नाही. तुम्हाला स्वतःला काही काम करावे लागणार नाही.