फीडर(मॅन्यूअल)

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 08:46

फीडर(मॅन्यूअल)साठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे येण्यापुर्वी वैयक्तिक स्वच्छतेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

२)स्टोअरमधून डायपरचा एक डब्बा आणून टेबलाच्या बाजुला ठेवा.काम सुरू करण्यापुर्वी आकार शिफ्टलिडरला विचारून घ्या.

३)शिक्का कामगाराने तारिख आणि किंमत शिक्का मारलेल्या पॉलिबॅगचा डब्बा टेबलपाशी ठेवा.

४)पॉलिबॅग बाहेर काढल्यावर उघड्याबाजूने शूटमधे बाळाचे चित्र वर राहील अशा रितीने घाला.

५)शिफ्ट लिडरकडून डायपरची संख्याखात्री करून घेतल्यावर,बेल्टची बाजू मागे राहील अशा रितीने शूटमधून पॉलिबॅगमधे डायपर घाला.

६)पहिला मुद्दयाचे दरवेळी कारखान्यामधे प्रवेश करण्यापुर्वी आणि इतर मुद्दयांचे पुर्ण शिफ्टमधे पालन करा.

गुलमोहर: