लोडर

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 07:48

लोडरसाठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे येण्यापुर्वी वैयक्तिक स्वच्छतेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

२)स्टोअरमधून कार्टनचा एक गट्ठा आणून पॅलेटच्या बाजुला ठेवा.

३)कार्टनवर तारिखेचा शिक्का मारा.(दिवस/महिना/साल)

४)कार्टनपासून डबा बनवा.

५)सिलरने सिल केलेले पॅक , डब्यामधे भरा.पॅक डब्यामधे भरताना बाळाचे चित्र असलेली बाजू वर राहील असे ठेवा.

६)डबा पुर्ण भरल्यावर डबा टेप डिस्पेन्सरचा वापर करून पॅक करा.

७)पॅक झालेला डबा पॅलेटवर उचलून ठेवा.पॅलेट डब्यांनी भरल्यावर पॅलेट ट्रकचा वापर करून फिनिश प्रोडक्ट स्टोअरमधे नेउन ठेवा.

८)पहिला मुद्दयाचे दरवेळी कारखान्यामधे प्रवेश करण्यापुर्वी आणि इतर मुद्दयांचे पुर्ण शिफ्टमधे पालन करा.

गुलमोहर: