इतिहास

हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - १० : अंतिम भाग - नव्या जगाची चाहूल

Submitted by maitreyee on 8 August, 2016 - 00:50

असेही 'लकी' इच्छामरण..

Submitted by समीर गायकवाड on 5 August, 2016 - 08:59

काही लोक जिवंत असताना आपल्या मरणाविषयीच्या इच्छा व्यक्त करतात अन त्यांची मरणाविषयी तितकी उत्कट तीव्रता असेल तर त्यांना तसे मरण येते देखील...आपल्या माजी राष्ट्रपतींनी ए.पी.जे. कलाम दि ग्रेट यांनी इच्छा व्यक्तवली होती की, 'त्यांचे मरण मुलांना शिकवत असताना किंवा त्यांच्यासमोर बोलत असताना यावे..' अन त्यांचे दुःखद निधन तसेच झाले होते.....
'गॉडफादर'च्या लेखन प्रेरणांची माहिती घेत असताना एक अद्भुत माहिती जो मासेरीया याच्या बद्दल मिळाली अन मरणाच्या इच्छा काय काय असतात अन कशा पूर्ण होऊ शकतात याविषयी आणखी एका नावाची भर पडली..

जो मासेरीया हा १९ व्या शतकातला एक माफिया बॉस होता.

आवाज इतिहासातल्या सोनेरी पानांचा

Submitted by vt220 on 2 August, 2016 - 06:40

कलर्स मराठीवर ही मालिका सुरू होऊन आता खरे तर ४-५ आठवडे अधिक होऊन गेलेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ३ अतुल्य व्यक्तिमत्वांचे दर्शन मर्यादित भागांच्या मालिकेत सोमवार, मंगळवार रात्रौ ९:३०-१०:३० दाखवणार आहेत. ज्ञानेश्वरांची कथा आधीच संपलीय. कालपासून (१ ऑगस्ट) महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांची कहाणी सुरू झाली.

हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ९ : महाराजा कामेहामेआ

Submitted by maitreyee on 1 August, 2016 - 23:44

कर्मदरिद्री लोकांचा समृद्ध वारसा ....

Submitted by समीर गायकवाड on 31 July, 2016 - 23:47

चिरे न ढासळलेल्या इथल्या बुरुजावरचा शिवछत्रपतींचा देखणा, भव्य अश्वारूढ पुतळा कुठूनही नजरेत भरावा असाच आहे अन इथे नुसते किल्ल्याचे संवर्धनच झालेय असेही नाही तर इथे आहे अभिनव शिवसृष्टी ! दोन बलदंड बुरुजांच्या मधोमध पश्चिमाभिमुख महादरवाजा. दाराशी दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन घोडेस्वार. माहुतासह एक हत्तीदेखील. दरवाजावर जरीपटका मिरवणारा नगारखाना- ज्यात शिंग, तुतारी आणि नगारा वाजवणारे. भोवती सैनिक-चौकीदारांचा पहारा.. हे कुठल्या ऐतिहासिक कथा-कादंबरी वा मालिकेतले वर्णन नाही तर एका ऐतिहासिक भुईकोटाचे हे वास्तव दर्शन आहे. हे वर्णन आहे माझ्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या किल्ल्याचे, शिवसृष्टीचे !

राष्ट्रपती भवन संग्रहालयाला माझी भेट

Submitted by पराग१२२६३ on 26 July, 2016 - 06:32

सुंदर संकल्पना आणि मांडणी असलेल्या राष्ट्रपती भवन संग्रहालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे २५ जुलै २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. श्री. प्रणब मुखर्जी यांच्या राष्ट्रपतिपदाचा ४ वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने राष्ट्रपती भवन संग्रहालयाचा विस्तारित टप्पा खुला करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी मी माझा वाढदिवस राष्ट्रपती भवनाला भेट देऊन साजरा करायचा निर्णय घेतला होता. मग सगळे नियोजन करून वाढदिवशीच राष्ट्रपती भवन आणि तेथील संग्रहालय आवर्जून पाहिले होते. खास तेवढ्यासाठीच तर दिल्लीला गेलो होतो.

'लौकिक आणि अलौकिक' - डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्याच्या अभिवाचनाचा कार्यक्रम

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago

​लोकसाहित्य व संस्कृती, संतसाहित्य आणि दैवतविज्ञान अशा विषयांमध्ये संशोधन करणारे व्यासंगी अभ्यासक व साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मूलगामी संशोधनाचा आणि लालित्यपूर्ण लेखनाचा आनंद घेण्याच्या हेतूने त्यांच्या जन्मदिनी, गुरुवार, दि. २१ जुलै रोजी अरभाट फिल्म्स्‌ आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे, यांनी ’लौकिक ​आणि​ अलौकिक’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

प्रकार: 

मिनॅक थिएटर, युके - एका स्त्रीच्या संकल्पनेचा अप्रतिम अविष्कार

Submitted by मामी on 15 July, 2016 - 11:29

पाच दिवसांच्या कॉर्नवॉलच्या कंडक्टेड टूरमध्ये आमच्या टूरगाईड स्टीवनं आम्हाला खूप सुरेख सुरेख ठिकाणं दाखवली. त्यातलंच हे एक झळाळतं रत्नं - मिनॅक थिएटर!

लोकेतिहासकार रा. चिं. ढेरे

Submitted by वरदा on 15 July, 2016 - 00:16

आज हा लेख लोकप्रभामध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यातील टंकनाच्या चुका दुरुस्त करून इथे देत आहे. मूळ लेख http://www.loksatta.com/vishesha-news/dr-r-c-dhere-1267274/ इथे वाचता येईल
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गाथा महावीरांची - शिवा काशिद आणि बाजीप्रभू देशपांडे !

Submitted by समीर गायकवाड on 14 July, 2016 - 09:44

अंधारी काळरात्र होती, धो धो पाऊस कोसळत होता.अधून मंधून कडकडाट करत वीजा चमकत होत्या. काळजात धडकी भरेल अशा मेघगर्जना होत होत्या. पावसाच्या धारा वारयावर सैरावैरा हेलकावे खात होत्या. त्या मंतरलेल्या रात्री पावसाने ओलेचिंब झालेले भोई कर्दमलेल्या मुरमाड मातीतून,दगड धोंड्यातून. काटया कुट्यातून मार्ग काढत वेगाने पावले टाकत होते, जणू वसुदेवाने श्रीकृष्णास अलगद टोपलीत घालून न्यावे तसे आपल्या पावलांचा आवाज न करता आपले आजवरची सर्वश्रेष्ठ कामगिरी फत्ते बजावण्यासाठी पायात प्राण आणून ते वायूगतीने मजल दरमजल करत होते.

Pages

Subscribe to RSS - इतिहास