इतिहास

मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ७

Submitted by Theurbannomad on 8 February, 2021 - 05:56

२० मे हा दिवस अर्जेंटिनासाठी अतिशय महत्वाचा होता. देशाचा १५०वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अर्जेन्टिना देश सज्ज झालेला होता. जगभरातल्या अनेक देशांमध्ये निमंत्रणं धाडली गेली होती. या निमंत्रितांपैकी एक होते इस्राएलचे शिक्षणमंत्री अब्बा एबान. इस्राएलच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व त्यांच्या हाती दिलेलं होतं. इस्सर यांनी 'अल एल ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इस्राएलच्या राष्ट्रीय विमान कंपनीतर्फे या शिष्टमंडळाची खातरदारी म्हणून अर्जेन्टिना येथे जाण्यासाठी एक खास विमान दिलं. ब्रिटानिया ' व्हिस्परिंग जाएंट ' या नावाने ओळखलं जाणारं हे विमान.

विषय: 

मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ६

Submitted by Theurbannomad on 8 February, 2021 - 05:55

आहारोनी स्वतः जातीने १९६० च्या फेब्रुवारी महिन्यात ब्युनोस आयर्स येथे उतरले.त्यांनी आपल्या काही जवळच्या विश्वासू सहकाऱ्यांना जमा केलं आणि केले चाकाबुको येथे त्या घराची नव्याने पाहणी करण्याचे आदेश दिले. ते सहकारी आले रिकाम्या हाताने...एव्हाना त्या घरात नूतनीकरणाचं काम सुरु झालेलं होतं. काही गवंडी आणि रंगारी सोडले, तर त्या घरात कोणीच दिसत नव्हतं. आहारोनी यांनी वेगळ्या पद्धतीने पुढचं काम करायचं ठरवलं. त्यांनी एका सहकाऱ्याला महागडं सिगारेट लायटर आणि सुगंधी शुभेच्छापत्र घेऊन त्या घराकडे पाठवलं.

विषय: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ३)

Submitted by मो on 7 February, 2021 - 22:33

मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ४

Submitted by Theurbannomad on 7 February, 2021 - 14:17

हिटलरने आपल्या दहा-बारा वर्षांच्या काळात जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा जो नरसंहार घडवून आणला, ती घटना म्हणजे जगाच्या इतिहासातला एक काळाकुट्ट अध्याय. आर्यन वंशाचा टोकाचा दुराभिमान, ज्यू लोकांविषयीचा पराकोटीचा राग, पहिल्या महायुद्धात जर्मनीला पत्करावा लागलेल्या मानहानीकारक पराभवाला ज्यू लोकांना जबाबदार ठरवण्याचा एकांगी दुराग्रह अशा सगळ्या वेडेपणाच परिपाक म्हणजे ' होलोकॉस्ट ' या नावाने ओळखला गेलेला ज्यू लोकांचा वांशिक संहार. हिटलर आपल्या ज्यू-द्वेष्ट्या धोरणामुळे समस्त ज्यू लोकांसाठी कर्दनकाळ ठरलेला होता.

विषय: 

मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग २

Submitted by Theurbannomad on 7 February, 2021 - 02:52

मोसाद. इस्राएलच्या गुप्तचर खात्याला जग ज्या नावाने ओळखते, ते हे नाव. इस्राएलसाठी हे गुप्तचर खातं म्हणजे आजवरच्या असंख्य मोहिमांना तडीस नेणारं एक गुंतागुंतीचं रसायन. जगभरात कुठेही, कशाही आणि कितीही जोखमीच्या मोहिमा - ज्यात बरेचदा ' कोव्हर्ट ऑपरेशन्स ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय गुप्त मोहिमांचाच भरणा जास्त असतो - बेमालूमपणे पार पाडण्यात मोसादच्या हातखंडा आहे. इस्राएलचे लष्कर आणि राजकारणी हे या देशाचे जगाला दिसू शकणारे दोन डोळे असले, तरी पडद्याआडून काम करणारा हा ' मोसाद ' रुपी तिसरा डोळा उघडला कि भल्या भल्यांना धडकी भरते.

विषय: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग २)

Submitted by मो on 5 February, 2021 - 22:34

Pages

Subscribe to RSS - इतिहास