इतिहास

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - १४

Submitted by Theurbannomad on 31 May, 2021 - 13:59

सौदी अरेबिया हा एक मुलखावेगळा देश. अठराव्या शतकात वाळवंटातल्या नजद भागात जन्मलेल्या मोहम्मद इब्न अब्दुल वहाब या कट्टर विचारांच्या धर्मगुरूने सुन्नी मुस्लिमांच्या हानाबली शाखेत आपली एक पोटशाखा तयार केली...ज्याला वहाबी मुस्लिम शाखा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या परिसरातल्या इब्न सौद टोळीला हा वहाब भेटल्यावर या युतीने अरबस्तानात आपला अंमल बसवायला सुरुवात केली आणि अखेर १९३२ साली याच इब्न सौद कुटुंबाच्या अब्दुल अझीझ इब्न सौद याने ' सौदी अरेबिया ' हा देश जन्माला घातला.

विषय: 

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - १३

Submitted by Theurbannomad on 31 May, 2021 - 12:18

पॅलेस्टिनी लोकांना जिथे जिथे आश्रय दिला गेला तिथे तिथे त्यांनी आपल्या आततायी आणि हिंसक कारवायांनी त्या त्या देशाच्या प्रशासनाला नाकी नऊ आणले. लेबनॉनची तर केवळ दोन दशकांमध्ये रयाच गेली. शेजारच्या सीरियामध्ये गृहयुद्ध सुरु होतंच, आणि तिथले लोक पॅलेस्टिनी बरे वाटावेत इतके भांडखोर...त्यामुळे याही देशात बजबजपुरी माजली. तशात सीरियाने स्वतःला अण्वस्त्रधारी करण्याच्या दृष्टीने अणुप्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी थेट इराण आणि उत्तर कोरिया अशा जगाने बहिष्कृत केलेल्या देशांना हाताशी धरलं. इस्राएलनेही छुप्या मार्गाने आपल्या अण्वस्त्रांच्या निर्मितीचा कार्यक्रम पुढे नेला आणि यशस्वी करून दाखवला.

विषय: 

जेरुसलेम - एक शापित देवभूमी -१२

Submitted by Theurbannomad on 28 May, 2021 - 07:23

यासर अराफत हा माणूस तसा गुंतागुंतीचा. एका बाजूला कॅम्प डेव्हिड करार पूर्णत्वाला नेण्यास अमेरिकेची मदत केल्यामुळे थेट नोबेल शांतता पुरस्कार मिळवणारा यासर अराफत दुसरीकडे विमान अपहरण करून खंडण्या वसूल करण्यातही पटाईत होता. त्याने प्रशिक्षित केलेले पॅलेस्टिनी माथेफिरू तरुण जॉर्डन, लेबनॉन, सीरिया, इजिप्त आणि पॅलेस्टिनी भागात धुमाकूळ घालत असायचे. आंतरराष्ट्रीय मंचावर पॅलेस्टिनी लोकांचा चेहरा आणि आवाज बनलेला अराफत प्रत्यक्षात आपल्या या प्रतिमेचा वापर आपल्या तुंबड्या भरण्यासाठीही करत होता.

विषय: 

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - ११

Submitted by Theurbannomad on 27 May, 2021 - 16:17

इस्राएल देश जन्माला आला तेव्हाची आजूबाजूची परिस्थिती अतिशय स्फोटक होती. वसाहतवादी युरोपीय देश अनिच्छेने काही देशांना स्वातंत्र्य बहाल करून तिथून काढता पाय घेत होते, पण जाता जाता मुद्दाम त्या त्या देशात असे काही उलटे सुलटे तिढे जन्माला घालत होते की तिथे शांततापूर्ण वातावरण तयार होणं दुरापास्त होत होतं. अमेरिकेने तेलाच्या वासाने अरबस्तानात पाऊल टाकलं होतं. अरबी देश अचानक गब्बर व्हायला लागले होते, कारण तेल आता जगभरातल्या प्रत्येक देशाला अनिवार्यपणे लागणार होतं.

विषय: 

शेक्सपिअर आणि संख्याशास्त्र

Submitted by मेघना. on 27 May, 2021 - 08:19

साल १९८४. नोव्हेंबर महिना चालू होता. शेक्सपिअर अभ्यासक डॉक्टर गॅरी टेलर ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या बडलेयन लायब्ररीच्या एका कोपऱ्यात बसून एक कवितासंग्रह चाळत होते. बडलेयन लायब्ररीला हा हस्तलिखित कवितासंग्रह होता १७७५ सालचा. आणि त्यातल्या संग्रहित कविता होत्या त्याहीपूर्वीच्या, सतराव्या शतकातल्या. हे संकलन चाळताना टेलरची नजर एका कवितेवर पडली. ही कविता होती नऊ कडव्यांची. प्रत्येकी आठ ओळी म्हणजेच ७२ ओळींची ही कविता, ज्यात मोजून ४२९ शब्द होते. त्या कवितेच्या काही ओळी अशा..

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग १०

Submitted by Theurbannomad on 26 May, 2021 - 11:52

दुसरं महायुद्ध सुरु झालं ते जर्मनीच्या पुढाकाराने, पण त्याला जबाबदार होते पहिल्या महायुद्धात जेते ठरलेले सगळे देश. त्यांनी जर्मनीवर लादलेल्या अपमानकारक अटी आणि त्यांनी जर्मनीचं केलेलं विभाजन या दोन गोष्टी त्या देशाच्या नागरिकांच्या जिव्हारी लागलेल्या होत्या. हिटलरने जनतेच्या मनातल्या रागाला मोकळी वाट करून दिली आपल्या राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित असलेल्या भाषणांद्वारे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये स्थापन केल्या गेलेल्या ' वायमार रिपब्लिक ' मध्ये - हे सरकार दोस्त राष्ट्रांच्या हातातलं बाहुलं होतं - ज्यू लोकांनी पुष्कळ ढवळाढवळ केली होती.

विषय: 

मुंबईच्या तीन प्रमाणवेळा

Submitted by प्रसाद70 on 26 May, 2021 - 07:03

मुंबईच्या तीन प्रमाणवेळा
© प्रसाद शेज्वलकर

विषय: 

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ९

Submitted by Theurbannomad on 25 May, 2021 - 16:31

साईक्स पिको करार हा ब्रिटिश आणि फ्रेंच यांनी परस्पर आपापसात बसून केलेला उद्योग. या करारामागचा उद्देश होता आचके देणाऱ्या ऑटोमन साम्राज्याचे तुकडे कशा प्रकारे करायचे आणि कोणकोणते भाग कोणाकोणामध्ये वाटून घ्यायचे. १९१६ सालच्या जानेवारीत , अगदी नाताळच्या मेणबत्त्या विझायच्या आत या करारावर सह्या झाल्या. या करारात वास्तविक इटली आणि रशिया हे दोन भिडूसुद्धा सामील होते...पण त्यांना अरबस्तानच्या वाळवंटात विशेष रस नव्हता. रशियाला भूमध्य समुद्रात उतरायचा मार्ग तेव्हढा मोकळा करून हवा होता , जो मिळाल्यावर त्यांनी पुढच्या वाटाघाटींमध्ये विशेष सहभाग नोंदवलाच नाही.

विषय: 

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ८

Submitted by Theurbannomad on 25 May, 2021 - 14:10

एकोणिसाव्या शतकात युरोपीय महासत्तांनी आशिया, आफ्रिका आणि अरबस्तानाची आपापसात वाटणी करून घेतली होती. अरबस्तान आणि लेव्हन्ट भागात तेव्हा अनेक साम्राज्य आपल्या शेवटच्या घटका मोजत होती. ऑटोमन आणि पर्शियन साम्राज्य युरोपीय महासत्तांनी अंकित झालेली होती. युरोपियन महासत्तांनी जागोजागच्या प्रांतात तयार झालेल्या स्वयंभू सुभेदारांना आधी फूस लावली, त्यांना आपापल्या साम्राज्याच्या विरोधात भडकावलं आणि त्यांच्यातल्या साठमाऱ्यांमध्ये आपले हात धुवून घेतले. जिथे कोणी नव्हतं, तिथे त्यांनी आपली प्यादी आणून बसवली. अखेर या विस्तीर्ण भूभागावर युरोपियन साम्राज्यवाद्यांनी आपला अंमल बसवला.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास