इतिहास

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ५)

Submitted by मो on 12 February, 2021 - 16:25

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ४)

Submitted by मो on 10 February, 2021 - 12:29

मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग १५

Submitted by Theurbannomad on 10 February, 2021 - 12:10

२८ सप्टेंबर या दिवशीचा संडे मिरर वानूनूने वाचायला घेतला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या फोटोसकट त्याच्या ऑस्ट्रेलियाच्या वास्तव्याची माहिती, तिथले फोटो, त्याने केलेल्या दाव्यांवर उभी केलेली प्रश्नचिन्ह, त्याच्यावर उघडपणे केलेला ' बोगस माहिती 'चा आरोप अशा अनेक मजकुरांनी भरलेलं वर्तमानपत्राचं मुखपृष्ठ त्याने बघितलं आणि त्याच्या मेंदूला मुंग्या आल्या. संडे टाइम्सच्या लोकांबद्दल त्याच्या डोक्यात चांगलीच तिडीक गेली. आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी काहीही केलं नाही अशी भावना होऊन त्याने संडे टाइम्सच्या एकूण एक लोकांना शिव्यांची लाखोली वाहिली.

विषय: 

मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग १४

Submitted by Theurbannomad on 10 February, 2021 - 12:08

हेरगिरीमध्ये काही सांकेतिक शब्द प्रचलित आहेत. हनी ट्रॅप हा त्यापैकी एक. एखाद्या सावजाला अडकवायचं असेल तर त्याच्या स्खलनशीलतेला लक्ष्य करायचं हा शतकानुशतकं जुना प्रकार म्हणजे हनी ट्रॅप. मोसादच्या लोकांमध्ये मानसोपचार तज्ज्ञसुद्धा आहेत, जे अशा वेळी खूप बारकाईने विचार करून सापळा कसा लावायचा याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांनी हे अचूक हेरलं, की मोर्डेकाय वानूनू हा लहानपणापासून काहीसा अलिप्त राहिलेला एकलकोंडा माणूस आहे...

विषय: 

मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग १३

Submitted by Theurbannomad on 10 February, 2021 - 12:06

इस्राएलच्या वकिलातीने ब्रिटिश वर्तमानपत्राकडून आलेल्या या अहेराच्या पाकिटाचा स्वीकार करायलाच नकार दिला. ' नो कंमेंट्स ' इतकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. अर्थ साधा होता....या सगळ्या प्रकाराचा काय अर्थ लावायचा तो लावा, पण सर्वस्वी तुमच्या जबाबदारीवर तो लावा असा तिढा या प्रतिक्रियेने संडे टाइम्सच्या वाट्याला आला. हे सगळं होत असताना तिथे तेल अवीवस्थित मुख्यालयात पंतप्रधान पेरेझ ब्रिटनमध्ये होत असलेल्या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर ठेवून होते. मोसादप्रमुख अडमोनी यांनी आपली हस्तकांची आणि हेरांची फौज कामाला लावलेली होतीच.

विषय: 

मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग १२

Submitted by Theurbannomad on 10 February, 2021 - 12:05

इस्राएलच्या वकिलातीने ब्रिटिश वर्तमानपत्राकडून आलेल्या या अहेराच्या पाकिटाचा स्वीकार करायलाच नकार दिला. ' नो कंमेंट्स ' इतकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. अर्थ साधा होता....या सगळ्या प्रकाराचा काय अर्थ लावायचा तो लावा, पण सर्वस्वी तुमच्या जबाबदारीवर तो लावा असा तिढा या प्रतिक्रियेने संडे टाइम्सच्या वाट्याला आला. हे सगळं होत असताना तिथे तेल अवीवस्थित मुख्यालयात पंतप्रधान पेरेझ ब्रिटनमध्ये होत असलेल्या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर ठेवून होते. मोसादप्रमुख अडमोनी यांनी आपली हस्तकांची आणि हेरांची फौज कामाला लावलेली होतीच.

विषय: 

मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ११

Submitted by Theurbannomad on 9 February, 2021 - 08:46

ऑस्कर गरेरो हा मूळचा कोलंबिया देशाचा मुक्त पत्रकार, पण आपल्या देशातल्या अनागोंदीला कंटाळून तो ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीला निघून आला आणि ' सिडनी मॉर्निंग हेराल्ड ' या प्रतिष्ठित वर्तमानपत्रासाठी काम करायला लागला. त्याने आपल्या संपादकांना ही सगळी खळबळजनक माहिती सांगितली. ऑस्ट्रेलियामधल्या सध्या टॅक्सीचालकाकडे अशी स्फोटक माहिती असेल, यावर अर्थात संपादक महाशयांचा विश्वास बसणं अशक्य होतं. त्यांची ही चूक त्यांना चांगलीच महागात पडली, कारण ऑस्करने थेट ब्रिटन गाठून तिथल्या ' संडे टाइम्स ' ला ही बातमी पुरवली.

विषय: 

मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ९

Submitted by Theurbannomad on 8 February, 2021 - 11:22

मोर्डेकाय जेव्हा पाचव्या मजल्यावरच्या त्या गुप्त दालनात आला, तेव्हा त्याचे डोळे विस्फारले. त्याच्या शंकेनुसार खरोखर त्याचा देश आण्विक अस्त्रांची निर्मिती करण्यात गुंतलेला होता. त्याच्या अनुभवी डोळ्यांनी त्याउप्परही अनेक गोष्टी ओळखल्या....त्या दालनाचा विस्तार इतका मोठा होता की त्याला हे कळून चुकलं, की इथे फक्त देशाच्या बचावला पुरेशीच नव्हे, तर इतर देशांवर हल्ला करण्यासाठी पुरतील इतक्या ताकदीच्या आणि संख्येच्या अस्त्रांची निर्मिती होत होती.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास