ठाणे अरबस्तानला जोडण्याचा कुटील डाव ?

Submitted by विचारजंत on 28 September, 2025 - 12:33

स्वदेशी चा नारा देणाऱ्या सरकारकडून मराठमोळ्या ठाण्यातील एक नवं सांस्कृतिक केंद्र विवियाना मॉल हा विदेशी शक्तींना , खास करून अरबांना विकला हे ऐकले आणि मन सुन्न झाले, चित्त विचलित झाले, पायाखालची जमीन सरकली.

आज ठाणे विकले गेले
माझी खात्री आहे आज सर्व विवेकवादी , पुरोगामी ठाणेकर रडत असतील

आज मॉल विकला गेलाय उद्या सरकारी ऑफीसेस विकली जातील, मग महापालिका मग विधानसभा, लोकसभा, सेंट्रल व्हिस्टा आणि राष्ट्रपती भवनही विकले जाईल. काय काय बघायला लागणार आहे मोदींच्या राज्यात काय माहित.

ठाणे आता संपले आहे
ते अरब लोकांना विकले आहे
आता ठाण्यात स्त्रीयांना बुरखा घालून फिरावे लागणार .
जिकडे लक्झरी गाड्या होत्या तिकडे आता उंट फिरणार

लक्षात घ्या नेहरूंच्या काळात एकही मॉल विकला गेला नव्हता ...

कोणत्याही सुजाण, पुरोगामी, लोकशाहीप्रेमी पंतप्रधानाने या परिस्थिती मध्ये राजीनामा दिला असता ,अर्थात मोदींकडून ही अपेक्षा नाहीच !

Group content visibility: 
Use group defaults

मागे मायबोली वरच वाचले होते की विवियाना मॉल ओवरहाइपड आहे..
आणि आज ही न्यूज..
कोणावर विश्वास ठेवायचे समजत नाही

अहो, इथे बीसीसीआय यजमान असलेली आशिया कप क्रिकेट स्पर्धा अरबस्थानात भरते. त्या स्पर्धेतून पैसा कमवूनच अरबांनी हा मॉल विकत घेतला असेल.

लक्षात घ्या नेहरूंच्या काळात एकही मॉल विकला गेला नव्हता ...

नेहरूंच्या काळातील मॉल्स ची यादी मिळाली तर तपास करता येईल ,
बाकी चालू द्या

ज्यांना मुंबईचा इतिहास माहीत आहे ........

त्यांना प्रश्न पडणार नाही. वस्तू कोणी विकत घ्यावी किंवा कुणाला विकावी यावर बंधन नाही. उगाच पोटदुखी का करून घेतात?
'६०-'७० मधले संवाद गिरगावातले ...
एक चाळवासी शेजाऱ्यांस "मी माझी खोली विकली ******ला आणि त्या पैशात ठाण्यात स्वतंत्र ब्लॉक घेतला. पण तू विकू नकोस हां."