2023 गृहकर्ज घेणेबाबत

Submitted by aadwika on 14 March, 2023 - 08:10

नमस्कार,
मी आद्विका. माझी लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सध्याच्या परिस्थितीत गृहकर्ज घ्यावे की नाही ह्या बाबत मी संभ्रमात आहे.
हे माझे काही प्रश्न आहेत. कृपया योग्य माहिती द्या.
1) लोनचे व्याजदर अजून किती वाढू शकतात?
2) आता गृहकर्ज घेणे हा चांगला निर्णय आहे का?
3) गृहकर्ज घेताना कोणत्या बाबींचा विचार केला जाऊ शकतो?
4) flaoting आणि fixed व्याजदरांपैकी कोणता पर्याय निवडू शकतो सदयपरिस्थितीनूसार?

धन्यवाद!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1) लोनचे व्याजदर अजून किती वाढू शकतात? >> याच उत्तर तर देशाच्या अर्थ व्यवस्थेशी निगडीत आहे.
2) आता गृहकर्ज घेणे हा चांगला निर्णय आहे का? >> सध्या व्याजदर काहीसा समाधानकारक आहे. बाकी व्यक्तीसापेक्ष निर्णय ..
3) गृहकर्ज घेताना कोणत्या बाबींचा विचार केला जाऊ शकतो? >> तुमचे उतप्न्न आर्‍थिक बाजू, घेणार आहात ती प्रोपर्टी तिची किमत
4) flaoting आणि fixed व्याजदरांपैकी कोणता पर्याय निवडू शकतो सदयपरिस्थितीनूसार? >> सहसा Floating हा पर्याय निवडतात .

सरळ एखादी Nationalized Bank SBI or HDFC गाठा व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल.

व्याजदर वाढले की property चे दर कमी झाले पाहिजेत.
जास्त व्याजावर कर्ज घेवून प्रॉपर्टी खरेदी करणे खूप महागात पडते.
हफ्ते पण जास्त रक्कमेच्या येतात.
परतफेड करताना त्रास दायक.

प्रत्येकाच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!

मी 50% गृहकर्ज घेण्याचे ठरवले आहे पण या मंदीच्या परिस्थितीत गृहकर्ज घेणे योग्य आहे का?
या बाबत आपण कोणत्या घटकांचा विचार केला पाहिजे?
मी आयटी क्षेत्रात काम करते.

>>मी 50% गृहकर्ज घेण्याचे ठरवले आहे पण या मंदीच्या परिस्थितीत गृहकर्ज घेणे योग्य आहे का?>>
रहाण्यासाठी घर घेत आहात असे गृहित धरत आहे. सध्या रहात आहात तिथे देत असलेले भाडे आणि तुमच्यासाठी महत्वाचे असलेले इतर मुद्दे विचारात घेवून स्वतःचे घर हवे हा निर्णय झाला आहे हे देखील गृहित धरत आहे.
मंदीच्या परीस्थितीत गृहकर्ज घेताना -
इमरजन्सी फंड वर्षभराचा आहे का? यात सर्व हफ्ते, टॅक्सेस आणि इतर आवश्यक खर्च कव्हर व्हावेत.
मंदी आहे तर बिल्डरशी जरा घासाघिस करता यावी.
५०% च गृहकर्ज असे का ठरवले आहे? त्यापेक्षा ८०% गृहकर्ज मिळेल ते घेणे आणि नंतर मुद्दलाची लवकर परत केल्यास पेनल्टी नाही असा करार का करत नाही? म्हणजे सेफ्टी नेट जास्त भक्कम असेल. वर्षभर ठरल्याप्रमाणे कर्जाचे हफ्ते भरायचे. वर्षाच्या शेवटी आर्थिक स्थितीचा आढावा घेवून परीस्थिती चांगली असल्यास पुढील वर्षी काही जादाची रक्कम मुद्दलापोटी भरायची. इथे मी वर्ष म्हणत आहे त्यात तुमच्या इथले आर्थिक वर्ष, अप्रेझल-बोनस कधी, बजेट- इकॉनॉमीचे सायकल विचारात घ्या. त्यानुसार तुमचे वर्ष जाने-डिसेंबर असेल, दिवाळी ते दिवाळी असेल किंवा एप्रिल ते मार्च असेही असेल.