..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी स्टॅटिस्टिशियन

हे मोठ्याने वाचून दाखवा.
उदयन, केदार कोडीसुद्धा सगळ्यांनीच द्यायची आहेत.

७/१ ....डोळे उघडे असो या बंद तरी पण मला अक्षय आणि करिष्मा यांचा चित्रपट दिसतो.
अबोल झालेले असतात शब्द माझे तरी
तरी मनातुन प्रश्न उमलतात... Uhoh

पहिलाच प्रयत्न आहे.......सांभाळुन घ्यावे ..........शिकावु कार्ट आहे Happy

७/२
माधवराव स्वभावाने बरेचसे भिडस्त! त्यांची स्वतःबाबत आणि कुटूंबाबात खास तत्व होती ज्यात ते कधीच बदल करत नसत. त्यांच्या मुलीला त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं.
नर्सरी झाली , ज्युनिअर केजी, सिनिअर केजी झाली झाली तरी मुलीची फारशी प्रगती नव्हती.तिच्या वर्गातली बाकीच्या मुलांना मात्र अनेक नव्या नव्या गोष्टी, कविता येत होत्या.
माधवराव काळजीत पडले. मुळापासुन कारण शोधायला सुरुवात केली. शिक्षकांना भेटले तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की सगळ्या मुलांनी शाळेच्या शिक्षकांकडे क्लास लावला होता. आणि त्यामुळे शिक्षक शाळेत काही शिकवतच नव्हते आणि त्यांनीही मुलीला क्लास लावावा अशी मागणी करत होते.
हे माधवरावांच्या तत्वात बसत नसल्याने त्यांनी या गोष्टीला नकार दिला.पण याचं काही तरी करण्याची गरज होती.
त्यांनी ठरवलं मुख्याध्यापकांना भेटायचं पण शिक्षक आणि शिपायी त्यांना मुख्याध्यापकांपर्यंत पोहचू देत नव्हते.
मग त्यांनी ठरवलं आपण बाहेरच्या नाक्यावर च्या टी शॉपवर मुख्याध्यापकांना भेटुयात. तसं मुख्याध्यापकांना कळवलं. माधवरावांनी सलग आठवडाभर त्या नाक्यावर त्यांची वाट पाहिली पण ते काही आलेच नाहीत.
माधवरावांनी आणखी चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मुख्याध्यापक पण या सगळ्यात सामिल आहेत.

त्यांना खुप राग आला. त्यांनी ठरवलं की या वेळेस मिडियाची मदत घ्यायची. आणि भांडं फोडायचं पण त्यासाठी एकदा मुख्याध्यापकांची भेट होणं गरजेचं होतं.
काय करावं ते त्यांना कळेना. नीट बोलवुन ते येणार नव्हते. धमक्या देणं, तेही इतक्या सहज माधवरावांना शक्य नव्हतं. खोलीत येरझार्‍या घालताना शेजारच्या खोलीतल्या एफएम वर लागलेलं एक नविन गाणं त्यांनी ऐकलं आणि मजेत शीळ घालत तेच गाणं मुख्याध्यापकांना चिट्ठीत पाठवलं.
ते गाणं कोणतं असेल ?

(बाळबोध कोड असू शकेल पण सांभाळून घ्या! गडी आत्ताच शिकतोय Wink )

हिम्सकूल, रिया स्वागत. रिया पहिलंच कोडं सॉलिड दिसतंय. जुनं /गोल्डन इरातलं (१९७० पर्यंतचं) गाणं आहे की नंतर कधीचं?

सर्वांचे आणि विशेषतः नवोदितांचे स्वागत. Happy

कृपया उत्तरं देतानाही कोडं क्र. नमुद करा. आणि कोडं सोडवलं गेल्यानंतर कोडं आणि त्याखाली उत्तर असं प्रतिसादात पुन्हा द्या. (आमच्यात तशी पद्धत आहे. Proud )

मी अनेकदा आले पण काही न कळाल्याने परत गेले Proud
आमच्या पिढीतल्यांशी असा सावत्रपणा करता होय तुम्ही जुनी गाणी देऊन? थांबा धागा हाय्जॅकच करते आता Proud

ओळखा ना गाणं!

७/१ ....डोळे उघडे असो या बंद तरी पण मला अक्षय आणि करिष्मा यांचा चित्रपट दिसतो.
अबोल झालेले असतात शब्द माझे तरी
तरी मनातुन प्रश्न उमलतात...

उत्तर ७/१ -

आँखें खुली हो या हो बंद दिदार उनका होता है
कैसे कहू मे यारो ये प्यार कैसे होता है..

मामी योग्य तो बदल करुन नवीन पोस्ट टाकली आहे.. नवीन आहे.. सांभाळून घ्या..

भरत मयेकर, आज सकाळीच रियानं मला रागावून सांगितलं की आपण खूप जुन्या जमान्यातल्या गाण्यांवर आधारित कोडी घालतो आणि मग तिच्यासारख्या बालवाडीतल्या मुलामुलींना ती ओळखता येत नाहीत. म्हणून ती जातीनं इथं नव्या जमान्याची लेटेस्ट गाण्यांवर आधारित कोडी घालायला आली आहे. Happy

अनेकदा आले पण काही न कळाल्याने
परत गेले
आमच्या पिढीतल्यांशी असा सावत्रपणा
करता होय तुम्ही जुनी गाणी देऊन?
थांबा धागा हाय्जॅकच करते आता>>>>> अगदी अनुमोदन
हे मयेकर / मामी वगैरे लोक्स एवढी भारी भारी गाणी टाकायचे की गप्पच बसाव लागायच Wink Lol

रिया. होऊ दे खर्च Proud Lol

बरं. कोडं टाकल्यावर लोकांनी ओळखेपर्यंत गायब आहोत असे दाखवायचे. कोणी ऑलखले नाही तर, चार-पाच तासांनी किंवा चक्क दुसर्‍या दिवशी थोडीशी दया दाखवून भीक देतात तसा एक क्लु द्यायचा. कळ्ळ?

Pages