अंधाराशी कसली मैत्री?

Submitted by Santosh zond on 24 September, 2020 - 09:06

अंधाराशी कसली मैत्री?

माझ्या अवतीभोवती असणाऱ्या असंख्य गोष्टींना कंटाळून कंटाळून आज मी एकटाच रात्रीच्या अंधारात काहीतरी बडबडत बसलो होतो,तेवढ्यात मला कुणाचातरी स्पर्श जाणवलां तो एक अनोळखी वाटसरू होता,मग तो माझ्याशी बोलु लागला,का रे एवढया अंधारमय रात्रीत तु एकटाच कुणाशी बडबडतो आहे मी थोडावेळ त्याच्याकडे बघत शेवटी उत्त्तरलो 'माझ्या मित्रांशी 'तो आश्चर्याने माझ्याकडे बघत म्हणाला पण अरे मला इथं कुणीच दिसतं नाहीये, तु ठीक तर आहेस ना! मी म्हणालो हो काका हो मी ठीक आहे,ही शांत असणारी रात्र,हा घनघोर अंधार,ऐटीत चमकणारे हे चंद्र तारे हे सगळेच माझे प्रिय मित्र आहेत ज्यांच्याजवळ मी माझ्या सर्व गोष्टींना शेअर करत असतो ते गृहस्थ म्हणाले पण अंधाराशी कसली मैत्री?मी-का अंधाराशी मैत्री असु नये का हा अंधार नसुन माझ्या मनाला शांत करणारा,माझ्या अंतरंगात डोकावणारा माझा एक मित्रच आहे की आणी हे चंद्र तारे जरी माझ्यापासून दूर अंतरावर असले तरी माझ्या मनाच्या अगदी खूपच जवळ आहेत माझ्या गोष्टी शांतपणे ऐकणारे,लुकलुकत माझ्या गोष्टींना प्रतीसाद देणारे,माझ्या सोबत हसणारे ,गाणारे,नंतर तो गृहस्थ हसत हसत तिथुन निघुन गेला....

Group content visibility: 
Public - accessible to all site users