गणित

Submitted by सेन्साय on 3 November, 2017 - 01:25

.

.

आपमतलबी बेरजा,
अजाणतेपणी केलेल्या
वजाबाक्या मदतीच्या
अचूक निःशेषाच्या
गुणाकार भागाकार
फक्त हित संबधांचा
आणि परत त्यांच्याही
बेरजा वजाबाक्या
अपूर्णांकात उरणाऱ्या !!

आयुष्याचं गणित कृतघ्न
क्षेत्रफळ इथे शुद्धस्वार्थाचे
पायथागोरसचे प्रमेय उरले
'मी'+'मी'च्याच वर्गाने संपणारे
लांबी रुंदी पैसा श्रीमंतीची
ऊंची येथे खोटया प्रतिष्ठेची
आकडेमोड पाहता संसाराची
घनफळ दिसते निव्वळ मोहाचे
जमलेच तर आसुरी अहंकाराचे !!

पण ...गणित मात्र
तिथेच थांबत नाही
अगदी नेहेमीच
हवे असलेले उत्तर
मिळत नाही, कारण ...
"क्ष"ची किंमतच
मला कधी कळलेली नसते !

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह....
दत्तात्रयजींना अनुमोदन..