रा...ग

Submitted by अंबज्ञ on 14 January, 2018 - 05:54

.

.

आता बस्स ...
खुप ऐकली तुझी बोलणी
हृदय पोखरणारी आणि
मेंदूचीही चाळण करणारी
विसरावं तुला पक्के ठरवलं
नको स्मृतिदंश पुनः कधीही

राग अनावर झाला म्हणून
आठवणी शिफ्ट डिलीट करत
कायमसाठी पुसून टाकल्या
म्हटलं ...
नाही आता
नाव सुध्दा काढायचं कधीही..
अगदी मन घट्ट करून घेतलं..
आणि...

हळूच हसलं कि मन..
वेडावत वाकुल्या दाखवत
कानात कुजबुजलं...
सर्वांदेखत जरा मोठ्यानेच बोललं
अरे वेडया. ..
श्वास घेतलास कि तू आताच !

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

chhan!!!