श्वास...

Submitted by अंबज्ञ on 17 December, 2017 - 08:35

.

.

श्वास श्वासात मिळतो
ओठ एकमेकांत गुंततो
छातीचा भाता फुलतो
सवयीने ....!

श्वास कलियुगी विकतो
पोटाची खळगी भरतो
ओठांचे चंबु पैसा मिळवितो
मजबूरीने .....!

श्वास आशा पालवितो
रंगी बेरंगी फुगे फुगवितो
कुटुंब जगवितो
मेहनतीने ....!

श्वास स्वप्नेही पाहतो
देवाकडे एकचि मागतो
थोडा अधिक श्वास
निष्ठेने ....!

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलिये.आवडली. मला काही लिहायची उर्मी देवुन गेली..

श्वास फुंकर घालतो
जखम बरी करतो
नवी उमेद देतो
माणुसकीने..!

श्वास निःश्वास टाकतो
जिवात जिव आणतो
काम फत्ते करतो
कर्तव्यतत्परतेने...!

सुंदर

श्वास फुंकर घालतो
जखम बरी करतो
नवी उमेद देतो
माणुसकीने..! >>> @ मकरन्द वळे >>> मस्तचं