अखेर ...

Submitted by सेन्साय on 10 November, 2017 - 05:45

.

.

लगबग पाहायला सांज क्षितीजे
आणि उमलत्या कुमुदिनी सवे
तळ्यात डोलणाऱ्या चंद्रराशी
पाऊल पुनः त्या टेकड़ीपाशी

हिंदकाळणाऱ्या त्या पारंब्या
कुंद दरवळतोय केवड़ा अन्
परतीची ती किलबिल वाणी
सादवते आतुरलेली रातराणी

क्षितिज आसमंत कार्योत्सुक
मावळतीचा धुंद समागम
प्रसवता ही नित्य रजनी
लुचते आभाळाला चांदणी

चंद्रसाक्षीने आशा पालवली
पण स्वप्न सांडली उल्कापाती
विसावा अखेर त्या तळ्याकाठी
पाऊल पुनः त्या टेकड़ीपाशी
माझ्याच जिवंत थड़ग्यापाशी ..!

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users