ग्राफिक्स आणि मल्टिमिडीया

वझीर.. खेल खेल मे..!!

Submitted by उदय८२ on 11 January, 2016 - 08:46

खेल खेल मे
खेल खेल के
खेल खेल ये आ जायेगा.

बुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.

शब्दखुणा: 

तडका - आमचे संविधान

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 22:03

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

स्क्रीन रे़कॉर्डर - संगणकाच्या पडद्यावरील कार्याचा व्हिडियो कसा घ्यावा?

Submitted by निनाद on 19 November, 2015 - 20:11

संगणकाच्या पडद्यावरील कार्याचा व्हिडियो घ्यायचा आहे.
पण तो कसा घेतला जातो याची अजिबात कल्पना नाही.
स्क्रीन कास्ट कसा घ्यावा या बाबत काही मार्गदर्शन कराल का?
कोणती प्रणाली चांगली आहे? त्यातही मुक्त आणि मोफत असेल तर उत्तम.
मला CamStudio सापडले पण मग अजून वाचल्यावर कळले की त्यात व्हायरसेस असू शकतात. म्हणून ते सोडले.
Windows Media Encoder वापरून पण असे व्हिडियो घेता येतात का? कारण हे फार जुने आहे. ते नवीन ओएस वर चालेल का असाही प्रश्न आहेच.

तुम्ही रेकॉर्ड करत असाल तर ते कसे करता?

क्रिएटिव आणि कॉर्पोरेट टी शर्ट्स

Submitted by पल्ली on 9 September, 2015 - 09:32

नमस्कार. मी पल्ली. माबोकरीण. माबोचे कॅलीग्राफीचे काही टीशर्टस मी केले आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन मी कॅलिग्राफी आणि कॉर्पोरेट टीशर्ट्स तयार करायला सुरुवात केली आहे. प्रथम गणरायाला वंदन करून श्री गणपती उत्सवासाठी टी शर्टस सादर केले होते. प्रतिसाद खुप छान आला. खुप सार्‍या मायबोलीकरांनी ऑर्डर्स देऊन प्रोत्साहीत केले.
आता नविन डीझाइन्स घेऊन येत आहोत.

बल्क क्वांटीटी साठी डिस्काऊंट Happy अथवा एक किंवा दोनही घेऊ शकता. Happy

पुरुषांसाठी राऊंड नेक व कॉलर चे, स्त्रियांसाठी व्ही नेक विथ फेमिनाईन फिट.

शब्दखुणा: 

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -३

Submitted by पुरंदरे शशांक on 5 September, 2015 - 06:17

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - ३

आता या अ‍ॅपबद्दल अजून अजून कळू लागले आहे. अर्थातच ज्याने कोणी हे बनवले आहे त्याला चित्रकलेची आणि रेषा, विविध आकारांची जी जाण आहे त्याला मानावेच लागेल. या अ‍ॅपमधील ब्रश, पेन्सिल, इरेजर इ. जी साधने दिलेली आहेत ती पहाता या छोट्याशा स्क्रीनवर काय काय गमती जमती करता येतील हे पूर्णपणे आपल्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारेच आहे.

जसजशी आपण ही साधने व विविध रंग वापरत जाऊ तेवढी त्यातील गंमत समजत जाऊन या अ‍ॅपमधे अगदी लहान मुलासारखे रमायला होते...

मला स्वतःला पाने-फुले इ.चे रंग, आकार यांचे आकर्षण असल्याने ते काढायचा प्रयत्न केला आहे.

१]

तडका - सेल्फी,...

Submitted by vishal maske on 4 July, 2015 - 11:08

सेल्फी,...

फॅशन म्हणा,व्यसन म्हणा
सेल्फीचा वापर वाढतो आहे
लहानांपासुन थोरांपर्यंतही
सेल्फी लोकप्रिय होतो आहे

जरी काढलेल्या सेल्फीमुळे
सेल्फी काढणारा खुश असतो
तरीही मात्र प्रत्येक सेल्फी
हा केवळ सेल्फीश असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - छुप्या कँमेर्‍याचे सत्य,.!

Submitted by vishal maske on 5 April, 2015 - 21:26

छूप्या कँमेर्‍याचे सत्य,..!

कुणा-कुणाच्या नैतिकतेत
नको तितकी खोट असते
त्यांच्यामुळेच माणूसकीला
पून्हा-पून्हा गाल-बोट असते

जणू अनैतिकतेच्या परामर्शाने
विचारच त्यांचे नासवलेले असतात
म्हणूनच महा-कोडगांच्या औलादींनी
कुठे छूपे कँमेरे बसवलेले असतात,..

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मराठी माणसांची शान

Submitted by vishal maske on 3 April, 2015 - 11:13

मराठी माणसांची शान,...

महाराष्ट्राची शान मराठी
महाराष्ट्राची जान मराठी
मराठी माणसांची अस्मिता
महाराष्ट्राची त्राण मराठी

जगभरात माय मराठीचा
गौरवणारा झेंडा आहे
मराठी माणसांची शान
मराठीचा अजेंडा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्यक्तीची योग्यता,...

Submitted by vishal maske on 27 March, 2015 - 23:02

व्यक्तीची योग्यता,...

प्रत्येक-प्रत्येक व्यक्तीची
इथे योग्यता पाहिली जाते
योग्य व्यक्तींची अप्रत्यक्षही
कधी गाथा गायली जाते

विचार आणि कार्यावरून
व्यक्तीची योग्यता कळून जाते
अन् त्यांची यशस्वीता सुध्दा
जणू त्यांच्यासाठी चालुन येते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका - सन्मान

Submitted by vishal maske on 27 March, 2015 - 11:09

सन्मान,...

चांगले काम करण्याच्या
प्रत्येकाला संधी असतात
अन् प्रत्येकाच्या कार्याच्या
इथे सर्व नोंदी असतात

त्यांच्या सत्कार्याचा भाग
देशाचीही शान होतो
अन् प्रत्येकाच्या सत्कार्याचा
सन्मानानं सन्मान होतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - ग्राफिक्स आणि मल्टिमिडीया